वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/९४ पृ. ३
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्य करताना सावधगिरी बाळगा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • अपार्टमेंटमध्ये साक्षकार्य करून “उत्तम साक्ष द्या”
    आमची राज्य सेवा—२०१३
  • उत्तम परिणाम मिळतील अशा तऱ्‍हेने सेवा करा
    आमची राज्य सेवा—१९९८
  • तुम्ही सायंकाळचे साक्षकार्य करून पाहिले आहे काय?
    आमची राज्य सेवा—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ११/९४ पृ. ३

प्रश्‍न पेटी

◼ आपण धोकेदायक क्षेत्रात कार्य करतो त्यावेळी कोणत्या सावधगिरीची गरज आहे?

१ आपण खासपणे शहरातील भागांमध्ये हिंसा, लुबाडणूक आणि गोंधळाच्या वृत्तांबद्दल अधिकाधिक ऐकतो. त्याची काळजी वाटत असली, तरी आपल्याला हे माहीत आहे, की दंगलग्रस्त भागांमध्येही राज्य संदेशाला प्रतिसाद दाखवतील असे प्रामाणिक लोक आहेत. यास्तव, उचित समयी, यहोवाच्या काळजीबद्दल शास्वत राहून आपण धैर्य एकवटून आपले कार्य पुढे चालू ठेवूया.—नीती. २९:२५; १ थेस्सलनी. २:२.

२ आपण एखाद्या संभाव्य धोकेदायक भागात जातो तेव्हा, यहोवा आपल्याकडून सावध आणि चतुर असण्याची अपेक्षा करतो. दक्ष असा. “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” (नीती. २२:३) अनुभवी प्रचारकांनी जोडीने किंवा आवश्‍यक असल्यास, पुष्कळ प्रचारकांच्या गटाने एकत्रितपणे कार्य करण्याच्या सुज्ञतेला ओळखले आहे. उपदेशक ४:९, १२ म्हणते: “एकट्यापेक्षा दोघे बरे . . . जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करिता येईल.” गुन्हेगार एकटे असणाऱ्‍यांना आणि त्यामुळे बळी पाडण्यास सोपे असणाऱ्‍यांना शोधत असतात.

३ निवास इमारतीत काळोखी मार्गातून आणि सुमसाम जिन्यांवरून जाताना काळजीपूर्वक असा. घरात किंवा निवास स्थानात जाण्याचे आमंत्रण स्वीकारण्याबद्दल सावध असा. धमकी देणाऱ्‍या किंवा चीड आणणाऱ्‍या लोकांसोबत वाद घालू नका. लवकरात लवकर स्वतःची यहोवाचे एक साक्षीदार असल्याची ओळख करून द्या. काही प्रचारक ओळख पटवण्यासाठी बायबल किंवा एखादे टेहळणीबुरुज किंवा सावध राहा! नियतकालिक त्यांच्या हातात ठेवतात.

४ त्या भागात रेंगाळणाऱ्‍या लोकांवर नीट लक्ष ठेवा. इमारतीतील रहिवाशी नसल्याचे वाटणाऱ्‍यांबरोबर लिफ्टमध्ये जाण्यापासून सावध असा. किंमती दागिणे घालू नका. तुम्हाला काळोख झाल्यावर बाहेर राहावयाचे असल्यास, जेथे फारच तुरळक वाहतूक आहे त्या काळोखी रस्त्यांवरून चालण्याचे टाळा. तुम्हाला लुबाडण्यात येत असेल तर, त्यांना तुमचे पैसे किंवा वस्तू हव्या असल्यास प्रतिकार करू नका; तुमच्याकडे असणाऱ्‍या कोणत्याही भौतिक वस्तूपेक्षा तुमचे जीवन अधिक मौल्यवान आहे.—मार्क ८:३६.

५ नेतृत्व करणाऱ्‍या बांधवांनी, क्षेत्रातील प्रचारक कोठे आहेत आणि काय करत आहेत याबद्दल नेहमी दक्ष असले पाहिजे. बहुधा, गटाला एकाच भागात ठेवणे उत्तम ठरेल जेणेकरून इतरजणही जवळपास असतील. आसपासच्या भागात कोणत्याही प्रकारची हिंसा किंवा गडबड झाल्यास गटाने त्या क्षेत्रातून तत्काळ निघून जावे.

६ आपण दक्ष आणि सावध असलो तर, हिंसक भागातील ‘जी माणसे होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत,’ त्यांच्याप्रत आपण सतत पोहंचू शकतो.—यहे. ९:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा