डिसेंबरसाठी सेवा सभा
डिसेंबर ७ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ४९ (२३)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. क्षेत्रकार्यात प्रचारकांनी घेतलेल्या सहभागासाठी त्यांची प्रशंसा करा. चालू मासिकातील बोलक्या मुद्यांचा उपयोग करून मासिक सादरता दाखवा.
१५ मि: “देवाच्या वचनाचे सामर्थ्य.” प्रश्नोत्तरे. सर्वांना तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता ही हस्तपत्रिका वाचण्याचे, व त्यातील अगदी सरळ प्रभावशाली चर्चा व युक्तिवादाच्या ओळींकडे लक्ष देऊन क्षेत्रकार्यात त्यांचा उपयोग करण्याचे उत्तेजन द्या.
२० मि: “तुमच्या पहिल्या भेटीतच पाया घालणे.” हा भाग हाताळणाऱ्या बांधवाने परिच्छेद ४, ५, व ६ तील प्रत्येकी एका मुद्यांचा उपयोग करुन परिच्छेद २ व ३ मधील दोन प्रस्तावनेचे चार प्रात्यक्षिके दाखवा. शेवटचे प्रात्यक्षिक अनंतकाळ जगू शकाल हे पुस्तक कसे सादर कराल याचे असेल.
गीत ५२ (५९) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर १४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १४१ (६४)
५ मि: स्थानिक घोषणा व ईश्वरशासित वृत्त.
१५ मि: “तुम्ही सूचना पाळता का?” ऑक्टोबर १, १९९०च्या द वॉचटावर पृ. ३०-१ वरील साहित्यावर अध्यक्षीय देखरेख्यांचे भाषण. हा विषय प्रादेशिक भाषेतील नोव्हेंबर १, १९९१च्या द वॉचटावर मध्ये आढळेल. विशिष्ट गरजांना स्थानीय लक्ष दिले जावे जसे की: क्षेत्रसेवेच्या वेळेचा अहवाल देणे, राज्य सभागृहाची स्वछता, सभांना व क्षेत्रकार्याला वेळेवर उपस्थित राहणे, राज्य सभागृहात मुलांना ताब्यात ठेवणे व असेच काही. योग्य तेथे प्रशंसा करा आणि सर्वांना स्पष्टीकरण द्या की जर प्रत्येकाने दिलेल्या नियमानुसार चालले तर संपूर्ण मंडळीचा व नियुक्त केलेल्या सेवकांचा कसा फायदा होईल.
१० मि: “जानेवारीत सहाय्यक पायनियर बना.” ऊबदार व उत्साहाने प्रश्नोत्तराद्वारे चर्चा करा. क्षेत्रकार्याच्या स्थानिय व्यवस्थांची व जानेवारीत मोठ्या समुहाच्या खास व्यवस्थेची घोषणा करा.
१५ मि: आम्ही वाढदिवस का साजरा करत नाही. वडील व चांगले उदाहरण असलेला पण पिता नसलेला किशोरवयीन मुलगा यांच्यामधील चर्चा. त्या मुलाला त्याच्या मित्रांकडून वाढदिवसाच्या चहापानास हजर राहण्यासाठी घातलेल्या दबावावर मात करण्यासाठी तो वडीलांची मदत घेण्यास येतो. त्याला हे कळते की ही गोष्ट चुकीची आहे पण त्याचे स्पष्टीकरण तो इतरांना देऊ इच्छितो. वडील दयाळूपणे व सोप्या भाषेतून त्या मुलासोबत इंग्रजी भाषेतील सप्टेंबर १, १९९२च्या, द वॉचटावर पृ. ३०-१ वरील, (हाच विषय प्रादेशिक भाषेच्या वॉचटावरच्या डिसेंबर १, १९९२च्या पंधरावडा मासिकात आला आहे.) व रिजनिंग पुस्तकाच्या पृ. ६८-७०च्या माहितीची उजळणी करतात.
गीत २७ (७) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २१ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १७९ (२९)
१५ मि: स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल व देणग्या मिळाल्याबद्दल संस्थेने कळविलेली पोच कळवावी. स्थानिय मंडळीला व संस्थेच्या जगभरातल्या कामासाठी जी आर्थिक मदत दिली याबद्दल मंडळीची उबदारपणे प्रशंसा करा. योग्य असेल तर सुट्टीच्या काळात खास क्षेत्रसेवेच्या व्यवस्थेचा आराखडा कळवा. स्कूल माहितीपत्रक पृ १७-२१चा उपयोग करुन पालकांनी सुट्टीच्या वेळेत उद्भवणाऱ्या वादविवादास तोंड देता यावे म्हणून खास तयारी आपल्या मुलांसोबत करावी.
२० मि: “आस्था कशी वाढवावी.” भाषण व प्रात्यक्षिके, सेवा देखरेख्याने हाताळावे. परिच्छेद ५ व ६ मधील काही कौशल्ये विवेचित करा. प्रात्यक्षिके सरळ व समजण्यास सोपे अशी ठेवा.
१० मि: “योग्य बोलक्या मुद्यांना निवडा.” क्षेत्र कार्यात जाण्यासाठी पति व पत्नी मधील चर्चा.
गीत १९८ (५०) व समाप्तीची प्रार्थना.
डिसेंबर २८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ५४ (७१)
१० मि: स्थानिक घोषणा. ह्या सप्ताहाअंती चालू सेवाकार्यात महिन्याच्या मासिकातून एका बोलक्या मुद्याचा उपयोग कसा करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. मागच्या आठवड्याच्या सेवा सभेत दिलेल्या प्रस्तावाचा वापर करा.
२० मि: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.” पंधरवडा मासिकाच्या पृ २८ व महिन्याला येणाऱ्या नोव्हेंबर १, १९९२ मासिकाच्या पृ ३०वरील लेखावर वडीलांचे भाषण. हा लेख इंग्रजी भाषेच्या ऑगस्ट १, १९९२च्या द वॉचटावर मध्ये प्रकाशित झाला आहे. यहोवाच्या करूणेचे व त्याच्या संस्थेपासून दूरावलेल्या व निष्क्रिय बनलेल्या लोकांच्या पुनरागमनास देवाने दाखवलेल्या संमतीवर जोर द्या. खरा आनंद मिळण्याची जागा म्हणजे केवळ यहोवाचीच संस्था आहे यावर जोर द्या.
१५ मि: “आपल्या प्रकाशनांना तुम्ही मौल्यवान समजता का?” उत्तेजनकारक भाषण.
गीत २४ (७०) व समाप्तीची प्रार्थना.