प्रश्न पेटी
◼ संस्थेच्या लोणावळा शाखेस किंवा बेंगळूरमधील बांधकाम स्थळास भेट देताना आपल्या पेहरावाकडे व केशभूषेकडे आपण विशेष लक्ष का दिले पाहिजे?
ख्रिश्चनांनी योग्य स्वरूपाचा पेहराव करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. आपल्या पेहरावाने व केशभूषेने सर्व प्रसंगी यहोवा देवाच्या सेवकास साजेशी असणारी प्रतिष्ठा व सुंदरता प्रवर्तित केली पाहिजे. जगाच्या पाठीवरील संस्थेच्या कोणत्याही शाखा दफ्तरास आपण भेट देतो तेव्हा असे करणे विशेषतः योग्य असते.
सन १९९८ दरम्यान जगाच्या अनेक भागांत प्रांतीय आणि आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरविली जातील. अनेकानेक देशांतील आपले बांधव हजारोंच्या संख्येने न्यूयॉर्कमधील संस्थेच्या मुख्यालयास आणि भारतातील तसेच इतर देशांतील शाखा दफ्तरांस भेटी देतील. केवळ शाखा दफ्तरांना भेट देते वेळीच नाही, तर इतर कोणत्याही समयी आपला पेहराव आणि केशभूषा यांमध्ये तसेच ‘सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आपण आपली लायकी पटवून देण्यास’ हवी.—२ करिंथ. ६:३, ४.
योग्य स्वरूपाचा पेहराव व केशभूषा यांच्या महत्त्वावर चर्चा करताना आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित हे पुस्तक, क्षेत्रकार्यात असताना तसेच ख्रिस्ती सभांना उपस्थित राहताना शारीरिक स्वच्छता, सभ्य पेहराव आणि चांगली केशभूषा करण्याच्या गरजेवर विवेचन मांडते. मग, पृष्ठ १३१ वरील परिच्छेद २ मध्ये ते म्हणतेः “हीच गोष्ट ब्रुकलिन येथील बेथेल गृहाला किंवा संस्थेच्या कोणत्याही शाखा दफ्तराला भेट देताना लागू होणारी आहे. बेथेल याचा अर्थ ‘देवाचे घर’ असा आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे आपला पेहराव, केशभूषा व वागणूक ही राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहताना आपण जशी ठेवतो तशीच राखण्याची गरज आहे.” बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोबत सहवास राखण्यासाठी व शाखा दफ्तराला भेट देण्यासाठी स्थानिक क्षेत्रातून तसेच दूरून येणाऱ्या राज्य प्रचारकांनी देखील हाच उच्च दर्जा राखला पाहिजे.
आपल्या पेहरावाने व केशभूषेने यहोवाच्या शुद्ध उपासनेसंबंधी असलेल्या इतरांच्या दृष्टिकोनावर एक सकारात्मक प्रभाव पाडला पाहिजे. तथापि, असे निदर्शनास आले आहे, की संस्थेच्या शाखा दफ्तरांना भेट देताना काही बांधव अगदीच गबाळ्या पद्धतीचा पेहराव करतात. कोणत्याही बेथेल गृहाला भेट देताना अशा प्रकारचा पेहराव करणे उचित नाही. आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या इतर पैलूंप्रमाणेच या बाबतीत देखील सर्व काही देवाच्या गौरवासाठी करून आपण तेच उच्च दर्जे राखू इच्छितो जे देवाच्या लोकांना जगापासून वेगळे असल्याचे दाखवतात. (रोम. १२:२; १ करिंथ. १०:३१) पहिल्यांदाच बेथेलला भेट देणाऱ्या आपल्या बायबल विद्यार्थ्यांना व इतरांना याची माहिती देऊन योग्य स्वरूपाच्या पेहरावाकडे व केशभूषेकडे लक्ष देण्याच्या महत्त्वाची त्यांना आठवण करून देणे उचित आहे.
तर मग, संस्थेच्या शाखा दफ्तरांना भेटी देताना स्वतःला असे विचारा: ‘माझा पेहराव व केशभूषा सभ्यतेची आहे का?’ (पडताळा मीखा ६:८.) ‘मी भक्ती करतो त्या देवाविषयी एक उत्तम प्रभाव पाडते का? माझ्या स्वरूपामुळे इतर लोक विकर्षित होतील का, किंवा अडखळतील का? पहिल्यांदाच भेट देत असतील अशांसाठी मी योग्य उदाहरण मांडत आहे का?’ आपण नेहमी, आपला पेहराव व केशभूषा यांकरवी, “आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणू या.—तीत. २:१०.