शेजारी असणारे ज्योति वाहक
१ अलिकडेच झालेल्या प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहिल्यानंतर, आमच्या शेजाऱ्यांमध्ये ज्योति वाहक होण्याच्या गरजेसाठी आम्ही अधिक दक्ष झालो. (मत्तय ५:१५) सादर केलेल्या सर्व कार्यक्रमाचे मनन करताना व आमच्या दैनंदिन जीवनात त्याचे अनुकरण करण्याचा खूप प्रयत्न करताना आम्हाला खऱ्या भक्तित यहोवाच्या अगदी नजीक येण्यास मदत होते व इतरांना यहोवाच्या दिलेल्या अभिवचनांबद्दल शिकण्यास मदत करु शकतो.
२ जेव्हा शुक्रवारी सकाळच्या कार्यक्रमाच्या शेवटी, एका नवीन हस्तपत्रिकेचे विमोचन झाले ज्याचे शीर्षक होते वील धीस वर्ल्ड सरवाईव? तेव्हा प्रकाश बाळगण्याच्या आमच्या संध्या वाढल्या. ह्या हस्तपत्रिकेचा वापर कसा करावा हे दाखवण्यासाठी शनिवारी सकाळची प्रात्यक्षिके अतिशय सहाय्यक होती. ह्या बरोबरच, आणखी तीन दुसरी हस्तपत्रिका लवकरच उपलब्ध होतील याची घोषणा झाली. त्यांची शीर्षके अशी आहेत कम्फर्ट फॉर द डिप्रेस्ड्, एनजॉय फॅमिली लाईफ, हू रियली रुल्स द वर्ल्ड? संधी मिळताच उपयोग करण्यासाठी ह्या सोईस्कर साहित्यांना स्वत: जवळ बाळगण्याचे उत्तेजन दिले गेले. तुम्हास हे जाणून आनंद वाटेल की ह्या आमच्या राज्य सेवा यातील ‘घोषणा’ या विभागात म्हटले आहे की ह्या चारही हस्तपत्रिका आता इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत व मंडळ्या त्यांची मागणी आम्हाकडून करु शकतात. आम्ही आशा बाळगतो की त्यांना काही संख्येत इतर भाषेतही लवकरात लवकर उपलब्ध करु शकू.
३ शनिवारी दुपारी, “येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी मुक्तता” ह्या भाषणाच्या शेवटी एका उत्तम नव्या माहितीपत्रकाचे विमोचन झाले ज्याचे शीर्षक होते डझ गॉड रियली केअर अबाऊट अस? हे रंगीत, सुंदर उदाहरणांयुक्त माहितीपत्रक पुष्कळ लोकांच्या प्रश्नांचे उत्तर देईल, जसे की: देवाने दु:खाला परवानगी का दिली? याचा कधी अंत होईल का? आम्हाला कसे माहीत आहे की आम्ही शेवटल्या दिवसात आहोत? पृथ्वीचे नंदनवनात कसे रुपांतर केले जाईल? देवाच्या नवीन जगात सार्वकालिक जीवनाप्रत आम्ही कसे पोंहचू शकतो? हे माहितीपत्रक नवीन पवित्र शास्र अभ्यास चालू करण्यास सर्वोत्तम साहित्य ठरु शकते. हे वितरणासाठी आता इंग्रजीतही उपलब्ध असून इतर भाषांमध्ये आम्हाला वेळेवर मिळेल याची अपेक्षा करत आहोत.
४ “ज्योति वाहक” प्रांतिय अधिवेशनात आध्यात्मिक अन्न भरपूर मिळाल्याबद्दल आम्ही किती कृतज्ञ आहोत! देवाच्या आध्यात्मिक ज्योति वाहक या नात्याने, आम्ही जे काही शिकलो त्याचे प्रामाणिकपणे अनुपालन करण्याद्वारे व ह्या उत्तम नवीन विमोचनांचा उपयोग करुन सर्व लोकांना यहोवाला जाणण्यास व त्याची सेवा करण्यास मदत करण्याद्वारे आम्ही मनपूर्वक गुणग्राहकता दाखवण्याचा निश्चय केला पाहिजे.