१९९६ च्या ईश्वरशासित सेवा प्रशालेपासून लाभ मिळवणे—भाग ३
१ प्रेषित पौलाची धैर्याने सुवार्तेविषयी बोलण्याची क्षमता त्याला प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या बांधवांनी त्याच्याप्रीत्यर्थ प्रार्थना करावी अशी इच्छा होती. (इफिस. ६:१८-२०) आपलीही तीच क्षमता विकसित करण्याची मनसा आहे. त्यासाठी, ईश्वरशासित सेवा प्रशालेकरवी पुरवलेल्या मदतीची आपण कदर करतो, ज्यामध्ये सभेतील पात्र असलेल्या उपस्थितांना नाव नोंदवण्यास उत्तेजन दिले जाते.
२ विद्यार्थी या नात्याने, आपल्याला बोलण्याची आणि शिकवण्याची कुवत सुधारण्यात मदत देण्याकरता वैयक्तिक सल्ला मिळतो. (नीति. ९:९) इतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सल्ल्याकडे कान देऊन आपणही लाभ प्राप्त करू शकतो तसेच शिकत असलेल्या गोष्टी आपण स्वतःला लागू केल्या पाहिजेत. एखाद्या नेमणुकीची तयारी करताना, मूळ साहित्याचे आपले स्पष्टीकरण अचूक आहे याची खात्री करण्यासाठी आपण त्याचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. आपण जे मुख्य मुद्दे आणि शास्त्रवचने वापरतो ते सबंध विषयावरील स्पष्टीकरणाशी जुळले पाहिजेत. त्या नेमणुकीत आणखी दुसऱ्या व्यक्तीचा समावेश असल्यास प्रशालेत प्रस्तुत करण्याच्या बऱ्याच आधी तिचा सराव केला पाहिजे. आपण प्रगती करतो, तसे आयत्या वेळी बोलण्याचा, हस्तलिखितांऐवजी टिपणींचा वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
३ प्रशालेत नेमणुका असलेल्या सर्वांनी लवकर यावे, प्रशाला पर्यवेक्षकांना त्यांचे भाषण सल्ला पत्रक द्यावे, आणि सभागृहातील समोरील बाजूस बसावे. बहिणींनी त्यांच्या मांडणीविषयी आणि त्यांचा भाग करत असताना ते उभे राहतील अथवा बसतील याविषयी अगोदरच प्रशाला पर्यवेक्षकांना कळवले पाहिजे. अशा प्रकारे सहयोग दिल्याने कार्यक्रम सुरळीत पार पडण्यास आणि व्यासपीठाची काळजी घेणाऱ्यांना आधीच सर्वकाही तयार ठेवण्यास मदत होते.
४ नेमणूक क्र. २ तयार करणे: बायबल वाचनाचा एक उद्देश, विद्यार्थ्याला त्याच्या वाचनाची क्षमता सुधारण्यात मदत करणे होय. हे उचितपणे कसे साधता येईल? वारंवार साहित्याचे मोठ्याने वाचन करणे हा त्यात प्रावीण्य मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्याही अपरिचित शब्दांचा अर्थ आणि योग्य उच्चार शिकण्यासाठी विद्यार्थ्याने शब्दकोशात तो तपासावा. यासाठी शब्दकोशात वापरलेल्या उच्चार करण्याच्या खुणांच्या अर्थाचा देखील परिचय करून घेण्याची गरज आहे.
५ नवीन जग भाषांतर, (इंग्रजी) या बायबलमध्ये आढळणाऱ्या इंग्रजीतील योग्य नावांचा आणि असामान्य शब्दांचा उच्चार करण्यात मदत करते. त्यांना शब्दावयवांमध्ये तोडून आघाताच्या खुणा देऊन हे केले जाते. (“प्रत्येक शास्त्रलेख ईश्वरप्रेरित आणि लाभदायक आहे,” (इंग्रजी) पृष्ठे ३२५-६, परिच्छेद २७-८ पाहा.) नियमानुसार, आघाताच्या खुणेआधीच्या शब्दावयवावर अधिक जोर दिला जातो. आघात दिलेल्या शब्दावयवाच्या शेवटी स्वर असल्यास, त्या स्वराचा उच्चार दीर्घ असतो. शब्दावयवाच्या शेवटी व्यंजन असल्यास, त्या शब्दावयवातील स्वर तोटका असतो. ([SAʹLU] सेʹलू याची तुलना [SALʹLU] सालʹलु याजशी करा.) बायबल वाचनाच्या नेमणुकीची तयारी करण्यासाठी काही बांधव संस्थेच्या ऑडिओ कॅसेट ऐकतात.
६ पालक आपल्या मुलांना त्यांच्या वाचनाच्या नेमणुकीची तयारी करण्यात मदत करू शकतात. यामध्ये मूल सराव करत असताना त्याचे लक्षपूर्वक ऐकणे आणि मग सुधारण्याकरता त्याला मदतदायी सूचना देणे यांचा समावेश होतो. संक्षिप्त प्रस्तावना आणि मुख्य मुद्यांचा अवलंब करणाऱ्या उचित समाप्तीसाठी नेमून दिलेला वेळ मुभा देतो. अशाप्रकारे विद्यार्थी आयत्या वेळी भाषण देण्याची क्षमता विकसित करतो.
७ स्तोत्रकर्त्याने प्रार्थनापूर्वक अशी विनंती केली: “हे प्रभू, [यहोवा, NW] माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ति वर्णील.” (स्तोत्र ५१:१५) ईश्वरशासित सेवा प्रशालेतील आपल्या सहभागामुळे हीच मनसा पूर्ण होण्यास आपल्याला मदत मिळो.