नीतिवचनं
२१ राजाचं मन यहोवाच्या हातात पाटांच्या पाण्यासारखं असतं.+
त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.+
३ योग्य आणि न्यायीपणाची वागणूक,
यहोवाला बलिदानापेक्षा जास्त आवडते.+
४ गर्विष्ठ डोळे आणि अहंकारी मन,
दुष्टांना मार्ग दाखवणाऱ्या दिव्यासारखे आहेत आणि ते पाप आहेत.+
५ मेहनत करणाऱ्यांच्या योजना नक्कीच यशस्वी होतात,*+
पण जे उतावीळपणे वागतात त्यांच्यावर गरिबी आल्याशिवाय राहत नाही.+
७ दुष्टांचा हिंसाचार त्यांच्यावरच उलटेल,+
कारण ते न्यायाने वागायला तयार नसतात.
८ दोषी माणसाचा मार्ग वाकडा असतो,
पण शुद्ध मनाच्या माणसाची कामं सरळ असतात.+
११ थट्टा करणाऱ्याला शिक्षा केली जाते, तेव्हा अनुभव नसलेला आणखी शहाणा होतो,
बुद्धिमान माणसाला सखोल समज मिळते, तेव्हा त्याचं ज्ञान वाढतं.*+
१२ नीतिमान देव दुष्टाच्या घरावर लक्ष ठेवतो;
तो दुष्टांना उलथून त्यांचा नाश करतो.+
१४ गुप्तपणे दिलेली भेटवस्तू राग शांत करते,+
लपून दिलेली लाच भडकलेला क्रोध शमवते.
१५ नीतिमान माणसाला न्यायाने वागायला आनंद वाटतो,+
पण वाईट कामं करणाऱ्यांना ते नकोसं वाटतं.
१६ जो माणूस सखोल समज दाखवायचं सोडून देतो
तो मृतांसोबत विश्रांती घेईल.+
१७ ज्याला मौजमजा* करायला आवडतं, त्याच्यावर गरिबी येईल;+
ज्याला द्राक्षारसाचा आणि तेलाचा शौक आहे, तो श्रीमंत होणार नाही.
१८ दुष्ट माणूस नीतिमानासाठी,
आणि विश्वासघातकी माणूस प्रामाणिक माणसासाठी खंडणी आहे.+
२० बुद्धिमानांच्या घरात मौल्यवान खजिना आणि तेल सापडतं,+
२२ बुद्धिमान माणूस ताकदवान माणसांच्या शहरावर चढून जातो*
आणि ज्या आश्रयदुर्गावर त्यांचा भरवसा आहे, तो पाडून टाकतो.+
२३ जो आपलं तोंड आणि जीभ सांभाळतो,
तो समस्येत अडकायचं टाळतो.+
२४ जो गर्विष्ठपणे आणि बेपर्वाईने वागतो,
त्याला अहंकारी आणि उद्धट असलेला बढाईखोर म्हणतात.+
२५ आळशी माणूस ज्या गोष्टीची इच्छा धरतो, तीच त्याचा जीव घेईल,
कारण तो आपल्या हातांनी काम करत नाही.+
२६ दिवसभर तो अधाशीपणे हाव धरतो,
पण नीतिमान काहीही राखून न ठेवता, उदारपणे देतो.+
२७ दुष्टाने दिलेलं बलिदान घृणास्पद असतं+
आणि त्याने ते वाईट हेतूने* दिलं, तर ते आणखी किती घृणास्पद असेल!
३० यहोवाच्या विरोधात कसलीही बुद्धी, शहाणपण आणि योजना चालत नाही.+