यहोवाच्या साक्षीदारांचे १९९३ चे “ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशन
१ जगभर १९९२ च्या “ज्योतिवाहक” प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या सर्वांनाच या अंधकारमय जगात ज्योती वाहक या नात्याने सेवा करण्याच्या आपल्या हक्काची मोठी कदर वाटली. (२ पेत्र १:१९) सबंध जगात हजारो प्रिय जनांनी आपल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला व तेही ज्योतिवाहकांच्या त्या भव्य समूहात आले हे पाहणे किती थरारक होते! यात प्रभावशाली ठरण्याकरता ज्योतिवाहकांनी आमचा महान शिक्षक तसेच थोर शिक्षक या दोघांचेही अनुकरण करणे जरूरीचे आहे. आपणापाशी “एकंदर” संदेश आहे, आणि या वर्षीचे “ईश्वरी शिक्षण” प्रांतिय अधिवेशन देखील आम्हाला या महत्त्वपूर्ण माहितीनिशी लोकांच्या हृदयाप्रत जाण्यास अधिक प्रभावी बनण्यात मदत करील. (स्तोत्र. ११९:१६०; मत्तय २८:२०) सर्व जगभर पसरलेले मिशनरी आपल्या स्वदेशी या अधिवेशनांना उपस्थित राहण्याची आतापासूनच तयारी करीत आहेत. तुम्ही व तुमचे कुटुंब देखील या अधिवेशनाची तयारी करीत आहात का? या समृद्ध आध्यात्मिक मेजवानीला तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याला देखील उपस्थित राहण्याचे का उत्तेजन देऊ नये?
२ तुमच्या अधिवेशनाची तयारी काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक करा की ज्यामुळे तुम्हाला चारही दिवस, सुरवातीच्या गायनापासून ते शेवटल्या प्रार्थनेपर्यंतच्या आनंदी आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. तुमच्या योजनेत, नव्याने आस्था घेणाऱ्या लोकांचाही प्रेमळपणे विचार ठेवा म्हणजे यांनाही प्रत्येक कार्यक्रम सत्राला उपस्थित राहता येईल. (गल. ६:१०) कार्यक्रम गुरुवारी दुपारी १.३० वाजता सुरु होऊन सायंकाळी साधारणतः ५ वाजता संपेल. शुक्रवार व शनिवार या दोन्हीही दिवशी कार्यक्रमाची सुरवात सकाळी ९.२० ला होऊन तो समाप्तीचे गीत व प्रार्थना याद्वारे साधारण सायंकाळी ५ वाजता संपेल. आणि रविवारी सकाळी कार्यक्रम ९.२०ला सुरु होऊन तो दुपारी साधारण ४.१० पर्यंत संपेल. पुढील माहिती तुमच्या तयारीच्या आरंभीच्या गोष्टींबद्दल तुम्हाला मदत देऊ शकेल.
३ भारतात या वर्षी १८ अधिवेशनांची योजना केली असून पहिले अधिवेशन सप्टेंबरच्या शेवटाला सुरु होईल हे जाणून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ही अधिवेशने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात चालू राहतील व शेवटी डिसेंबर महिन्यात दोन अधिवेशने केरळमध्ये भरतील. तुम्हाला याची कल्पना असेल की गेल्या काही वर्षात आपण साधारण ३० अधिवेशने घेत होतो. या वर्षी कमी अधिवेशने ठरवण्यात आली त्याचे कारण हे की, प्रत्येक अधिवेशनात अधिकाधिक बांधव एकत्र येऊ शकतील आणि काही अधिवेशनांची तर खूपच मोठी उपस्थिती राहील अशी आम्ही अपेक्षा धरतो. मोठी उपस्थिती बांधवांमध्ये अधिक उत्साह निर्माण करील व ती बाहेरील लोकांना उत्तम साक्ष ठरेल. यामुळे आम्हाला अधिवेशनातील वक्त्यांची निवड अधिक निर्णायकरित्या करता येईल व यामुळे अधिवेशनाचा दर्जाही उंचावू शकेल.
४ राहण्याच्या जागा मिळवण्याबाबत सूचनाः नेहमीप्रमाणे यंदाही आम्ही तुम्हाला राहण्याच्या जागेचे अर्ज पाठविणार आहोत. अधिवेशनातील रुमिंग खात्यामार्फत जागा मिळवू इच्छिणाऱ्यांनी या अर्जावर आवश्यक असणारी सर्व माहिती नीटपणे व सुवाच्य रितीने भरली पाहिजे व तो मंडळीच्या सचिवांना किंवा अधिवेशन संयोजकांना तपासणी, स्वाक्षरी करण्यासाठी द्यावा. ते तुम्ही उपस्थित राहू इच्छिणाऱ्या शहरातील अधिवेशनाच्या रुमिंग खात्याकडे त्वरेने रवाना करतील. ही गोष्ट तुमच्या अधिवेशनाच्या बऱ्याच आधी करावी. एका खोलीसाठी एक अर्ज भरावा. या खोलीत जी माणसे राहणार त्यांचीच यादी या फॉर्मवर द्यावी. ही यादी मोठी असल्यास रुमिंग खाते यापैकीच्या काही व्यक्तींची सोय दुसऱ्या खोलीत करतील.
५ तुम्हाला हॉटेलमधील एक खोली घ्यावयाची आहे तर तसे फॉर्मवर नमूद करा आणि सोबत किती भाडे तुम्ही देऊ शकता तेही उजव्या हाताच्या रकान्यात लिहा. रुमच्या अर्जाचा फॉर्म देताना सोबत तुम्ही जितके दिवस राहणार तेवढा आकार देखील मनिऑर्डरने पाठवीत आहात याची खात्री करा. अलिकडील पोष्ट बटवड्याची दिरंगाई तसेच गहाळपणा बघता हे काम तुम्ही अगाऊपणे केलेले बरे असेल. तुम्ही आपले पत्र रजिस्टर्ड ए. डीने पाठवणे बरे ठरेल.
६ अर्जात नमूद केल्याप्रमाणे तुमची खोली मिळाल्यावर लगेच तुम्हाला कळविण्यात येईल. एकदा ही व्यवस्था केल्यावर कृपया तुम्हास नेमून दिलेल्या खोलीचा स्वीकार करावा; कारण तुम्ही अर्जात नमूद केलेल्या दिवशी येणार आहात याबद्दल घरमालकाला किंवा हॉटेलच्या व्यवस्थापकांना कल्पना देण्यात आलेली असते.
७ अधिवेशनाच्या शहरी ज्या दिवशी येण्याची तुमची योजना आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच दिवशी तेथे आहात याची पुन्हा एकदा खात्री करा, कारण याप्रमाणेच तुमच्या विनंतीनुसार तुमच्या खोलीचे आरक्षण करण्यात आलेले असते. अधिवेशन शहरात आल्यावर तुम्हाला नेमून दिलेल्या जागी लवकरात लवकर जा. ठरविलेल्या वेळेप्रमाणे तुम्हाला येता येत नसेल तर हॉटेल व्यवस्थापकांना किंवा खाजगी घरमालकांना कृपया तसे कळवा.
८ खास गरजा: खास गरजा असणाऱ्या लोकांची काळजी, ते उपस्थित राहात असणाऱ्या शहरी घेण्यासाठी मंडळीने व्यवस्था केली पाहिजे. त्या विशिष्ठांच्या गरजांची कल्पना असणाऱ्या वडील व इतरांनी प्रेमळपणे मदत द्यावी. पूर्ण वेळेचे कार्यकर्ते, वृद्ध, अपंग व इतरांचा प्रचारकांनी विचार करावयास हवा. ही काळजी प्रचारक, अशांना आपणासोबत घेण्याद्वारे किंवा इतर मार्गाने वाहू शकतील.—याकोब २:१५-१७; १ योहान ३:१७, १८.
९ विशिष्ट गरजा असणाऱ्या प्रचारकांना त्यांच्या मंडळीतील लोकांकडून मदत मिळणे शक्य नसल्यास अधिवेशनाचे रुमिंग खाते योग्य त्या खोलीची व्यवस्था करून देण्यामध्ये आवश्यक ते सर्व करण्याचा प्रयत्न करतील. खास गरजा असणाऱ्या प्रचारकांनी आपल्या गरजांबद्दल मंडळीच्या सचिवांना सांगावे. सचिवांनी मंडळीच्या सेवा समितीला ही माहिती द्यावी आणि त्या विशिष्ट बांधवाच्या राहण्याच्या जागेसाठी मंडळीला काही करता येईल का ते बघावे. मंडळीला हे साहाय्य देता येणे शक्य नसल्यास सचिवाने अधिवेशनाच्या रुमिंग खात्याला वेगळे पत्र द्यावे. यात सचिवांनी सविस्तर माहिती कळवावी. हे सर्व काही अधिवेशनाच्या बऱ्याच आधी व्हावयास हवे. ती विनंती करणाऱ्या त्या विशिष्ट प्रचारकाला त्याच्या राहण्याच्या जागेबद्दल थेटपणे कळवले जाईल.
१० खाजगी घरी राहण्याची जागा कधी कधी मिळू शकते व त्याकरता देखील अर्ज करता येतील. अशी विनंती करणाऱ्यांनी अधिवेशनाआधी व नंतर काही दिवस त्या बांधवांच्या घरी राहून त्यांच्याकडील पाहुणचार घेता येईल असे वाटून घेऊ नये. या खोल्या केवळ अधिवेशनापुरत्याच उपलब्ध केल्या जातील. अशा जागा मिळालेल्यांनी, ते व त्यांची मुले घरमालकासोबत आदराने वागत आहेत व त्यांच्या जागेची नासधूस करीत नाही आणि घराच्या खाजगी विभागात जात नाहीत याची दखल घेतली पाहिजे. खोलीत राहणाऱ्या लोकांना काही अडचणी वाटत असल्यास त्या त्यांनी लगेच अधिवेशनात रुमिंग खाते सांभाळणाऱ्या देखरेख्यांच्या नजरेस आणाव्या, म्हणजे ते याबाबत योग्य ती हालचाल आनंदाने करू शकतील.
११ बाहेरुन उपस्थित राहणारे प्रतिनिधी: तुम्हाला ज्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची नेमणूक मिळाली आहे ती तुमच्या मंडळीस जवळ असणारी आहे. जेवढ्या मंडळ्यांना एखाद्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची नियुक्ती ठरविलेली आहे तेवढ्यापुरती बसण्याच्या जागेची व्यवस्था, प्रकाशने, अन्न, राहण्याच्या जागेची व्यवस्था व इत्यादि सोयी करण्यात आलेल्या असतात. तरीपण, काही कारणास्तव, तुम्हाला नेमून दिलेल्या अधिवेशनापेक्षा इतर अधिवेशनाला उपस्थित राहावे लागत असल्यास तुम्ही आपला राहण्याच्या जागेचा विनंती अर्ज त्या अधिवेशनाच्या कार्यालयाला पाठवावा; याचा पत्ता आम्ही जी यादी नंतर पाठवणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला मिळू शकेल.
१२ तुमचे सहकार्य जरूरीचे आहे: राहण्याच्या जागेच्या कामातील यश त्यात संबंधित असणाऱ्या सर्वांच्या सहकार्यावर अवलंबून असते. (इब्री. १३:१७) या कारणामुळेच आम्ही सर्वांना संस्थेच्या राहण्याच्या जागेच्या व्यवस्थेला सहकार्य देण्याचे आर्जवीत आहोत, ज्यामुळे आम्हाला काही हॉटेल व्यवस्थापकांसोबत कराव्या लागणाऱ्या दळणवळणामधील अडचणी दूर होऊ शकतील. मागील अधिवेशन पुरवणीत दिलेल्या मार्गदर्शनाचा बहुतेक प्रचारकांनी अवलंब केला आहे व यामुळे अनेक चांगले परिणाम मिळाले आहेत. तरीपण अजूनही प्रत्येकाला ही विनंती करावीशी वाटते की, हॉटेलमधील राहण्याची व्यवस्था करून हवी असल्यास कृपया पुढील मार्गदर्शनाला अनुसरावे:
(अ) राहणार नाही अशा हॉटलेकरता स्वतःचे आरक्षण कृपया करू नका, किंवा एकापेक्षा अधिक हॉटेलचे आरक्षण करून कोणते सोयीस्कर वाटते ते घ्यावे व इतरांना रद्द करावे असे काही करू नका. (मत्तय ५:३७) हे योग्य नाही, कारण यामुळे हॉटेलच्या व्यवहारात अडथळा निर्माण केला जातो व ज्या इतर प्रचारकांना खोल्यांची आवश्यकता असते अशांना त्या मिळू शकत नाही.
(ब) आपले नाव न देता तसेच योग्य ती अगाऊ रक्कम न भरता स्वतःसाठी व इतरांसाठी खोल्या आरक्षित करून ठेवू नका.
(क) कायदा व हॉटेल व्यवस्थापनाने ठरवून दिलेल्या व्यक्तींव्यतिरिक्त अधिकांचा भरणा त्या खोलीत करू नका. साधारणपणे मुलांसहित चार वा पाच व्यक्तींना राहण्याची परवानगी असते. तुम्ही जितक्या व्यक्ती राहणार हे आधी फॉर्मवर ठरवलेले असते त्यांच्या आकारानुरुप पैसे भरत असता हे लक्षात ठेवा.
१३ हे नियम न राखल्यामुळे चांगल्या दरात हॉटेलच्या खोल्या मिळणे मुष्किलीचे होते व यामुळे यहोवाचे नाव व संस्था यांना काळिमा लागतो. (स्तोत्र. ११९:१६८) या कारणास्वत, संस्था रुमिंग खात्याला हॉटेल व्यवस्थापनाला भेट देऊन त्यांच्याकडील काही तक्रारी आहेत का हे विचारण्यास सांगेल व असल्या तर त्या कोणासंबंधाने आहेत ते बघावयास लावील. आपल्या बांधवांना जादा खर्च होऊ नये यासाठी अधिवेशन संघटना पराकाष्ठेचे प्रयत्न करीत आहेत व या कारणामुळे सर्वांनी संस्थेच्या रुमिंग खात्याला सहकार्य द्यावे हे सर्वांच्या हिताचे आहे. सहकार्य देणाऱ्या हॉटेलमध्ये चांगल्या प्रतीच्या राहण्याच्या जागा मिळविण्याचा प्रयत्न रूमिंग खाते करते. आमचे उद्दिष्ट अधिवेशन प्रतिनिधींना आरामदायी व आर्थिक दृष्ट्या शक्यतो स्वस्त असणाऱ्या जागा मिळवण्याचे आहे. यामुळे त्यांना अधिवेशनातील सुंदर आध्यात्मिक कार्यक्रमाचा चांगला स्वाद घेता येईल.