स्मारक विधीच्या स्मरणिका
मंगळवार, एप्रिल २ रोजी स्मारक विधी पाळण्याआधी खालील बाबींकडे लक्ष पुरवले पाहिजे:
▪ सर्वांना, तसेच वक्त्याला देखील विधीचा अचूक समय आणि ठिकाण याविषयी कळविण्यात यावे.
▪ उचित प्रकारची भाकरी आणि द्राक्षारस मिळवला व तयार ठेवला पाहिजे.—फेब्रुवारी १५, १९८५, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठ १९ पाहा.
▪ साजेसा मेज, त्यावरील आच्छादन, ताटे व प्याले सभागृहात आधीच आणले जावेत व योग्य ठिकाणी ठेवण्यात यावेत.
▪ राज्य सभागृह किंवा सभेचे इतर ठिकाण आधीच अगदी स्वच्छ केले जावे.
▪ परिचर आणि वाढप्यांना अगोदरच निवडून योग्य पद्धत आणि त्यांच्या कर्तव्यांची सूचना देण्यात यावी.
▪ दुर्बल व उपस्थित राहता न येणाऱ्या कोणत्याही अभिषिक्त व्यक्तीला भाकरी व द्राक्षारस देण्याची योजना करण्यात यावी.
▪ एकाच सभागृहात एकापेक्षा अधिक विधी आयोजित केले असल्यास, मंडळ्यांमध्ये उत्तम सहयोग असला पाहिजे जेणेकरून दालनात, प्रवेशद्वारात, सभागृहाच्या बाहेरील पायरस्त्यावर आणि वाहने ठेवण्याच्या जागेत अनावश्यक गर्दी होणार नाही.