अर्थपूर्ण पुनर्भेटींद्वारे वाढीस चालना द्या
१ आस्था दाखवलेल्यांची मदत करण्यासाठी आम्ही, नियमित पुनर्भेटींद्वारे आध्यात्मिक अन्नाचा पुरवठा पुरवत राहणे महत्त्वाचे आहे. आमच्या भेटी त्यांच्या आध्यात्मिक वाढीस चालना देण्यास प्रगतीशीलपणे मदत करतील. (१ करिं. ३:६-९) आमच्या पुनर्भेटी अर्थपूर्ण असण्याकरता, त्या व्यक्तीला लक्षात ठेवून आम्ही वेळेआधीच तयारी करणे आवश्यक आहे.
२ ज्यांना पत्रिका देऊन आलो आहोत अशांची पुनर्भेट घेणे: कामात असलेल्या घरमालकाकडे पहिल्या भेटीत कदाचित शांतीदायक नवीन जगातील ही पत्रिकाच दिली असेल.
कशाबद्दल चर्चा केली होती यावर संक्षिप्तपणे पुनर्विचार केल्यावर, आम्ही असे विचारू शकतो:
▪“अशाप्रकारचे बदल कोणते सरकार आणू शकते? [अभिप्रायासाठी वाव द्या.] तुम्हाला देखील अशाच परिस्थितींमध्ये राहण्यास आवडेल, यात काही शंका नाही. आम्ही व्यक्तिगतरित्या अशा परिस्थितींचा आनंद कसा घेऊ शकतो?” त्यानंतर, “तुम्हास ते कसे शक्य आहे,” या उपशिर्षकाखालील साहित्य विचारात घेतले जाऊ शकते. या भेटीच्या वेळी, अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील, “अनंतकाल जगण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे,” या अध्याय ३० कडे लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. आम्ही पहिल्या दोन परिच्छेदांची चर्चा केल्यावर असा प्रश्न विचारू शकतो: “देवाविषयी शिकल्यामुळे, आम्हावर त्याचा कोणता परिणाम व्हायला हवा?” पुस्तक सादर केले जाऊ शकते आणि त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आणि त्या विषयावर पुढील भेटीत चर्चा करण्यासाठी व्यवस्था केल्या जाऊ शकतात.
३ “अनंतकाल जगू शकाल” पुस्तक दिलेल्या लोकांना, आम्ही पुनर्भेटी देत असताना असे म्हणू शकतो:
▪“मागच्या वेळी मी भेट दिली तेव्हा, मानवजात तोंड देऊन असलेल्या पुष्कळ समस्यांबद्दल आणि देवाने त्यांच्याबाबतीत कोणती अभिवचने दिली आहेत यांच्याबद्दल आपण चर्चा केली होती. देवाने दुष्टपणाला एवढ्या काळापर्यंत परवानगी का दिली, याबद्दल प्रश्न उठला होता. तुम्ही मिळवलेल्या पुस्तकातील अध्याय ११ मध्ये याचे मनोरंजक उत्तर सापडते.” घरमालकास सोयीस्कर असल्यास, त्यांची प्रत घेऊन येण्यास सांगा. काही परिच्छेदांचा विचार केल्यावर, आम्ही विचारू शकतो: “देवाच्या अभिवचनांकडून लाभ मिळवून घेण्यास आम्हाला काय करण्याची गरज आहे?” पुढील पुनर्भेटीसाठी, पान १२७ वरील “देवाच्या सरकारची प्रजा बनणे,” या १५ व्या अध्यायातील साहित्य, चर्चेसाठी वापरले जाईल हे दाखवून द्या.
४ आम्ही ज्यांना नियतकालिके दिली आहेत अशांची पुनर्भेट घेणे: घरमालकाच्या आवडीचा विशिष्ट लेख तुम्ही निवडला असाल तर, तुम्ही पुन्हा येता तेव्हा त्या लेखातील अधिक मुद्यांना वाढवा व तुमची विवेचने एकाच मुख्य शास्त्रवचनावर आणि चर्चा करत असलेल्या साहित्यावर केंद्रित करा. आस्था वाढत असेल तर, नियतकालिकांच्या लाभांची चर्चा केली जाऊ शकते. तसेच, त्याच विषयावर चर्चा करणारा लेख त्या नियकालिकातील पुढील अंकात असेल तर त्याकडे देखील लक्ष वेधले जाऊ शकते. किंवा, अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील त्या विषयाच्या साहित्याकडे आम्ही लक्ष वेधवू शकतो आणि आमच्या पुढील भेटीत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी व्यवस्था करू शकतो.
५ अर्थपूर्ण पुनर्भेटींद्वारे नेहमी नेहमी जात राहून, वैयक्तिक आस्था दाखवल्याने लोकांसाठी आणि यहोवासाठी आमचे प्रेम प्रदर्शित केले जाईल. (योहान १३:३४, ३५) आम्ही, आमच्या क्षेत्रातील लोकांची आध्यात्मिक वाढ नियमितपणे अर्थपूर्ण पुनर्भेटी करण्याद्वारे उत्तेजित करत राहू या.