घरमालकाला ऐकणारे करणाऱ्या प्रस्तावना
१ आपल्या घरोघरच्या कार्यात संभाषणामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग कोणता? आम्हापैकी बहुतेकांचे मत, प्रस्तावना, असेच असेल. तुम्हाला पहिल्या ३० सेकंदात घरमालकाची आस्था उभारता आली नाही, तर तो संभाषण बंद करण्याची शक्यता आहे.
२ तर मग, प्रभावी स्वरुपाची प्रस्तावना सादर करण्यासाठी तुम्ही कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत? तुम्हाला जे लोक भेटणार आहेत त्यांची आचारपद्धत व गरजा यांचे पृथ्थकरण करा. एखादा विनोद करण्याची प्रथा आहे का की, लगेच मुद्यावर यावे असे अपेक्षिले जाते? तुमच्या क्षेत्रात पुष्कळ तरुण विवाहीत जोडपी आहेत का? त्यांना कसल्या चिंता आहेत? मानवजातीला ज्या सर्वसाधारण समस्या आहेत, त्यांची कल्पना तुमच्या वसाहतीतील लोकांना आहे का?
तुम्हाला अशा लोकांना ऐकणारे करण्यासाठी असे काही म्हणता येईल:
▪ “नमस्ते. माझं नाव −−−−−− आहे. लोकांची उपासमारीने व युद्धामुळे जी जीवितहानी होत असल्याचे आपल्याला वाचायला मिळते त्यामुळं मला बरेच त्रस्त झाल्यासारखे वाटते. तुम्हालाही तसंच वाटतं का?” संभाषण सुरु करणारे आणखी काही प्रश्न असे आहेतः “जागतिक समस्या सोडविण्यासाठी कोणता उपाय आहे?” “आजच्या समस्या पृथ्वीवरुन कोणी काढून टाकू शकतील असे तुम्हाला वाटते का?” “कोणा राज्यकर्त्याठायी येथे यशया ९:६, ७ मध्ये दाखविलेली गुणवत्ता असती तर? [वाचा व शास्त्रवचनावर विवेचन मांडा.]”
३ काही क्षेत्रात, लोकांना जागतिक शांतीपेक्षा आपले घर व कुटुंब यात अधिक काळजी वाटत असेल.
तुम्हाला हे प्रश्न विचारुन त्यांच्यामध्ये आस्था उभारता येतील:
▪ “येत्या दहा वर्षात तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कशाप्रकारचे जीवन असेल असे वाटते? पवित्र शास्त्राने भविष्याच्या बाबतीत सादर केलेला दृष्टीकोण खूपच उत्साहवर्धक आहे, कारण ते एका अशा राज्यकर्त्याविषयी भाष्य करते, जो परिपूर्ण दर्जाने सत्ता गाजवील. त्याच्याबद्दल यशया ९:६, ७मध्ये येथे काय म्हटले आहे ते बघा.”
४ तुम्ही अशा वसाहतीत राहता का, जेथे गुन्हेगारी व सुरक्षितता या गोष्टी दर दिवसाचा विषय बनल्या आहेत? तुम्ही रिझनिंग पुस्तकातील १० व्या पानावर “क्राईम/सेफ्टी” या विभागातील पहिली प्रस्तावना वापरल्यास काहीजण लक्षपूर्वक ऐकू शकतील.
तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “नमस्ते. आज आम्ही लोकांसोबत व्यक्तीगत सुरक्षिततेबद्दल बोलत आहोत. सभोवताली बरेच गुन्हे घडत आहेत व ते आमच्या जीवनावर परिणाम करीत आहे.” यानंतर, “याला उपाय काय?” किंवा “एखाद्या राज्यकर्त्याठायी असे गुण असते तर?” अशा स्वरुपातील एखादा प्रश्न संभाषण सुरु करायला मदत करील. मग, तुम्ही यशया ९:६, ७ वाचू शकता.
५ या एका शास्त्रवचनाच्या साध्या सादरतेला आम्ही सर्वजण, शाळेला जाणाऱ्या आमची तरुण मुलेही वापरु शकतात. खरे म्हणजे, मासिके सादर करताना तुम्ही याचा एखादा प्रयोग करून बघू शकता. हे लक्षात ठेवा की, प्रकाशनाची सादरता करण्याआधी घरमालकाची आस्था उभारली पाहिजे हे आमचे ध्येय आहे. आमचे ऐकणाऱ्या लोकांमध्ये खरी आस्था वाढविण्यासाठी अशा प्रकारातील शास्त्रवचनीय सादरता खूपच सुंदर असतील असे तुम्हाला वाटत नाही काय? फेब्रुवारी व मार्च दरम्यान मासिके तसेच महिन्याची नियमित सादरता सादर करताना या प्रस्तावांचा उपयोग करण्यास तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल याची आम्हाला खात्री आहे.
६ तुम्ही आपल्या भेटीच्या पहिल्या ३० सेकंदांचा स्वतःचे आचरण तसेच तुमचे प्रास्ताविक यासंबंधाने प्रभावी रितीने वापर केल्यास, घरमालकांना ऐकणारे बनविण्याचे महत्त्वपूर्ण ध्येय गाठू शकता.