त्यांना समजण्यास मदत करा
१ प्रेषित पेत्राने मान्य केले, की बायबलमध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी “समजावयास कठीण” आहेत. (२ पेत्र ३:१६) अनेकांना तसेच वाटले आहे. तथापि, त्याच्या मूलभूत शिकवणी तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकात अगदी स्पष्ट केल्या आहेत. या पुस्तकाचा आणि तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे या पुस्तकाचा उत्तम उपयोग करण्यास आपण आस्थेवाईक लोकांची मदत कशी करू शकतो?
२ तुम्ही तुमच्या पहिल्या भेटीत योहान १७:३ ची चर्चा केली असल्यास, अधिक ज्ञान घेण्याच्या गरजेवर जोर देऊन तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “मागच्या वेळी मी येथे आलो होतो तेव्हा, आपण योहान १७:३ मध्ये वाचले होते की, देवाबद्दल ज्ञान घेतल्याने सार्वकालिक जीवनाप्रत नेले जाऊ शकते. परंतु, आपण आज राहात असलेल्या जगात सर्वकाळ जगण्यास तुम्हाला आवडेल का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] बहुतेकांना आवडणार नाही. यासाठी, देवाने काय अभिवचन दिले आहे त्याविषयी ऐकल्यावर आपण उल्लास करू शकतो.” पृष्ठे १२ आणि १३ वरील परिच्छेद १२ काढा, यशया ११:६-९ वाचा आणि मग, ‘पहिल्या गोष्टी होऊन गेल्यावर’ हे जग कसे असेल त्याचे वर्णन करा. पुढील चर्चेसाठी पुन्हा येण्याविषयी विचारा.
३ देवाचे राज्य दुर्दशेचा अंत करील हे दाखवण्यास तुम्ही पृष्ठे १५६ ते १६२ वरील चित्रांचा उपयोग केला असल्यास, त्या पुस्तकातील ती पृष्ठे पुन्हा काढा आणि म्हणा:
▪ “देवाच्या राज्याच्या आधिपत्याखाली लोक ज्या आशीर्वादांचा आनंद लुटतील असे येथे दाखवलेले आहे त्याची आपण चर्चा केली होती. आपल्याला त्या राज्यात राहायचे असल्यास, आपण काय करावे असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] पृष्ठ २५० वरील परिच्छेद २ काढा आणि इब्रीयांस ११:६ वाचा. यहोवाचे साक्षीदार, प्रामाणिक लोकांची, देवाला शोधून त्याची स्वीकारणीय पद्धतीने उपासना करण्यासाठी मदत करत आहेत.
४ कामात असल्यामुळे संभाषण करू शकलेल्या घरमालकाला “या जगाचा बचाव होईल का?” ही पत्रिका दिली असल्यास, तुम्ही या प्रस्तावाचा उपयोग करू शकता:
▪ “मी अलीकडेच भेट दिली होती, तेव्हा तुम्ही अतिशय व्यग्र होता. या प्रक्षुब्ध काळातून जगाचा बचाव होईल का असा प्रश्न विचारणारी पत्रिका मी तुम्हाला देऊन गेलो होतो. तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकात येथे उद्धृत केलेले प्रकटीकरण २१:४ हे वचन आपण वाचले होते [पृष्ठ १६२ वरील ते वाचून दाखवा.] [पृष्ठे १५६ ते १६२ वरील] ही चित्रे, तुम्हाला ‘देव आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसून टाकील’ तेव्हा कशी परिस्थिती असेल याची कल्पना देतात. हे अभिवचन निकटच्या भवितव्यात पूर्ण केले जाईल असा खात्रीदायक पुरावा हे पुस्तक सादर करते. तुम्हाला ते वाचायचे असल्यास, ही तुमची प्रत आहे.”
५ “तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे” या पुस्तकाच्या वाटपाचा मागोवा तुम्ही या प्रस्तावासह घेऊ शकता:
▪ “मी तुम्हाला पहिल्यांदा भेट दिली तेव्हा, तुमच्या कुटुंबाविषयी तुम्हाला असलेली चिंता पाहून मी प्रभावित झालो. आपण दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात जगत असल्यामुळे, कुटुंबांनी भवितव्यासाठी तयारी करत राहणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी, मी तुम्हाला दिलेले तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे (१९९४ आवृत्ती) हे पुस्तक, घरामध्ये नियमित बायबल चर्चा करण्याची जोरदार शिफारस करते. [पृष्ठे १८५-६ वरील परिच्छेद १० वाचा.] मला अनुमती दिल्यास, मी सुमारे २०० देशांत लोक कौटुंबिक गट या नात्याने घरी बायबलची चर्चा कशी करतात हे काही मिनिटांत, दाखवू इच्छितो.” वेळ अनुमती देते त्याप्रमाणे, अभ्यासाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी पृष्ठ ७१ वरील उपशिर्षकाखालील साहित्याचा उपयोग करा.
६ तुम्हाला आस्था दिसून आल्यास, अभ्यास सुरू करण्यासाठी योजना करावयास तुम्हाला आवडेल. “भोळ्यांना ज्ञान प्राप्त” करून देण्यात मदत करण्यासाठी तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल.—स्तोत्र ११९:१३०.