घोषणा
▪ प्रकाशन देणगीः
मार्च: यंग पीपल आस्क पुस्तक २० रुपयाला. ज्या भाषांमध्ये हे उपलब्ध नाही तेथे अनंतकाळ जगू शकाल हे पुस्तक ४० रुपयाला सादर केले जाऊ शकते. (लहान आकाराचे २० रुपयाला).
एप्रिल व मे: वॉचटावर वर्गणी. पंधरवडा अंकासाठी एक वर्षाची वर्गणी ६० रुपये. पंधरवडा अंकाची सहा महिन्यांची व मासिक अंकाची एक वर्षाची वर्गणी ३० रुपये. (महिन्याला प्रकाशित होणाऱ्या मासिकाची सहा महिन्याची वर्गणी नाही.)
जून: द ग्रेटेस्ट मॅन हू एव्हर लीव्हड ४० रुपयाला सादर करावे.
टीप: ज्या मंडळ्यांनी अजूनपर्यंत वरील नमूद केलेल्या मोहीम प्रकाशनांची मागणी केली नसेल तर त्यांनी त्यांच्या पुढच्या लिट्रेचर ऑडर्र फॉर्म (S-14) वर करावी.
▪ अध्यक्षीय पर्यवेक्षक किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणीतरी मंडळीचा हिशेब मार्च १ किंवा शक्यतो लवकर तपासावा. तो पूर्ण झाल्यावर मंडळीत घोषणा करावी.
▪ फेब्रुवारी १४, १९९२ तारखेला संस्थेने सर्व मंडळयांना लिहिलेल्या पत्रात, मिशनऱ्यांनी त्यांच्या मायदेशी भेट देऊन या वर्षातील प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी, १९९३ अधिवेशनाच्या फंडाची घोषणा केली होती. ही वर्गणी पाठविण्याचा मार्च हा शेवटला महिना आहे. या व्यवस्थेसाठी तुम्ही सढळ हाताने केलेल्या सहकार्याची आम्ही गुणग्राहकता बाळगतो.
▪ मे १०, १९९३ च्या आठवड्या पासून, द ग्रेटस्ट मॅन हू एव्हर लीव्हड पुस्तकाचा मंडळीच्या पुस्तक अभ्यासासाठी वापर केला जाईल, यास्तव मंडळीने त्याची मागणी आताच करावी जेणेकडून ते त्यांना वेळेत मिळू शकेल. हे पुस्तक सध्या इंग्रजी, गुजराती आणि मल्याळम मध्ये उपलब्ध आहे.
▪ भारतात झालेल्या ३० “ज्योती वाहक” प्रांतीय अधिवेशनात एकूण २०,६९७ लोकांची उपस्थिती होती. या सर्व अधिवेशनात ७१९ व्यक्तींनी बाप्तिस्मा घेतला होता.
▪ सोसायटीकडून आता ‘मेडीकल डॉक्युमेंट’ (md) साठी प्लास्टीक होल्डरची मागणी करू शकता. पायनियर तसेच प्रचारकांसाठी रुपये १.५० दरात हे उपलब्ध असेल.