वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/९६ पृ. १
  • आपला संदेश कोण ऐकेल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपला संदेश कोण ऐकेल?
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • पुनर्भेट घेण्याची खात्री बाळगा
    आमची राज्य सेवा—१९९२
  • अभ्यास सुरू करण्याकरता नवीन साधन!
    आमची राज्य सेवा—२००१
  • पुनर्भेटी करण्यास धैर्य एकवटा
    आमची राज्य सेवा—१९९७
  • “शुभवृत्त विदित करणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km १२/९६ पृ. १

आपला संदेश कोण ऐकेल?

१ मानवी इतिहासात कधीही घडले नाही इतक्या प्रमाणात, लोकांवर माहितीचा जणू भडिमार होत आहे ज्यातील पुष्कळशी माहिती क्षुल्लक एवढेच नाही तर दिशाभूल करणारी आहे. परिणामस्वरूप, अनेकजण गोंधळून जातात आणि अशांना देव राज्याचा संदेश ऐकवणे आपल्याकरता आव्हान बनते. देवाच्या वचनाकडे कान दिल्याने त्यांच्यावर किती सकारात्मक प्रभाव होऊ शकतो याची त्यांना जाणीव नसते.—लूक ११:२८.

२ जगातील अनेक भागांमध्ये हजारोहजार लोक तो संदेश ऐकत आहेत आणि गृह बायबल अभ्यासाचा आपला प्रस्ताव स्वीकारत आहेत याचा आपल्याला आनंद वाटतो. तथापि, इतर क्षेत्रांमध्ये इतका मोठा प्रतिसाद मिळत नाही. सेवेतील अनेक पुनर्भेटी सकारात्मक प्रतिफळ देत नाहीत म्हणून आपला संदेश कोण ऐकेल असा प्रश्‍न आपल्यासमोर येईल.

३ आपण निरुत्साहित न होण्याविषयी दक्ष असावे. पौलाने म्हटले: ‘“जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.” तर, ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याचा धावा ते कसे करतील? आणि घोषणा करणाऱ्‍यावाचून ते कसे ऐकतील? “चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्‍याचे चरण किती मनोरम आहेत!” असा शास्त्रलेख आहे.’ (रोम. १०:१३-१५) आपण प्रयासाने राज्य बीज पेरले तर प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांमध्ये देव त्यास वाढवील.—१ करिंथ. ३:६.

४ नियमित पुनर्भेटी करणे ही गुरुकिल्ली आहे: ज्या क्षेत्रांमध्ये अत्यल्प लोक आपला संदेश ऐकतात असे भासते तेथे साहित्य दिले असले अथवा नसले तरी आपल्याला जी आस्था दिसून येते ती वाढवण्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. काहीच निष्पन्‍न होणार नाही असा निष्कर्ष काढण्याची घाई का करावी? आपण बीज पेरतो तेव्हा त्याचे फळ कोठे येईल हे आपल्याला ठाऊक नसते. (उप. ११:६) शास्त्रवचनांतून काही सांगण्यासाठी थोड्या वेळासाठीच का होईना पण तयारी करून पुन्हा जातो तेव्हा आपण कदाचित त्या व्यक्‍तीच्या अंतःकरणाप्रत पोहंचू शकतो. आपण एखादी पत्रिका देऊ शकतो किंवा चालू नियतकालिके सादर करू शकतो. कालांतराने, बायबल अभ्यास कसा चालवला जातो ते आपल्याला दाखवता येईल. यहोवा आपल्या परिश्रमांवर किती आशीर्वाद वर्षितो याचा आपल्याला सुखद धक्का मिळेल.—स्तोत्र १२६:५, ६.

५ थोडीफार आस्था दाखवलेल्या एका स्त्रीला पत्रिका देण्यात आली होती. ती पुन्हा घरी भेटतच नव्हती पण दोन महिन्यांनंतर भेटली तर इतकी कामात होती की तिला बोलायला सवड सुद्धा नव्हती. पुन्हा तीच पत्रिका तिला देण्यात आली. प्रचारक बहिणीने तिला घरी भेटण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यावरही आणखी तीन महिन्यांनंतरच ती भेटू शकली आणि तेही आजारी अवस्थेत. त्या बहिणीने पुढील आठवडी तिला पुन्हा एकदा भेट दिली आणि पत्रिकेविषयी संक्षिप्त संभाषण झाले. ती बहीण त्याच्या पुढील आठवडी परतली तेव्हा त्या स्त्रीने राज्य संदेशाबद्दल खरी आस्था व्यक्‍त केली. तिच्या जीवनातील परिस्थितीत बदल झाल्याने ती आपल्या आध्यात्मिक गरजेविषयी जागृत झाली. बायबल अभ्यास सुरू झाला आणि त्यानंतर प्रत्येक आठवडी तिने उत्साहाने आपला अभ्यास जारी ठेवला.

६ कोणत्याही गोष्टींची वाढ होत असल्याचे पाहायचे असले, मग ती फुले असोत, भाज्या असोत किंवा राज्य संदेशाबद्दलची आस्था असो त्याकरता मशागत आवश्‍यकच आहे. त्यासाठी, वेळ, कष्ट, निगा राखण्याची मनोवृत्ती आणि माघार न घेण्याचा निर्धार जरूरीचा असतो. मागील वर्षी, तीन लाखांपेक्षा अधिक लोकांनी बाप्तिस्मा घेतला ज्यांच्यामध्ये राज्य बिजाने मूळ धरले होते! आपण प्रचार जारी ठेवला तर आपल्या संदेशास कान देणारे आणखी पुष्कळ आपल्याला निश्‍चितच भेटतील.—पडताळा गलतीकर ६:९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा