तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करता येईल का?
१ येशूने आपल्या अनुयायांना, स्वतःला सेवाकार्यात मुक्तपणे द्यावे असे प्रोत्साहन दिले आणि असा हा मार्ग अनुसरल्यामुळे त्यांना सौख्यानंद व अनेक आध्यात्मिक आशीर्वाद मिळतील अशी हमी त्याने त्यांना दिली. (मत्तय १०:८ब; प्रे. कृत्ये २०:३५) मागील एप्रिल दरम्यान ८७७ जणांनी या वाढीव कार्याचा आनंद साहाय्यक पायनियर या नात्याने उपभोगला. तर मग, तुम्हालाही एप्रिल किंवा मे, अथवा दोन्ही महिन्यात साहाय्यक पायनियरींग कार्यात प्रवेश मिळवून या आशीर्वादात सहभागी होण्याची इच्छा आहे का?—स्तोत्र. ३४:८.
२ तुमची परिस्थिती बघा: खाली नमूद असणारे अनुभव विचारात घेतल्यावर स्वतःला विचाराः ‘मी या उदाहरणामध्ये कोठे बसतो का? मला साहाय्यक पायनियरींगमध्ये सहभागी होता येण्यासाठी आवश्यक असणारे फेरबदल कसे करता येतील?’
३ एक भगिनी प्रापंचिक काम करते व तिला पाच मुले आहेत तरी तिला साहाय्यक पायनियरींग करता आली. तिला यापासून कोणते प्रतिफळ मिळाले? तिचे पती व मुलांनी उत्तम आधार दिला, आणि त्या भगिनीच्या चांगल्या उदाहरणामुळे पतीला पुढील महिन्यात बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक होण्याची चालना मिळाली.
४ एका मंडळीत सर्व वडील व उपाध्य सेवकांनी एका महिन्यात साहाय्यक पायनियरींगचे कार्य केले. यापैकीच्या बऱ्याच जणांना प्रापंचिक नोकऱ्या होत्या, पण ते सर्वच सप्ताहाच्या शेवटाला आध्यात्मिक कार्यात मग्न राहिले. त्यांनी क्षेत्रकार्यात जे उत्तम नेतृत्व केले व क्षेत्रसेवेची जी व्यवस्था आखली तिजमुळे सबंध मंडळीला मोठा लाभ घडला. ७७ प्रचारकांपैकी ७३ जणांनी पायनियर कार्यात त्या महिन्यात विविध रुपात सहभाग घेतला.
५ एका १५ वर्षे वयाच्या शाळेला जाणाऱ्या मुलीने आपली दोन आठवड्याची उन्हाळी सुट्टी पायनियर सेवेत सहभागी होण्यासाठी वापरली. ती म्हणतेः “मला फरक लगेच दिसून आला. खासपणे मला संभाषणात सुधारणा करता आली. मला पुष्कळ लोकांना संभाषणात समाविष्ट करून घेता आले.”
६ प्रापंचिक नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्यांना राज्य आस्थेचा पाठलाग करण्याच्या सुसंध्या आहेत. आपल्या पतीच्या निधनानंतर ८४ वर्षे वयाच्या भगिनीने लिहिलेः “माझी सर्व मुले मोठी झाली व त्यांनी आपापले संसार थाटले. त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले नाही, तरीपण त्यांच्या भेटीने मला दुःख व एकांताच्या भावनेतून मुक्त केले नाही. मग, मंडळीतील एका वडीलांनी मला साहाय्यक पायनियरींग करण्याची सूचना मांडली. सुरवातीला मी हेळसांड केली, पण शेवटी प्रयत्न करून पाहण्याचा विचार केला. मला केवढा आनंद मिळाला! मला खरेच वाटायला लागले की, मी या साहाय्यक पायनियरींगचा अनुभव घ्यावा म्हणूनच यहोवाने मला येथपर्यंत जगू दिले. मग त्यानंतर मी दर महिन्याला साहाय्यक पायनियरींग करीतच राहिले.”
७ जमीनजुमला व मिळकतींची विक्री करणाऱ्या एका बंधूने घरे दाखविण्याच्या आपल्या कार्यक्रमात, पायनियर कार्यासाठी वेळ मिळावा म्हणून बदल केला. याचप्रकारे, या वाढत्या कार्यहालचालीसाठी वेळ मिळावा म्हणून अनेकांनी आपल्या नोकरीत देखील बदल केला आहे.
८ आपल्या योजना आत्ताच आखा: तर मग, एप्रिल व मे दरम्यान साहाय्यक पायनियरींग करण्याच्या निश्चित योजना आत्ताच का आखू नये? यात यशस्वी होण्यासाठी काळजीपूर्वक योजना जरुरीची आहे. हे, कौटुंबिक जबाबदाऱ्या, पूर्ण वेळेचे प्रापंचिक काम, व इतर शास्त्रवचनीय बंधने असताना सुद्धा ज्यांनी साहाय्यक पायनियरींग केली त्यांच्या अनुभवावरुन स्पष्ट होते. ज्यांनी यशस्वीरित्या पायनियरींग केली आहे त्यांच्या अनुभवाकडून लाभ मिळविण्यासाठी त्यांच्याशी बोला. याशिवाय यहोवाकडे प्रार्थना करून त्याची मदत मागा.—यशया ४०:२९-३१; याकोब १:५.
९ जे साहाय्यक पायनियरींग सेवा करण्यासाठी आपली व्यवस्था आखतात अशांना मुबलक आनंद मिळतो, यात काही प्रश्नच नाही. तुम्ही अद्याप पूर्ण वेळेचे कार्य केले नसल्यास तुम्हाला या हक्काचा आनंद घेता येईल का? सुवार्तेची सहभागिता इतरांसोबत करण्यामध्ये आपल्या हक्काचा विस्तार करण्याचा प्रयत्न केल्यास यहोवा तुम्हावर निश्चये आपला विपुल आशीर्वाद पाठवील.—मलाखी ३:१०.