वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९४ पृ. १
  • जवळून अनुकरण करण्याजोगा आदर्श

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जवळून अनुकरण करण्याजोगा आदर्श
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला’
    आमची राज्य सेवा—२००८
  • “मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • प्रेमळपणे शिकवण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • थोर शिक्षकाचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km १२/९४ पृ. १

जवळून अनुकरण करण्याजोगा आदर्श

१ येशू सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य होता यात काही प्रश्‍नच नाही. त्याने त्याच्या शिष्यांकरता एक परिपूर्ण उदाहरण मांडले. आपण त्याच्या परिपूर्णतेच्या दर्जाच्या बरोबरीचे होऊ शकत नसलो, तरी त्याच्या “पावलांचे जवळून अनुकरण” करण्यास आपल्याला आर्जवले आहे. (१ पेत्र २:२१, NW) आपण शक्य होईल तितके, येशूसारखे होण्याची इच्छा बाळगली पाहिजे व आवेशाने इतरांसोबत सत्याची सहभागिता केली पाहिजे.

२ येशू केवळ एका प्रचारकापेक्षा अधिक होता; तो एक उत्कृष्ट शिक्षक होता. “लोकसमुदाय त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीवरून थक्क झाले.” (मत्त. ७:२८, NW) तो इतका परिणामकारी का होता बरे? आपण त्याच्या ‘शिकवण्याच्या पद्धतीचे’ जवळून निरीक्षण करू या.

३ आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो: येशूला त्याच्या पित्याने शिकवले होते. (योहा. ८:२८) यहोवाला आदर देऊन त्याच्या नावाचा गौरव करण्याचा त्याचा हेतू होता. (योहा. १७:४, २६) आपल्या प्रचारात आणि शिकवण्यात, स्वतःकडे लक्ष आकर्षित न करता यहोवाला आदर देण्याचाही आपला हेतू असला पाहिजे.

४ येशूने शिकवलेल्या सर्व गोष्टी देवाच्या वचनावर आधारित होत्या. त्याने सतत प्रेरित शास्त्रवचनात लिहिलेल्या गोष्टींचा संदर्भ घेतला. (मत्त. ४:४, ७; १९:४; २२:३१) आपण आपल्या श्रोत्यांना बायबलकडे निर्देशित करण्यास इच्छितो; यास्तव प्रचार करत असलेल्या व शिकवत असलेल्या गोष्टी सर्वोच्च अधिकारावर आधारलेल्या आहेत हे आपण त्यांना पाहू देतो.

५ येशूने संक्षिप्त, व्यावहारिक, सोप्या वक्‍तव्यांचा उपयोग केला. उदाहरणार्थ, आपण देवाची क्षमा कशी मिळवू शकतो हे समजावून सांगताना त्याने इतरांबद्दल स्वतः क्षमाशील असण्याचे उत्तेजन दिले. (मत्त. ६:१४, १५) आपण राज्य संदेशाला साध्या व सोप्या शब्दात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

६ येशूने इतरांचे विचार उद्दीपित करण्यासाठी दाखल्यांचा आणि प्रश्‍नांचा कुशलतेने उपयोग केला. (मत्त. १३:३४, ३५; २२:२०-२२) सर्वसामान्य, दैनंदिन बाबींवरील दाखले लोकांना बायबलच्या कठीण शिकवणी समजण्यास मदत करू शकतात. आपले श्रोते जे ऐकतात त्यावर विचार करण्यास उत्तेजित करणारे प्रश्‍न आपण त्यांना विचारले पाहिजेत. सूचक प्रश्‍नांमुळे त्यांना योग्य अनुमानास पोहंचण्यासाठी मदत मिळू शकते.

७ अधिक माहिती विचारणाऱ्‍यांना कठीण बाबी समजावून सांगण्यास येशूने वेळ काढला. खरोखर आस्थेवाईक असणाऱ्‍यांना, जसे की त्याचे शिष्य यांना, येशूने शिकवलेल्या गोष्टींचा अर्थ समजू शकला. (मत्त. १३:३६) आपल्याला प्रामाणिकपणे प्रश्‍न विचारण्यात येतात तेव्हा आपणही त्याचप्रकारे मदतदायी असले पाहिजे. आपल्याला उत्तरे माहीत नसल्यास, त्यावर संशोधन करून नंतर ती माहिती घेऊन आपण पुन्हा भेट देऊ शकतो.

८ येशूने शिकवण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवांचा उपयोग केला. याचे एक उदाहरण म्हणजे, तो आपल्या शिष्यांचा धनी असतानाही, त्याने त्यांचे पाय धुतले. (योहा. १३:२-१६) आपण नम्र आत्मा दाखवला तर, शिकत असलेले लोक शिकलेल्या गोष्टींचा अवलंब करण्यास उत्तेजित होतील.

९ लोकांच्या अंतःकरणाला आणि धार्मिकतेच्या त्यांच्या प्रेमाला येशू अपीलकारक होता. आपल्याला देखील अंतःकरणांप्रत पोहंचायचे आहे. आपण एका श्रेष्ठ व्यक्‍तीची उपासना करण्याच्या आणि इतरांसोबत शांती व आनंदात राहण्याच्या मानवाच्या जन्मसिद्ध इच्छेला अपीलकारक ठरण्याचा प्रयत्न करतो.

१० डिसेंबर दरम्यान, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करून आपण इतरांसोबत येशूबद्दल शिकलेल्या गोष्टींची सहभागिता करू शकतो. येशूने शिकवलेल्या गोष्टी समजावून सांगताना त्याच्या शिकवण्याचे गुण अनुसरल्याने प्रामाणिक जण ऐकण्यास प्रवृत्त होतील.—मत्त. १०:४०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा