वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९३ पृ. २
  • डिसेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डिसेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • उपशिर्षक
  • डिसेंबर ६ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर १३ ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर २० ने सुरु होणारा सप्ताह
  • डिसेंबर २७ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९३
km १२/९३ पृ. २

डिसेंबरसाठी सेवा सभा

डिसेंबर ६ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०५ (११८)

१० मि:स्थानिक घोषणा तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा.

२० मि:“इतरांना देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताबद्दल शिकण्यास मदत करा.” प्रश्‍नोत्तराने हाताळावे. परिच्छेद २ मध्ये (अनुभवी प्रचारकाद्वारे) आणि परिच्छेद ४ मध्ये (युवक प्रचारकाद्वारे) सादरतेची प्रात्यक्षिके दाखवा. सर्वांना, घरोघरच्या आणि अनौपचारिक साक्षकार्यामध्ये, सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करण्यास उत्तेजन द्या.

१५ मि:“मासिक कार्यासाठी वेळ राखून ठेवा.” श्रोत्यांची सहभागिता असलेले भाषण. परिच्छेद ३ विचारात घेताना, स्थानिक क्षेत्रात भेटणाऱ्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना चालू मासिकांतील विविध लेख कसे सादर केले जाऊ शकतील त्याचे स्पष्टीकरण द्या.

गीत १६९ (२८) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर १३ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १४६ (८०)

१० मि:स्थानिक घोषणा, जमाखर्च अहवाल, आणि देणगीची पोचपावती. स्थानिक गरजा तसेच संस्थेच्या राज्य सभागृहाच्या निधीसाठी आणि संस्थेच्या जगव्याप्त कामासाठी सढळ हाताने आर्थिक मदत दिल्याबद्दल मंडळीची प्रशंसा करा. या सप्ताहांती क्षेत्र सेवेतील प्रस्तावनेच्या विवेचनात उपयोगात आणता येतील असे, एक किंवा दोन बोलके मुद्दे सुचवा.

२० मि:“तुमच्या पवित्र शास्त्र विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोंचा.” प्रात्यक्षिकाद्वारे प्रश्‍नोत्तराने चर्चा. मंडळीतील सर्वांनी शिकवण्याची कला वाढवण्यासाठी कार्य करावे यावर जोर द्या. परिच्छेद ३ विचारात घेतल्यावर प्रचारक, अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील अध्याय १ च्या १३ आणि १४ परिच्छेदांमधील प्रश्‍ने आणि शास्त्रवचनांचा उपयोग करून, पवित्र शास्त्र विद्यार्थ्यासोबत तर्क कसा करावा हे दाखवतो.

१५ मि:“वार्षिक अहवाल—प्रोत्साहनाचा खजिना.” उल्लेखलेल्या शास्त्रवचनांचा अवलंब दाखवून देणारे उत्साही भाषण. जानेवारी १, १९९०, जानेवारी १, १९८७, आणि जानेवारी १, १९८६ च्या द वॉचटावर इंग्रजी अंकांच्या ३२ पानावरील अनुभवांना, किंवा तुमच्या भाषेतील द वॉचटावर मधील उचित अनुभवांना आणि लेखामधील अनुभवाला भावनोत्कटतेने कथन करण्यास चांगला सराव केलेल्या प्रचारकांची योजना करा.

गीत १६५ (८१) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २० ने सुरु होणारा सप्ताह

गीत १८९ (९०)

१५ मि:स्थानिक घोषणा. डिसेंबर २५ रोजी खास साक्षकार्याच्या स्थानिक व्यवस्थेबद्दल सांगा.

२० मि:“डिसेंबर दरम्यान पवित्र शास्त्राभ्यास सुरू करणे.” श्रोत्यांसोबत चर्चा. परिच्छेद ४ विचारात घेताना, पुनर्भेटीच्या वेळी पवित्र शास्त्राभ्यास कसा सुरू करावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. दर महिन्यात, शक्य असल्यास एक गृह पवित्र शास्त्राभ्यास चालवण्याचे प्रत्येकास उत्तेजन द्या.

१० मि:“विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम.” प्रश्‍नोत्तराने चर्चा. अशा संमेलनांना उपस्थित राहण्याच्या लाभांबद्दल सांगा आणि येणाऱ्‍या श्रृंखलेतील ठळक मुद्दे दाखवा. संमेलनाच्या तारखांना घोषित केल्याबरोबर लगेच, उपस्थित राहण्याच्या योजना करण्यास सर्वांना प्रोत्साहन द्या.

गीत ६१ (१३) व समाप्तीची प्रार्थना.

डिसेंबर २७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ३७ (९४)

१० मि:स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त. जानेवारी १ साठी खास साक्षकार्य व्यवस्थेची घोषणा करा. जानेवारीत स्थानिकरित्या सादर केल्या जाणाऱ्‍या साहित्याचा कसा उपयोग करावा याचे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि:मादक पदार्थांचा अनुभव घेण्यात काय चुकीचे आहे? शाळेत मादक पदार्थांच्या सर्रास उपयोगाविषयी दोन युवक प्रचारक वडिलांसोबत चर्चा करतात. काही तरुणांना मादक पदार्थांचा अधूनमधून उपयोग करण्यात काहीच चुकीचे दिसत नाही, असे ते सांगतात. वडील मान्य करतात की, ते शाळेत जात होते तेव्हापासून परिस्थिती खालावली आहे. ते दाखवतात की, पवित्र शास्त्रात या पदार्थांचा विशिष्ट उल्लेख केला नाही परंतु, रिझनींग पुस्तकावरील पाने १०६-१२ वर मादक पदार्थांच्या उपयोगाबद्दल उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल. युवक, शास्त्रवचने वाचतात व साहित्य संपूर्णतः हाताळले जात असताना, वडील त्यांच्यासोबत तर्क करतात. वैयक्‍तिकरित्या समवस्कांकडील दबावाचा प्रतिकार करण्यासाठी मदत करणाऱ्‍या विविध मार्गांबद्दल युवक स्वतःचे सल्ले सादर करतात.

१५ मि:स्थानिक गरजा किंवा द वॉचटावर, ऑगस्ट १५, १९९३ च्या पंधरवडा आवृत्तीच्या (इंग्रजीसह) पृ. २७-३० वर “हाऊ ख्रिश्‍चन्स्‌ कॅन हेल्प द एल्डर्ली,” यावर आधारित वडिलांचे भाषण. ज्या भाषेत द वॉचटावर महिन्याला छापले जाते त्या भाषेचा उपयोग करणाऱ्‍या मंडळ्या, “वाट पाहण्याचे शिकून घेणे याची समस्या” या प्रादेशिक मासिक आवृत्तीच्या ऑक्टोबर १, १९९३ च्या अंकातील लेखावर आधारित भाषण देऊ शकतात. (हा लेख, इंग्रजी तसेच इतर पंधरवडा आवृत्तींमध्ये, ऑक्टोबर १५, १९९३ च्या पृ. ८-११ वर आहे.)

गीत १२० (२६) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा