नव्या माहितीपत्रकाचा परिणामकारकतेने वापर करणे
अलीकडच्या प्रांतीय अधिवेशनात, व्हेन समवन यू लव डाईझ हे माहितीपत्रक मिळाले तेव्हा आपल्याला किती आनंद झाला होता. ते सर्व प्राकारच्या लोकांना अपीलकारक असले पाहिजे कारण बहुतांश लोक एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुःखित झाले आहेत. त्यातील आकर्षक चित्रे आणि उदाहरणे ते लोकांना सादर करण्यास आणखी सोपे करते. पृष्ठ २९ वर लाजरला मृतातून उठवण्याचे नाट्यमय चित्र, येशूला “मृत्यू नाहीसा करण्याची तीव्र इच्छा” असल्याचे दाखवते. पुढील संपूर्ण पानावरचे चित्र नव्या जगातील पुनरुत्थानाच्या आनंदी दृश्याचे चित्रण करते. जे शोक करतात अशांच्या अंतकरणात ते किती प्रोमळ भावना उत्पन्ना करते!
२ हे माहितीपत्रक मृत्यूमुळे दुःखित झालेल्यांना सांत्वन देण्यात बरेच मदतदायी ठरू शकते. ते संभाषणरुपी चर्चेसाठी खास तयार केले आहे. ठळक प्राश्न प्रात्येक पानाच्या खालील बाजूला नव्हे तर प्रात्येक विभागाच्या शेवटी एका चौकोनात दिले आहेत. तुमच्या विद्यार्थ्याला जास्त मदतदायी ठरेल असे तुम्हाला वाटते त्याप्राकारे तुम्ही “विचार करण्यासाठी प्राश्न” यांचा वापर करू शकता.
३ पुनर्भेटी करताना माहितीपत्रकातील निवडक मुद्यांची चर्चा करा. तुम्हाला कदाचित पृष्ठ २ वरील अनुक्रमणिकेतील विषय घरमालकास दाखवून त्याला कोणता विषय आवडतो हे विचारावेसे वाटेल. प्रात्येक व्यक्तीच्या गरजांविषयी संवेदनाक्षम असा. त्याला त्याच्या भावना व्यक्त करू द्या आणि मग तुम्ही त्याला माहितीपत्रकातील सांत्वनपर शब्द दाखवा. आपल्या आशेला आधार मिळावा म्हणून प्रात्येक विभाग बायबल वचनांचा भरपूर उपयोग करतो.
४ पृष्ठ ५ वरील उपशिर्षक, “देअर इज ए रीयल होप,” मृतांसाठी सांत्वनदायक बायबल आधारित आशा ठळकपणे मांडते. यामुळे २६-३१ पानांवरील “ए शूअर होप फॉर द डेड” याची चर्चा करण्यास घरमालकामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे. पृष्ठ २७ “टेक्स्टस् दॅट कमफर्ट” सादर करते. यहोवा खरोखर “सर्व सांत्वनदाता देव” आहे हे त्या दुःखित घरमालकाला लवकरच समजून येईल.—२ करिंथ. १:३-७.
५ माहितीपत्रकातील इतर विभाग एखाद्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्या विविध प्रातिक्रिया दाखवल्या जातात त्यांना व्यवहारचातुर्याने हाताळतात. दुःखाचा सामना कसा करावा तसेच अशा दुःखद समयी इतर जण कशी मदत करू शकतात हे ते दाखवते. पृष्ठ २५ वर “मुलांना मृत्यूचा सामना करण्यास मदत करणे” असे शीर्षक असलेला एक चौकोन आहे. या समस्येचा सामना करणाऱ्या पालकांना हे खरोखर मदतदायी ठरावयास हवे.
६ एखादी जादा प्रात जवळच ठेवा व ती अनौपचारिक साक्षकार्य करताना वापरा. तुमच्या क्षेत्रात कोणत्याही स्मशानातील व्यवस्थापन गृहांना भेटी देऊन दुःखित कुटुंबांना सांत्वन देण्यासाठी आपण वितरण करत असलेल्या प्राती ठेवावयास त्यांना आवडतील का हे पाहण्यास तुमची इच्छा असेल. किंवा दुःखित जण काही वेळा एखाद्या प्रिय व्यक्तीच्या कबरेला भेट देण्यास स्मशानात येतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे चातुर्याने जाऊ शकता.
७ यहोवा “दीनांचे सांत्वन करणारा देव” आहे याचा आपल्याला आनंद होतो. (२ करिं. ७:६) “शोकग्रस्तांचे सांत्वन” करण्यात भाग घेणे हा आपण एक विशेषाधिकार समजतो.—यश. ६१:२.