वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९० पृ. ३
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९०
आमची राज्य सेवा—१९९०
km २/९० पृ. ३

घोषणा

● प्रकाशन देणगीः

फेब्रुवारी व मार्च: इंग्रजीमधील १९२ पानांची जुन्यापैकी दोन पुस्तके रु. १०. प्रांतिय भाषेतील एक रु. ५. (कृपया फेब्रुवारी ८८ रा.से. मधील “घोषणा” शिर्षकाखालील प्रकाशनांची यादी पहावी, ही पुस्तके उपयोगात आणता येतील.)

एप्रिल: सर्व्हायवल इन टू अ न्यू अर्थ्‌ हे पुस्तक १० रू. अनुदानाने दिले जावे. (जेथे हे प्रकाशन उपलब्ध नसेल तेथे जुन्या १९२ पानांची दोन पुस्तके रु. १०) प्रांतिय भाषेतः जुने १९२ पानांचे एक पुस्तक खास सादरता म्हणून ५ रुपये.

मे व जून: द वॉचटॉवर ची वार्षिक वर्गणी ४० रुपये. सहा महिन्यासाठी व दरमहा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकासाठी वर्षभराची वर्गणी रु. २०. दरमहा प्रकाशित होणाऱ्‍या मासिकासाठी सहामाही वर्गणी नाही.

जुलैः १९२ पानांच्या कोणत्याही एक पुस्तकाची खास सादरता रु. ५.

● अध्यक्षीय देखरखे किंवा त्यांनी नेमलेल्या कोणी मार्च १ रोजी किंवा त्यांनतर होईल तितक्या लवकर मंडळीचा हिशोब तपासावा.

● स्मारक दिनः १९८९ मध्ये स्मारक दिनाच्या भाषणाची जी रुपरेषा वापरण्यात आली, तीच (एस-३१ १०/८५) परत १९९० साठी उपयोगात आणावी. या वर्षी स्मारक दिन मंगळवार एप्रिल १० ला सूर्यास्तानंतर आहे. या दिवशी मंडळीची कोणतीही सभा होऊ नये. मंगळवारी सर्वसाधारणपणे होणारी सभा दुसऱ्‍या कोणा दिवशी आयोजित अकरावी. विभागीय देखरेख्यांनी त्या आठवड्यातील त्यांचा कार्यक्रम त्यानुसार आयोजित करावा.

● स्मारक दिन काळातील पवित्र शास्त्र वाचनाचा कार्यक्रमः सर्वांना उत्तेजन देण्यात येते की, त्यांनी स्मारक दिनाआधी सहा दिवस क्रमाने पुढे दिलेले तारीखवार शास्त्रभागाचे वाचन करावेः

गुरुवार, एप्रिल ५:

निसान ९ योहान १२:२-१९; मार्क ११:१-११

शुक्रवार, एप्रिल ६:

निसान १० योहान १२:२०-५०

शनिवार, एप्रिल ७:

निसान ११ लूक २१:१-३६

रविवार, एप्रिल ८:

निसान १२ मार्क १४:१, २, १०, ११

सोमवार, एप्रिल ९:

निसान १३ मत्तय २६:१७-१९; मार्क १४:१२-१६; लूक २२:७-१३

मंगळवार, एप्रिल १०:

निसान १४ योहान १९:१-४२

● जुलैमध्ये सुरु होणाऱ्‍या विभागीय देखरेख्यांच्या भेटीतील नवे जाहीर भाषणः “पोलंडमधील अधिवेशनात यहोवाठायी आनंद करणे” हा असेल. हे असे स्लाईड प्रदर्शन असेल ज्यात पोलंडमध्ये जे १९८९ “ईश्‍वरी भक्‍ती” प्रांतिय अधिवेशन भरले होते त्याचे काही महत्त्वपूर्ण भाग दाखविले जातील.

● सबंध जगभरात स्मारकदिन काळात मार्च २५, १९९० रोजी जे खास भाषण दिले जाईल त्याचा विषय आहेः “खऱ्‍या जीवनाची प्राप्ती मिळवा!” याची रुपरेषा पुरविण्यात येईल. ज्या मंडळ्‌यात या आठवडी विभागीय देखरेख्यांची भेट आहे, किंवा विभागीय संमेलन किंवा खास संमेलन दिवस आहे तेथे हे खास भाषण त्या पुढील आठवड्यात होईल. तरीही हे खास भाषण कोणाही मंडळीत मार्च २५च्या आधी होऊ नये.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा