वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९० पृ. ४
  • पवित्र शास्त्राचा अधिक वापर करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पवित्र शास्त्राचा अधिक वापर करणे
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • रिझनिंग पुस्तकाची मदत
  • क्षेत्र सेवेत पवित्र शास्त्राचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९२
  • “पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या, आणि चर्चेसाठी बायबल विषय या पुस्तिकांचा तुम्ही उपयोग करीत आहात का?”
    आमची राज्य सेवा—२००८
आमची राज्य सेवा—१९९०
km ६/९० पृ. ४

पवित्र शास्त्राचा अधिक वापर करणे

१ “देवाचे वचन सजीव, सक्रिय आहे.” (इब्री. ४:१२) त्याची सक्रियता व सजीवता पूर्णपणे जाणून घ्यावयाची आहे तर त्याचे वाचन करुन अवलंब केला पाहिजे. हे साध्य करण्यासाठी यहोवाच्या संस्थेने खासपणे १९५४ पासून घरोघरच्या उपाध्यपणात पवित्र शास्त्राचा वापर करण्याचे प्रोत्साहन दिले आहे. घरोघरच्या कार्यात आम्हाला तीन ते आठ मिनिटांचे प्रवचन कसे द्यावे ते शिकवण्यात आले व याकरवी महत्त्वाच्या विषयांवर पवित्र शास्त्र काय म्हणते ते घरमालकाच्या लक्षात आणण्याचे सांगण्यात आले.

२ अलिकडच्या वर्षांत आमची राज्य सेवा यात नियमितपणे संभाषणासाठी विषय हे सदर देण्यात येते जेथे क्षेत्रकार्याच्या वापरासाठी एका विषयावर दोन किंवा तीन शास्त्रवचने दिली जातात. उदाहरणार्थ, सध्याचा आमचा संभाषणाचा विषय आहेः “देवाचे राज्य काय करील.” या विषयानुरुप जी शास्त्रवचने वापरावयाची आहेत ती, देवाने भविष्यकाळाविषयी जी अद्‌भुत आशा दिली आहे ती ठळकपणे समोर मांडतात.

३ पवित्र शास्त्राचा प्रभावी वापर करण्यासाठी सवय तसेच लोकांना मदत देण्याची इच्छा लागते. याकरवी त्यांना देवाचे वचन हे खरेच सजीव व सक्रिय आहे याची जाणीव करून देता येईल. मासिक वितरणाच्या दिवशी आम्हाला छोटी व मुद्देसूद सादरता करावी असे सुचविलेले असले तरी आमच्या क्षेत्रकार्याच्या इतर प्रकारात पवित्र शास्त्राचा वापर करण्याविषयी आम्ही दुर्लक्ष होऊ देऊ नये. खरे म्हणजे, आम्ही पवित्र शास्त्राचे विद्यार्थी आहोत; व हे सिद्ध करुन दाखविण्यासाठी लोकांना पवित्र शास्त्राचा वापर करुन यहोवाने मानवजात व पृथ्वीसाठी काय राखलेले आहे ते दाखविण्याशिवाय दुसरा चांगला मार्ग कोणता असू शकेल?

रिझनिंग पुस्तकाची मदत

४ आमची राज्य सेवा यातील संभाषणाच्या विषयाशिवाय रिझनिंग फ्रॉम द स्क्रिपचर्स हे पुस्तक देखील मदतीला आहे. या पुस्तकातील ९-१५ पानांवरील विविध प्रस्तावना तुम्ही चाळून पाहिल्यास तुम्हाला अशी पवित्र शास्त्रवचने दिसतील जी लोकांना राज्याचा संदेश प्रस्तुत करण्यात वापरता येऊ शकतील. पवित्र शास्त्र काय म्हणते ते लोकांना दाखविण्याजोग्या विविध गोष्टी आम्हापाशी उपलब्ध आहेत.

५ उदाहरणार्थ, काहींना वृद्धजनांविषयीची काळजी वाटत असल्यास रिझनिंग पुस्तकात पान १४ वर “वार्धक्य/मृत्यु” या शिर्षकाखाली जे सुचविण्यात आलेले आहे ते अनुसरणे बरे. हा प्रश्‍न किती साजेसा आहे की, “आम्ही वृद्ध होतो व का मरतो याचे तुम्हाला कधी आश्‍चर्य वाटले आहे का? याविषयीच एका प्रेरित पवित्र शास्त्र लेखकाने रोमकर ५:१२ मध्ये काय म्हटले आहे त्याकडे मी तुमचे लक्ष वेधवू इच्छितो.” मग तुम्ही म्हणू शकताः “अशाप्रकारे आम्ही वृद्ध का होतो व का मरतो ते पवित्र शास्त्र दर्शवीत असले तरीही ते आम्हाला भविष्यासाठी एक मोठी आश्‍चर्यकारक आशाही प्रस्तुत करते, जी येथे प्रकटीकरण २१:३, ४ मध्ये दिली आहे.” यानंतर सध्या जी सादरता आम्हाला या महिन्यात देणे आहे ती दाखवा.

६ लोक आजकाल बहुधा हेच म्हणताना दिसतात की, “आम्ही फार कामात आहोत.” बहुतेक खरेच असतात व त्याविषयी आम्ही जाण राखली पाहिजे. तेव्हा जर योग्य आहे तर असे म्हणू शकताः “मला ते कळते; कारण सध्या कामात बराच वेळ जात आहे. तरीपण एक छोटासा विचार तुम्हाला सांगावा अशी माझी इच्छा आहे,” व मग, सध्याच्या संभाषणाच्या विषयातील एक शास्त्रवचन काढून वाचा. वाचल्यानंतर लगेच तुम्ही कोणते प्रकाशन सादर करीत आहात ते सांगा, एखादी हस्तपत्रिका त्यांना द्या, किंवा म्हणा की तुम्ही पुन्हा या क्षेत्रात लवकरच येणार तेव्हा, आमरण जगण्याची जी शक्यता आहे त्याविषयी आणखी एक विचार सांगण्यासाठी त्यांची भेट घ्याल.

७ आम्ही पवित्र शास्त्राचे विद्यार्थी आहोत व आम्ही आमच्या उपाध्यपणात ते केवढे कुशलपणे हाताळू शकतो हे लोकांनी पहावे हे किती चांगले आहे बरे! यामुळे त्यांना, आज कोण देवाच्या वचनावर विसंबून आहेत व कोण त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करीत आहेत ते पहावयास मिळते. यास्तव, मासिक कार्याच्या दिवसाखेरीज घरोघरचे नित्य कार्य करीत असता, नित्याच्या प्रकाशन सादरतेच्यावेळी पवित्र शास्त्राचा वापर करीत रहा. पवित्र शास्त्राचा वापर केल्यामुळे आमच्या कार्यावर यहोवाचे आशीर्वाद येतील आणि पुष्कळांच्या मनावर हे बिंबविले जाईल की, देवाचे वचन हे खरेच सजीव असून सक्रिय आहे व त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा