आमचे सेवकपण खंड पडू न देता पुढे चालू ठेवणे
१ शेवटला काळ अति वेगाने त्याच्या अंताकडे चाललेला असता, जगाचे दृश्य झपाट्याने बदलत आहे. (१ करिंथ. ७:३१) पवित्र शास्त्रीय भविष्यवादांचे पूर्णतेत जगास हादरविणाऱ्या घटना घडत आहेत. आम्ही गंभीरपणे विचार करीत असता की, आम्हा सभोवतालच्या जगात काय घडत आहे, तसेच आमच्या संस्थेतही काय घडत आहे, तर आम्हाठायी ही आवड अधिक बळावेल की, राज्याची “सुवार्ता” प्रचार करणे हे केवढ्या निकडीचे आहे.—मार्क १३:१०.
२ येशू ख्रिस्त, जो या कामी आमचा नेता आणि कित्ता आहे, त्याने आम्हास शिष्य बनविण्याची आज्ञा दिलेली आहे. ती देण्यासोबतच त्या कामातील यशाबद्दल हमी देण्यात म्हटलेः “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हासोबत आहे.” (मत्तय २८:१९, २०) येशूच्या शिष्यांनी त्याच्या शब्दांची गंभीर दखल घेतली व तीव्र विरोध असताही “येशू हा ख्रिस्त आहे असे ते मंदिरात व घरोघरी नित्य शिकविता व सुवार्ता गाजविता राहिले नाहीत.” (प्रे. कृत्ये ५:४२) आम्हाकरिता त्याने केवढे सुरेख उदाहरण समोर मांडले.
३ आम्ही १९९० च्या वार्षिक अहवाल पुस्तकाचे वाचन करताना पाहतो की नवीन शिष्यात भरघोस वाढ करून आमच्या या सेवकपणावर यहोवाने केवढी आशीर्वाद पाठविले. काही देशात तर वाढीचा जो अहवाल आहे तो खरोखरी लक्षवेधक आहे. सबंध जगात जी सर्वसाधारण वाढ झाली तिजबाबत काही वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल. (यशया ६०:२२) पण आमच्या स्थानिक क्षेत्राबाबत काय आहे? तसेच आमच्या स्वतःच्या सेवकपणाबद्दल काय आहे? जसे आम्ही चोहोकडील आमच्या सहकारी सेवकांच्या संयुक्त सेवकपणाच्या यशाबद्दल आनंद करतो तसा आमच्या सेवकपणातील सहभागाबाबत आनंद करीत आहोत का? सेवकपणातील नियमितपणात खंड पडू नये म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील आहोत का?
आमचा वैयक्तीक सहभाग
४ स्पष्ट दिसते की, सर्व क्षेत्रभाग हा सारखेपणात फलदायी नसतो. (मत्तय १३:२३ पडताळा.) हेही खरे की, काही क्षेत्रभागात, जसे की, आयर्लंड व क्विबेक मध्ये अनेक वर्षांच्या परिश्रमपूर्वक सेवकपणाने ईर्षावान सेवकांना आता यशप्राप्ती होत आहे. काही भागात अनेक विरोधक आहेत, तर इतर काही भागात राज्य संदेशाबद्दल भावनाशून्य उदासीन आणि प्रतिसाद न देणारेही भेटतात. तसेच इतर भागात अधिक प्रचारकामुळे क्षेत्रभाग अगदी मर्यादित आहे. पण हा क्षेत्रभाग कसाही असो, आम्हास दोषपात्र न ठरता ईर्षेने कार्य करीत राहणे आहे. प्रेषित पौलाने लिहिलेः “योग्य ते करावयाचा आपल्याला कधी कंटाळा येऊ नये. आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलती. ६:९) त्याचे उपदेशपर शब्द सर्व ख्रिश्चनांना लागू होतात. ते आम्ही कसे करू शकतो? खंड न पाडता आमचे सेवकपण सतत करीत राहण्यात काय आमचे साहाय्य करील?
५ आम्ही जर यहोवावर संपूर्ण भरवसा ठेवला व आमचा टिकाव लागण्यास त्याच्या बलावर विसंबून राहिलो तर आम्ही स्वतःस अधिक क्रियाशील राखू शकू व आमचे उपाध्यपण यशस्वी बनवू. नेहमी आठवणीत असू द्या की, यहोवा आमच्या क्षेत्रास फलदायी बनवीत असतो. (१ करिंथ ३:६) मदतीकरता केलेल्या आमच्या प्रार्थनांचे उत्तर यहोवा आमच्या वैयक्तिक मदतीकरता व लोकांना त्याची ओळख व्हावी म्हणून त्यांचे उपयोगाकरिता, प्रकाशने, उपदेश आणि व्यावहारिक सूचना मुबलकतेत पुरवितो. या तरतूदींचा आम्ही पूर्णपणे लाभ घेत आहोत का?
यथायोग्य चित्तवृतीस टिकवा
६ आम्ही जर नकारात्मक चित्तवृती बाळगली तर ती कदाचित फलदायी सेवकपणाच्या मार्गावर गंभीर अडखळा बनेल. आमच्या क्षेत्रावरील लोकांच्या पूर्वग्रहीत विचारांना अनुसरुन त्यांनी जी अरसिकता गेल्या भेटीच्या वेळी दाखविली तिची प्रतिक्रिया यावेळी आपल्या बोलण्याद्वारा, चेहरेपट्टीवरील तिरस्काराने, दिसून येईल; अशी चित्तवृती व बिनतयारीने आलोत असे दर्शवू नये. आम्हास प्रचार करणे व शिकविणे ही नेमून दिलेली आहे व ते कार्य संपले असे अद्याप आम्हाला कळविलेले नाही. यास्तव, ईश्वरी मार्गदर्शनाच्या आज्ञेत व अधीन राहून कोणताही खंड न पडता सतत आमची सेवा करीत राहण्याची आमची उत्कट इच्छा असावी.
७ यहोवाचा, दुष्टांना इशारा देण्याचा व शिष्यांना गोळा करण्याचे काम करण्याचा उद्देश शेवट होण्याआधी पुरा होणार. यास्तव, आत्ताच आम्ही सेवकपणाचा खरा आनंद लुटू शकतो व आपल्या सेवकपणात कोणाही प्रकारचा खंड पडू न देता नियमितपणे ती करीत राहून विश्वास व प्रेम व्यक्त केल्यास देवाच्या लोकांच्या संगतीत चिरकालिक आशीर्वादांच्या लाभांकडे दृष्टी लावू शकतो.