फेब्रुवारीसाठी सेवा सभा
फेब्रुवारी २ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १६६ (१५)
१० मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा.
१५ मि: “यहोवाचे साक्षीदार—खरे सुवार्तिक.” प्रश्नोत्तरे. डिसेंबर १, १९९२, टेहळणी बुरूज पृष्ठ १२ वरील पेटीची उजळणी करा.
२० मि: “सर्व तान्हेल्यांना आमंत्रित करा.” लेखाची उजळणी करा; हे दाखवून द्या, की सुचविलेल्या प्रस्तुती आस्था चेतविण्यासाठी व ऐकणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी रचलेल्या आहेत. परिच्छेद २-३ किंवा ४-५ वर एखाद्या प्रौढ व्यक्तीकडून व परिच्छेद ६ वर एखाद्या युवकाकडून प्रात्यक्षिक करून घ्या.
गीत २०८ (८) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ९६ (६)
१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. “नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम,” याची उजळणी करा.
१५ मि: स्थानिक गरजा.
२० मि: “सर्व भाषीयांना व धर्मीयांना साक्ष देणे.” (परिच्छेद १-८) प्रश्नोत्तरे. तुमच्या क्षेत्रात स्थानिक भाषेशिवाय आणखीन कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात याची यादी तयार करा आणि मंडळीकडे या भाषांतील कोणत्या साहित्याचा साठा आहे ते सांगा. परिच्छेद ८ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे सर्व राष्ट्रांकरता सुवार्ता (Good News for All Nations) ही पुस्तिका कशी वापरली जाऊ शकते त्याचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत २२० (२९) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ७५ (२२)
५ मि: स्थानिक घोषणा.
१२ मि: मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याची आवश्यकता का आहे. ऑगस्ट १५, १९९३, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठ ८-११, यातील मुख्य मुद्द्यांची वडील चर्चा करतात आणि सर्व सभांना नियमितपणे उपस्थित राहण्याच्या महत्त्वावर भर देतात.
१८ मि: “सर्व भाषीयांना व धर्मीयांना साक्ष देणे.” (परिच्छेद ९-२४) प्रश्नोत्तरे. एखाद्या हिंदू अथवा मुस्लिम व्यक्तीला, आणि बौद्ध किंवा ज्यू यांपैकी—स्थानिकरित्या ज्यांची संख्या अधिक असेल त्याला पहिल्याच भेटीत साक्ष कशी दिली जाऊ शकते याचे एखाद्या अनुभवी प्रचारकाकडून प्रात्यक्षिक करून घ्या.
१० मि: ‘यहोवा माझा सहायक आहे.’ वडिलांचे स्नेहपूर्ण, प्रेरणादायी भाषण.
गीत १५ (२) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४ (२९)
१० मि: स्थानिक घोषणा. मार्चच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. मार्च १९९६ ची आमची राज्य सेवा, पृष्ठ ४ वर दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करून ज्ञान पुस्तक सादर करण्याच्या एखाददोन विचारांचा उल्लेख करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयावर जोर द्या.
१५ मि: “परिणामकारक असल्यास तिचा उपयोग करा!” प्रश्नोत्तरे. श्रोतेगणांतील एक किंवा दोन अनुभवी प्रचारकांना अशा प्रस्तुतींवर संक्षिप्त विवेचने मांडण्यास सांगा ज्या प्रस्तुतींच्या साधेपणामुळे व परिणामकारकतेमुळे त्यांनी सतत त्यांचा उपयोग केला आहे. मग, आमची राज्य सेवा यात अलीकडेच सुचविलेल्या आणि परिणामकारक ठरलेल्या प्रस्तुतींविषयी मत प्रदर्शन करण्यासही काहींना सांगा.
२० मि: तुमच्या प्रस्तुतींचा सराव करा. प्रशाला मार्गदर्शन पुस्तक, (इंग्रजी) पृष्ठे ९८-९, परिच्छेद ८-९ यावर आधारित संक्षिप्त भाषण. आपल्या प्रस्तावनांचे विश्लेषण करण्याच्या व अधिक प्रभावशाली बनण्याचे मार्ग शोधण्याच्या गरजेवर भर द्या. दारावर प्रस्तावना कशी सादर केली जाते याचे विश्लेषण करणारे व त्यात सुधारणा कशी करता येईल याविषयी चर्चा करणारे दोन बहिणींचे एक प्रात्यक्षिक दाखवा. पुढच्या वेळी बहिणी ज्या प्रस्तावनेचा उपयोग करण्याचे ठरवतात तिचे एक संक्षिप्त सराव सत्र घेऊन त्या एकमेकींना उपयुक्त सूचना देतात. शेवटी अध्यक्ष सर्वांना, आपापल्या प्रस्तावनांचे विश्लेषण करून त्यांचा सराव करण्याचे उत्तेजन देतात.
गीत १०३ (११) व समाप्तीची प्रार्थना.