मार्चच्या सादरतेसाठी आपली तयारी करा
१ या महिन्यात आपण १९२ पृष्ठांची कोणतीहि दोन खास सादरतेची पुस्तके देणार आहोत. यापैकीच्या कोणत्याही प्रकाशनाद्वारे सुवार्तेची विविध रुपात प्रस्तुति करता येणे शक्य आहे. यासाठी पुढील एक किंवा सर्वच सुचविलेल्या प्रस्तुति शिकून घेण्याचे तुम्हाला नक्कीच व्यावहारिक वाटेल.
२ पृथ्वी—मानवाचे चिरकालिक घर: ज्यांना पृथ्वी व त्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल काळजी वाटते अशांसोबत संभाषण सुरु करण्यासाठी “पृथ्वी ही मानवाचे चिरकालिक घर अशी टिकून राहणार,” या विषयाचा प्रयत्न करुन बघा. हा विषय कुटुंबप्रेमी, निसर्गप्रेमी आणि वातावरणाबद्दल आस्था बाळगणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरेल. यात उपदेशक १:४ या शास्त्रवचनाचा वापर करायचा आहे. हा विषय व शास्त्रवचन यांचे स्पष्टीकरण सत्य पुस्तकाच्या पृष्ठ ११७, ११८ पानावरील १३ व १४ परिच्छेदात केले आहे.
३ आपली ओळख दिल्यावर तुम्ही असे म्हणू शकाल:
▪ “आज आम्ही थोडक्यात लोकांच्या भेटी घेऊन आम्हापैकी बऱ्याच लोकांना जो काळजीचा विषय वाटत आहे त्याबद्दल बोलत आहोत. पृथ्वी ही आमचे घर आहे, आणि तिचा नाश आज ज्या पद्धतीने केला जात आहे त्याविषयी तुम्हालाही निश्चितपणे काळजी वाटत असणार. प्रदुषण वाढतच राहिल्यास ही पृथ्वी राहण्यास योग्य स्थळ अशी राहणार नाही याबद्दल शास्त्रज्ञ तसेच वातावरण तज्ञ इशारा देत आहेत. तुम्हाला या समस्येबद्दल काही तोडगा दिसतो का? [घरमालकाची इच्छा असल्यास त्याला बोलू देण्यासाठी थोडे थांबा.] पवित्र शास्त्र पृथ्वीचे काय भवितव्य आहे हे थोडक्यात दाखविण्याची मला इच्छा आहे. येथे उपदेशक १:४ मध्ये असे म्हटले आहे.” वचन वाचा आणि सत्य पुस्तकातील पृष्ठ ११७, ११८ मधील १३ व १४ परिच्छेदांचे विवेचन दाखवा.
४ दुष्टता काढून टाकण्यात येईल: ज्यांना गुन्हे, हिंसाचार, व युद्धे याबद्दल काळजी वाटते अशांना अपीलकारक बोलणे करण्यासाठी “दुष्टाईचा अंत करण्यात येईल की, ज्यामुळे देवावर प्रीती करणाऱ्यांना जीवन व शांतीचा अनुभव घेता येईल,” या विषयावर संभाषण करता येईल. स्तोत्रसंहिता ३७:९-११ याबद्दलचा मुद्दा प्रस्तुत करते आणि सुवार्ता हे पुस्तक १०६ पृष्ठावर २ व ३ परिच्छेदात दाखविते की, देवाने सहनशीलतेने सर्व गोष्टी हाताळण्यामागे व्यावहारिक ज्ञान आहे.
५ सांप्रदायिक प्रस्तावनेनंतर तुम्हाला असे म्हणता येईल:
▪ “तुम्हाला असे वाटते का की, एक काळ असा येईल जेव्हा आम्हाला हिंसाचार व गुन्हेगारी यांचा सामना करावा लागणार नाही? [घरमालकाच्या प्रतिसादास वाव द्या.] पवित्र शास्त्र येथे स्तोत्रसंहिता ३७:९-११ मध्ये चिरकालिक उपायाची चर्चा करते, जेथे असे म्हटले आहे.” वचन वाचा व सुवार्ता पुस्तकातील १०६ वे पृष्ठ काढून त्यातील २ व ३ऱ्या परिच्छेदातील निवडक भाग वाचा.
६ पुनरुत्थानाची आशा: वस्तुतः प्रत्येकाने कोणाला तरी मृत्युत हरवले असल्यामुळे, “देवराज्याच्या अमलाखाली नंदनवनमय परिस्थितीत मृत जनांना जीवनाची प्राप्ती होणार,” या विषयाबद्दल संभाषण सुरु करणे हे खरेच सांत्वनदायक ठरू शकेल. तुम्हाला योहान ५:२८, २९ किंवा लूक २३:४३ दाखवून सुवार्ता पुस्तकातील पृष्ठ १८६, परि. ८ व पृष्ठ १५१, परि. १ वरील शास्त्रवचन व विषय दाखवता येतील. (सद्य जीवन, पृ. १६३).
७ तुम्हाला “रिझनिंग” पुस्तकात १४ व्या पृष्ठावरील तिसऱ्या प्रस्तावनेने आपले संभाषण सुरु करून पुढे असे म्हणता येईलः
▪ “आम्ही ज्यांना मृत्युमध्ये गमावले आहे अशांची अधूनमधून आठवण करीत असतो. पण, त्यांना आपल्याला पुन्हा कधी पाहता येईल असे तुम्हाला वाटते का? [घरमालकाला बोलण्याची संधि द्या.] आम्ही ज्या लोकांशी या विषयावर बोललो त्यांना देवाचे वचन याबद्दल कोणते अभिवचन देते ते, तसेच हे अभिवचन याच पृथ्वीवर पूर्ण होणार ते जाणून खूप आश्चर्य वाटले. पवित्र शास्त्राने जे अभिवचन दिले आहे ते येथे पहा . . . ” मग, योहान ५:२८, २९ किंवा लूक २३:४३ पैकी कोणत्याही वचनाचा उपयोग करून सुवार्ता पुस्तकाच्या १८६ किंवा १५१ पृष्ठावरील १ल्या परिच्छेदाच्या विवेचनाचा वापर करू शकता.
८ या महिन्यात वरीलपैकी एका किंवा सर्वच प्रस्तुतींची तयारी करा. तुम्ही जे प्रकाशन वापराल त्यातील सुयोग्य अवतरणे तसेच चित्रे दाखवणे तितके कठीण नाही. थोडीफार आस्था दाखविल्यास त्या विषयाशी संबंधित असणारी एखादी हस्तपत्रिका सादर करा.