ईश्वरशासित वृत्त
◆ हंगेरीने ११,२५७ प्रचारकांचे नवे शिखर गाठले. पवित्र शास्त्र अभ्यासांचा आकडा गेल्या वर्षीच्या ५,४०० पासून आता ७,२१९ वर गेला.
◆ इस्राएलने कळविले की, युद्धामध्ये क्षेपणास्त्राच्या हल्ल्यामुळे काही बांधवांची घरे उद्ध्वस्त झाली, पण कोणाची जीवितहानी झाली नाही.
◆ लायबेरियातील काही ठिकाणी मोठा त्रास असला तरीही मंडळ प्रचारक सरासरी २० तासांच्या पुढे कार्य करीत असल्याचा अहवाल आहे. त्यांच्यासाठी कोट डी’लव्होइर व सेइरा लिऑन या शाखा दप्तराकडून मदत दिली जात आहे.
◆ नऊ वर्षात प्रथमच निकारागुआ येथील बांधवांना मॅनगुवातील भव्य स्टेडियमवर एकत्र भेटण्याची संधि मिळाली. उपस्थितीचा उच्चांक ११,४०४ होता व २८३ जणांचा बाप्तिस्मा झाला.