वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९० पृ. ४
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हस्तपत्रिकांचा प्रभावीपणे उपयोग करण्याद्वारे
  • यांचा कधी व कसा उपयोग करावा
  • क्षेत्रकार्यात
  • पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • आज आमच्या सेवा कार्यात पत्रिका इतक्या मौल्यवान का आहेत
    आमची राज्य सेवा—१९९३
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km २/९० पृ. ४

सुवार्ता सादरता

हस्तपत्रिकांचा प्रभावीपणे उपयोग करण्याद्वारे

१ “यहोवावर भाव ठेवा” या १९८७ मधील प्रांतिय अधिवेशनात चार नव्या हस्तपत्रिकांचे प्रकाशन झाले. त्यांची शीर्षके आहेतः व्हाय यू कॅन ट्रस्ट द बायबल, व्हाट डू जेहोवास विटनेसेस बिलिव्ह? लाईफ इन अ पीसफूल न्यू वर्ल्ड आणि व्हाट होप फॉर द डेड? तुम्ही यांचा क्षेत्रावर प्रभावीपणे उपयोग केला आहे का?

२ अनेक प्रचारक, घरात कोणी न भेटल्यास तेथे एक हस्तपत्रिका टाकत असतात. शिवाय भेट घेतेवेळी ज्यांना वेळ नसतो व कोणी कामात आहे तेव्हाही ते अशा हस्तपत्रिका देतात. काहींना आढळले आहे की, दारावर घरमालकाला आपली ओळख करुन देतेवेळी हस्तपत्रिका उपयोगात आणल्यास घरमालकाची आस्था उत्तेजित होते. तर काही, जेथे कोणत्याच प्रकाशनाचा स्वीकार करण्यात आला नाही पण थोडीबहुत आस्था दिसली तेथे हस्तपत्रिका मोफत दान म्हणून देतात.

यांचा कधी व कसा उपयोग करावा

३ संधी साध्य करण्यात अष्टपैलू व सावध राहिल्यास आपणास या हस्तपत्रिका देण्याचे बरेचसे योग साध्य करता येतील. उदाहरणार्थ, नातेवाईकांना साक्ष देताना हस्तपत्रिका साहाय्यक ठरतात. सुटीवर कोठे गेल्यास, बाजारात, शाळेत किंवा कामावर यांचा उपयोग करू शकता. तुम्ही हस्तपत्रिका सापडू शकेल अशा जागी, कदाचित कोटाच्या किवा शर्टच्या खिशात ठेवता का? त्या पर्समध्ये किंवा छोट्या पिशवीत ठेवता का? हस्तपत्रिका सर्ववेळी उपलब्ध राहिल्यास अनौपचारिक साक्षीकार्य करण्याचे स्फुरणही मिळते. तेव्हा हस्तपत्रिका कोठे देता येतील त्याची संधि का हेरू नये?

४ प्रसंग कोणताही असला तरीही तुम्ही हस्तपत्रिकांचा उपयोग करुन अधिक प्रभावी साक्ष देऊ शकाल. त्यात असणारा संदेश जरी संक्षिप्त आहे तरी तो पटणारा व शास्त्रवचनीय चर्चेवर आधारलेला आहे. या हस्तपत्रिकेतील चित्रे रंगीत आहेत व यामुळे उपाध्यपणात बरेचसे साध्य करता येण्याजोगे आहे. तद्वत, सर्वत्र लोकांना या हस्तपत्रिका सादर करण्यात दक्ष राहा.

क्षेत्रकार्यात

५ घरोघरचे काम करीत असताना राज्य संदेशाविषयी लोकांत आस्था निर्माण करण्यात मदत व्हावी म्हणून या हस्तपत्रिकांच्या विचारप्रवर्तक मथळ्यांचा तुम्ही कधी लाभ मिळविला आहे का? काही प्रचारक आपल्या कार्यात अगदी सुरवातीलाच हस्तपत्रिकेच्या मथळ्याचा उल्लेख करतात. हा पवित्रा आपणही स्वतः का अजमावू नये? तुम्हाला कदाचित असे सांगता येईलः “नमस्ते, आपण घरी भेटल्याचा मला आनंद वाटला. एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मी हे कार्य करीत आहे. तो या हस्तपत्रिकेत लाईफ इन अ पीसफूल न्यू वर्ल्ड यात दिला आहे. ही मोफत आहे. [घरमालकाच्या हाती द्या व तिचे मुखपृष्ठ दाखवा.] अशा या शांतीमय वातावरणात आपणास रहावेसे वाटणार नाही का?” मग जर शक्यता आहे तर संभाषणाचा विषय चालू ठेवा व त्या महिन्याची सादरता करा.

६ आपण जेथे राहात आहोत ती परिस्थिती लक्षात ठेवून आपल्याला म्हणता येईल की, हा संदेश पवित्र शास्त्रातून आहे. यामुळे, तुम्ही पवित्र शास्त्रावर का भाव ठेवू शकता? ही हस्तपत्रिका कदाचित तुमच्या क्षेत्रभागात अति परिणामकारक ठरू शकेल. तुम्हाला असेही म्हणता येईलः “आम्ही आमच्या शेजाऱ्‍याकडे एक मोफत पवित्र शास्त्र संदेश सोडत आहोत. ही आपली प्रत आहे. [ती त्यांना द्या.] तुम्हाला हे दिसेलच की हा विषय पवित्र शास्त्रातून आहे. तुम्हाला असे वाटते का की, लोकांचा आज पवित्र शास्त्रावरील विश्‍वास उडालेला आहे? [उत्तराची वाट पाहा.] ही हस्तपत्रिका, जे काही पवित्र शास्त्र म्हणते, त्यावर आपण का भाव ठेवू शकतो ते पाहण्यात आपले साहाय्य करील.” मग, संभाषणाचा विषय चालू ठेवा व हे दाखवून द्या की, देवाने पृथ्वीसाठी कोणकोणते आशीर्वाद राखून ठेवले आहेत.

७ अशाप्रकारे, पवित्र शास्त्रीय हस्तपत्रिकांचे वितरण करणे हे वेळ समीक्षक आणि “सुवार्ता” सादर करण्यातील प्रभावी व परिणामकारक माध्यम आहे. (मत्तय २४:१४) या आमच्या जाहीर उपाध्यपणात तसेच अनौपचारिक साक्षीकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. तर या, आपण चांगली साक्ष देण्यासाठी तसेच इतरांचे देवराज्याविषयी शिक्षण देण्यासाठी साहाय्य या अर्थी आमच्या सुंदर हस्तपत्रिकांचा चांगला उपयोग करू.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा