ईश्वरशासित वृत्त
बोझनिया आणि हर्जझिगोविनियाः ऑस्ट्रीया व क्रोटिया मधील बांधवांकडून मदतीची सामग्री प्राप्त झाली. अनेक प्रचारक या लढायांनी जेरीस आणलेल्या भागातून पळून गेले.
फिजीः खास संमेलनाच्या दिवसाची उपस्थिती ३,८९० होती व ही संख्या सप्टेंबर मध्ये १,४०४ प्रचारकांनी अहवाल दिला, त्या संख्येच्या दुप्पट होती.
फ्रेंच गयानाः ऑक्टोबरमध्ये ९४८ प्रचारकांनी अहवाल देऊन १५वे क्रमानुसार शिखर गाठले. प्रचारकार्यात मंडळीच्या प्रचारकांची सरासरी १५.१ तासांची होती.
हाँगकाँगः ऑक्टोबरमध्ये २,७०४ प्रचारकांनी नवे शिखर गाठले. त्यांनी ४,०४३ पवित्र शास्त्र अभ्यास चालविले हे पाहणे किती चांगले होते.
जमेकाः नोव्हेंबर ७, १९९२ मध्ये पहिल्या संमेलन सभागृहाचे सर्मपण केले, त्याची उपस्थिती ४,४६९ होती.
जपानः सप्टेंबरमध्ये प्रचारकांचे नवे शिखर १,७२,५१२ होते.
मादागास्करः पाच “ज्योती वाहक” अधिवेशनात १०,६९४ उपस्थिती होती व त्यात २४१ जनांनी बाप्तिस्मा घेतला. त्यांच्या ४,५४२ प्रचारकांच्या संख्येच्या तुलनेत ही उपस्थिती दुप्पट होती.
नायगरः नव्या सेवा वर्षाची सुरुवात १६९ प्रचारकांचे नवे शिखर तसेच ३,२५२ पुनःर्भेटीने करण्यात बांधवांना आनंद झाला.
रिʹयुनियनः सप्टेंबरमध्ये २,११३ प्रचारकांचे नवे शिखर तसेच पुनःर्भेटी आणि पवित्र शास्त्र अभ्यासाच्या नव्या उच्चांकाचा अहवाल दिला.
स्वाझीलँडः सप्टेंबरमध्ये १,५४३ प्रचारकांनी नवे शिखर गाठले, आणि प्रचारकार्यात मंडळीच्या प्रचारकांच्या तासांची सरासरी १३.८ होती.