वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९३ पृ. २
  • जानेवारीसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जानेवारीसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • उपशिर्षक
  • जानेवारी ४ ने सुरु होणारा सप्ताह
  • जानेवारी ११ ने सुरु होणारा सप्ताह
  • जानेवारी १८ ने सुरु होणारा सप्ताह
  • जानेवारी २५ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९३
km १/९३ पृ. २

जानेवारीसाठी सेवा सभा

जानेवारी ४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २३ (११९)

१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा.

२५ मि: “यहोवाच्या साक्षीदारांचे १९९३ चे ‘ईश्‍वरी शिक्षण’ प्रांतिय अधिवेशन.” सचिवांकरवी पुरवणीवर प्रश्‍नोत्तरे. अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी सर्वांना उबदारपणे प्रोत्साहन द्या. अधिवेशनादरम्यान व राहत्या ठिकाणी आपले सुयोग्य आचरण एक चांगली साक्ष कशी देते ह्‍या मुद्यावर जोर द्या. त्या लेखातून प्रामाणिकपणा, आज्ञाधारकपणा, इतरांठायीचे प्रेम, आणि अशाच काही पवित्र शास्त्राच्या त्तत्वांवर जोर द्या. अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे श्रम व संस्थेच्या व्यवस्थेला पाठींबा दिला म्हणून सर्वांची प्रशंसा करा.

१० मि: “ईश्‍वरी भक्‍तिचे ध्येय ठेऊन स्वत:ला तालीम द्या.” ईश्‍वर शासित शाळेच्या पर्यवेक्षकांचे उत्तेजनात्मक भाषण. भाषण क्र. २ कसे दिले जावे हे स्पष्टपणे विवेचित करा, तसेच पवित्र शास्त्रावरील ठळक मुद्दे हा भाग हाताळणाऱ्‍या बांधवास आठवण करून द्यावी की भाषण क्र. २ला नेमून दिलेल्या भागावर त्याने विस्तारित माहिती देऊ नये.

गीत १३९ (७४) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी ११ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १६२ (८९)

१० मि: स्थानिक घोषणा. जानेवारी १८ला क्षेत्रकार्याची खास व्यवस्था केली असेल तर ती कळवा.

२० मि: “शांती व निर्भयतेच्या देवाच्या मार्गाचा प्रचार करा.” प्रश्‍नोत्तराने लेखाची चर्चा. प्रचारकांना क्षेत्र कार्यात हस्तपत्रिकांचा उपयोग करण्यास उत्तेजन द्या. ४था परिच्छेद हाताळल्यानंतर योग्य तयारी केलेल्या प्रचारकाला शांतिदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेतून प्रथम किंवा पुन:र्भटीत पवित्र शास्त्राभ्यास कसा चालू केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारक: “नमस्ते. आज आम्ही लोकांशी जीवनाच्या दर्जाविषयी बोलत आहोत. लोकांच्या जीवनात जे काही घडत आहे हे पाहून तुम्ही संतुष्ट आहात का?” घरमालक: “मुळीच नाही.” प्रचारक: “तुम्हाला वाटते का की ही परिस्थिती सुधारेल?” घरमालक: “मला काहीच माहिती नाही.” प्रचारक हस्तपत्रिका सादर करत म्हणतो: काहींचा असा विचार आहे की सध्या घडत असलेल्या घटना पवित्र शास्त्र भविष्यवाणीच्या अनुषंगाने आहेत व एक चांगले जग जवळ आहे. तुमचा काय विचार आहे?” घरमालक: “मला माहित नाही. मला वाटते असे होणे शक्य आहे.” मग प्रचारक हस्तपत्रिकेचा संदर्भ घेतो व स्पष्ट करतो की पवित्र शास्त्र असे अभिवचन देते की यहोवा लवकरच पृथ्वीवर नंदनवन स्थापित करील. सध्याच्या व्यवस्थेचा अंत नजीक आहे हा शास्त्रीय पुरावा दाखवण्यासाठी प्रचारक पुढच्या भेटीची योजना करतो.

१५ मि: रक्‍त संक्रमणाच्या समस्यांना टाळणे—ॲडवान्स मेडिकल डायरेक्टिवचे नूतनीकरण करण्याची ही वेळ आहे. हा भाग हाताळणाऱ्‍या वडिलांनी आक्टोबर १५, १९९१च्या पत्राचा काळजीपूर्वक विचार करावा, त्यात या कार्डाचा उपयोग कसा करावा ते सांगितले आहे. तयारी करताना, जानेवारी १, १९९०च्या संस्थेच्या पत्राची काळजीपूर्वक उजळणी करा. साक्षी यानात्याने जो कोणी सही करतो त्याने पहावे की कार्ड धारकाची सही त्यावर आहे. या सभेत सर्वांना नवे कार्ड मिळवण्याचे व राज्यसभा गृह सोडण्यापूर्वी ते भरुन घेण्याचे उत्तेजन द्या. बाप्तिस्मा घेतलेल्या प्रचारकांनी ॲडवान्स मेडिकल डायरेक्टिव/रिलीझ कार्ड घेतल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. साक्षीदार पालकांच्या बाप्तिस्मा न घेतलेल्या मुलांनी देखील आयडेंटिटी कार्ड सतत जवळ ठेवावे. एका मंडळीच्या अलिकडेच झालेल्या तपासणीत दिसून आले की प्रत्येक ५ प्रचारकांमधील एका कडे त्याचे कार्ड नव्हते, आणि कोणत्याही मुलाकडे त्यांचे आयडेंटिटी कार्ड नव्हते. शेवटी, नीतीसूत्रे २२:३ वाचा व ते लागू करा.

गीत १५१ (२५) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी १८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १३० (५८)

१० मि: स्थानिक घोषणा तसेच ईश्‍वरशासित वृत्त. जमाखर्च अहवाल व देणग्या मिळाल्याबद्दल संस्थेने कळविलेली पोच कळवावी. स्थानिक मंडळीला व संस्थेच्या जगभरातल्या कामासाठी निष्ठेने केलेल्या आर्थिक मदतीबद्दल मंडळीची उबदारपणे प्रशंसा करा.

२० मि: “महत्त्वपूर्ण साधनांचा सूज्ञतेने वापर करणे.” अध्यक्षांनी थोडक्यात प्रस्तावना केल्यावर, परिच्छेद २ ते ५ मधील माहितीवर आधारित दोन प्रात्यक्षिके करावीत. पहिल्या प्रात्यक्षिकाच्या अंतास, घरमालक दोन मासिके स्वीकारतो. देवाने दुखा:ला परवानगी का दिली? या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी प्रचारक पुन्हा येईल असे वचन देतो. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकाच्या शेवटी, एका योग्य हस्तपत्रिकेतून पवित्र शास्त्राभ्यास चालू केला जातो. ह्‍या सप्ताहांताच्या क्षेत्र कार्यात घरमालकाला शास्त्रीय चर्चेत सहभागी करण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या.

१५ मि: ख्रिस्तीजन रक्‍तापासून दूर का राहतात. वडिलांकरवी रिजनिंग पुस्तकातून, पृष्ठ ७०-२ वरील “ब्लड” या संज्ञेची व्याख्या तसेच त्या खालील पहिल्या तीन पोटमथळ्यांवर आधारित भाषण.

गीत १७७ (१६३) व समाप्तीची प्रार्थना.

जानेवारी २५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १२८ (१०)

१० मि: स्थानिक घोषणा आणि “प्रश्‍न पेटी”. बांधवांना त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी स्वत:हून संशोधन करण्यास उत्तेजन द्या पण त्यांच्या निदर्शनास हे आणा की त्यांच्या मंडळीतील वडिलासोबत संपर्क साधण्यासाठी वडील सदोदित तयार आहेत, व जरुरी भासल्यास, शास्त्रीय उत्तरे मिळण्यासाठी संस्थेसोबतही संपर्क साधू शकतात.

१५ मि: “पायनियर या नात्याने यहोवाची सेवा तुम्ही करु शकता का?” श्रोत्यांसोबत चर्चा. एका युवक व्यक्‍तिची जी नियमीत पायनियर आहे किंवा एक युवक प्रचारक ज्याने पायनियरींग केली अशांची मुलाखत घ्या. पालक तसेच इतर लोक युवकांना पायनियरींग करण्याचे त्यांचे ध्येय गाठण्यासाठी कसे प्रोत्साहन देऊ शकतात हे ठळकपणे सांगा. सर्वांना पूर्णवेळेच्या सेवेत सहभाग घेण्याच्या शक्यतेच्या गंभीरतेवर विचार करण्यास उबदारपणे आर्जवा. एप्रिलमध्ये पायनियरींग करण्याची योजना करा.

२० मि: “प्रभावकारी पुन:र्भटी घेण्याद्वारे आस्था वाढवा.” संक्षिप्त भाषण दिल्यानंतर परिच्छेद ३ मधील संभाषणाचे प्रात्यक्षिक. वेळ अनुमती देत असेल तर, सादरतेच्या काही मुख्य मुद्यांवर, जसे की प्रस्तावना किंवा शास्त्रीय मुद्यांकडे वळणे यांवर पुनरावृत्ती करु शकता.

गीत १६० (८८) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा