घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
मार्च: १९२ पृष्ठांची खास सादरतेची दोन पुस्तके १२ रुपयांना. प्रादेशिक भाषेत: एक पुस्तक ६ रुपयांना.
एप्रिल: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपये. (ज्या भाषेत हे पुस्तक उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची जुनी पुस्तके दोन १२ रुपयांना व एक ६ रुपयांना द्यावीत.)
मे व जून: द वॉचटावर याची एक वर्षाची वर्गणी रु. ५०. सहा महिन्यांची तसेच मासिकरित्या प्रकाशित होणाऱ्या अंकांसाठी वार्षिक वर्गणी रु. २५. (मासिक आवृत्त्यांसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.) जेथे वर्गणी स्वीकारली जात नाही, तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक ८ रुपयांना द्यावे.
जुलै: द बायबल गॉडस् वर्ड ऑर मॅन्स? १२ रुपये. (प्रादेशिक भाषातः १९२ पृष्ठांचे जुने पुस्तक रु. ६.)
▪ सचिव तसेच सेवा देखरेखा यांनी सर्व नियमित पायनियरांच्या कार्याची उजळणी करावी. कोणाला तासांची गरज पूर्ण करण्यात अडचण असल्यास वडीलांनी त्यांच्या साहाय्याची योजना करावी. याच्या प्रस्तावासाठी दिनांक ऑक्टोबर १, १९९१ व ऑक्टोबर १, १९९० ची संस्थेची पत्रे (एस-२०१) पहा. तसेच आमची राज्य सेवा याच्या ऑक्टोबर १९८६ च्या पुरवणीतील परिच्छेद १२-२० पहा.
▪ सांजभोजनाचा समारंभ शुक्रवार, एप्रिल १७, १९९२ रोजी होईल. भाषणाची सुरवात जरी आधी केली तरी हे लक्षात असू द्या की, स्मारकविधीची भाकर व द्राक्षारस सूर्यास्त झाल्याशिवाय फिरवू नये. तुमच्या वसाहतीत केव्हा सूर्यास्त होतो ते स्थानिक उगमाकडून तपासून पहा. त्या दिवशी क्षेत्रकार्याखेरीज इतर कोणतीही सभा चालविण्यात येऊ नये. ज्या मंडळीत शुक्रवारी सभा असते त्यांनी त्या शक्य आहे तर इतर दिवशी घ्याव्या. रविवारच्या सभेच्या आराखड्यात कोणताही बदल केला जाणार नाही.
▪ १९९२ वर्षातील खास जाहीर भाषण स्मारकविधीच्या आधी रविवार, एप्रिल ५, १९९२ रोजी होईल. त्याचे शीर्षक आहे, “जागतिक घडामोडीतील धर्माची भूमिका.” ज्या मंडळीत या तारखेला विभागीय देखरेख्यांची भेट असेल; किंवा ज्या विभागात या तारखेला विभागीय संमेलन असेल, त्या मंडळ्यांनी हे भाषण पुढील आठवडी, एप्रिल १२, १९९२ रोजी ठेवावे. ज्या मंडळ्यात जाहीर भाषणाची सभा रविवारशिवाय इतर दिवशी होत असेल त्यांनी हे खास जाहीर भाषण एप्रिल ६-११ दरम्यान द्यावे.
▪ ज्या प्रचारकांना एप्रिल व मे दरम्यान साहाय्यक पायनियरींग करावयाची आहे अशांनी आत्ताच आपली योजना आखून लवकर अर्ज द्यावेत. हे वडीलांना आवश्यक क्षेत्र कार्याच्या योजना आखण्यात तसेच पुरेसा प्रकाशन साठा हाताशी तयार ठेवण्यात साहाय्यक होईल.
▪ स्मारकविधीचा पवित्र शास्त्र वाचन कार्यक्रमः १९९२ च्या कॅलेंडरमध्ये देण्यात आलेला आराखडा याप्रमाणे:
रविवार, एप्रिल १२: निसान ९ मार्क १४:३-९; ११:१-११
सोमवार, एप्रिल १३: निसान १० मार्क ११:१२-१९
मंगळवार, एप्रिल १४: निसान ११ मार्क ११:२०–१२:२७
बुधवार, एप्रिल १५: निसान १२ मार्क १४:१, २, १०, ११
गुरुवार, एप्रिल १६: निसान १३ मार्क १४:१२-१६
शुक्रवार, एप्रिल १७: निसान १४ मार्क १४:१७-२२
▪ कृपया महिन्यातून एकापेक्षा अधिक वेळा प्रकाशनाची मागणी पाठवू नका.
▪ प्रकाशन साठा संपला:
इंग्रजी: “ऑल स्क्रिपचर्स इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” (सुधारीत आवृत्ती)
▪ नवी प्रकाशने उपलब्ध:
इंग्रजी: द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड्; स्पिरिटस् ऑफ द डेड—कॅन दे हेल्प यू ऑर हार्म यू? डू दे रिअली एक्झिस्ट? हिन्दी: अवेक! माहितीपत्रक ५-१ नेपाळी: अवेक! माहितीपत्रक ०-९; १०-१; ११-१; १२-१ तामिळ: रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स तेलगू: अवेक! माहितीपत्रक ९-१; हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ?