देवाच्या नावाची सर्वतोपरी स्तुती करा
१ आम्ही यहोवाकडील आशीर्वादांचा केवढ्या मुबलकपणे अनुभव घेत आहोत! भारतात या सेवा वर्षात प्रचारक, पायनियर्स तसेच घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास यांजमध्ये नवे उच्चांक गाठण्यात आले आहेत. तसेच २८,८६६ ही स्मारक विधीची उपस्थिती देखील लक्षणीय आहे. परदेशात हजारो प्रचारक खास अधिवेशनाला उपस्थित राहू शकले पण, आम्हा सर्वजणांना आमच्या विभागीय संमेलनात, खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमात आध्यात्मिक अन्नाच्या समृद्ध साठ्याचा लाभ मिळाला. आम्हाला इतरही आशीर्वाद अनुभवण्यास मिळाले.
२ यहोवा आम्हासाठी जे काही करीत आहे त्याविषयी आम्ही आपली कदर कशी दाखवू शकतो? हे आपल्याला देवाच्या नावाची सर्वतोपरी स्तुती करण्यामुळे करता येईल.—स्तोत्र. १४५:२१.
देवाच्या नावाची स्तुती करीत राहा
३ या सप्टेंबर महिन्यात आपल्याला देवाच्या नावाची सर्वतोपरी कशी स्तुती करता येईल? आम्ही मासिक आकाराचे माहितीपत्रक देऊ या. याबद्दलची पूर्वतयारी करून तसेच ही माहितीपत्रके निवडून क्षेत्रकार्याला जाऊन आम्हाला यहोवाची स्तुती करण्यासाठी सिद्ध बनवले जाईल व इतरांनीही त्याची स्तुती करावी म्हणून त्यांना मदत देता येईल.
४ संभाषणाचा विषय आहे, “एक नवे जग—कोणाद्वारे?” रिझनिंग पुस्तकात ९ ते १५ पानांवर दिलेल्या माहितीमधून योग्य प्रस्तावनांची तयारी आपण करू शकू. सध्याच्या जगाला चांगले बनविण्यासाठी जागतिक नेते आता कोणती आशा देत आहेत याबद्दल काही घरमालक आपल्यासोबत तत्परतेने बोलणी करतील. शांतीमय स्थिती यावी अशी बहुतेक लोकांची इच्छा असली तरी यिर्मया १०:२३ दाखवते की, माणसाला स्वतःच्या समस्या सोडवता येणे शक्य नाही. यामुळेच, जागतिक परिस्थितीसंबंधाने काही करण्याबद्दल देवाने जे अभिवचन दिले आहे ते अपयशी होणार नाही हे जाणणे खात्री देणारे आहे. हे अभिवचन २ पेत्र ३:१३ मध्ये आढळते. मग, उचित असे माहितीपत्रक त्यांना सादर करा.
चांगली तयारी करा
५ इतरांना प्रभावी शिक्षण देण्यासाठी तयारी जरुरीची आहे. तेव्हा इतर कौटुंबिक सदस्य, ज्याने तुम्हाला सत्य दिले त्यांच्यासोबत किंवा तुमच्या पुस्तक अभ्यास गटातील कोणासोबत याची का तयारी करू नये? आपल्या सादरतेची तालीम केल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि क्षेत्रावर लोकांशी बोलताना तुम्हाला व्यक्तीगत दृढता लाभेल.
६ आमच्या सादरतेत, आमची लोकांबद्दलची आस्था दिसली पाहिजे. दुःखी व निराश असलेल्या लोकांना आशा देण्यासाठी नव्या जगाबद्दल पवित्र शास्त्रात आढळणाऱ्या अभिवचनावर जोर द्या. घरमालकाने माहितीपत्रक घेतल्यावर त्यांना आमच्या पवित्र शास्त्र अभ्यासाच्या कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवा. किंवा पुनर्भेटीत तुम्हाला हे प्रात्यक्षिक दाखवण्याचे बरे वाटेल.
७ कार्यवर्ष संपले असताना यहोवाकडून इतके आशीर्वाद मिळाल्याबद्दल केवढे धन्यतेचे वाटते! आपण नव्या कार्यवर्षात प्रवेश केल्यावर देखील यहोवाच्या नावाची सर्वतोपरी स्तुती करण्याकडे लक्ष देऊ; कारण आपण सर्वजण त्याच्या नव्या जगात त्याची सदासर्वदा सेवा करीत राहावी अशी आपली आशा आहे.