आमच्या पायनियरांविषयी रसिकता दाखविणे
१ देवाच्या राज्याचे सहकर्मी एकमेकांना दृढता देतात. (कलस्सै. ४:११) सुवार्तेचा प्रचार करणे हे ख्रिस्ती मंडळीचे प्रधान कार्य आहे हे लक्षात आणल्यावर आम्हामध्ये जे ती सेवा पूर्ण वेळेच्या रुपात करीत आहेत अशांविषयी रसिकता दाखविण्याचे अगत्य आहे हे आपल्याला जाणवेल.—मार्क १३:१०; रोम. १६:२; फिलिप्पै. ४:३.
का?
२ प्रचार कार्याच्या विविध प्रकारात मंडळीतील कमअनुभवी प्रचारकांसोबत मिळून कार्य केल्यामुळे हे पायनियर मंडळीची थेटपणे उभारणी करीत असतात. या प्रकारामध्ये मासिकाचे साक्षीकार्य, पुनर्भेटीची तयारी व त्या घेणे आणि पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करून ते प्रभावीपणे चालविणे या गोष्टी येतात. याखेरीज, अनौपचारिक साक्ष देण्यात हे पायनियर निर्भिडपणाचे चांगले उदारहण राखतात. आठवड्याच्या मधल्या दिवशीच्या साक्षीकार्यास सहभाग देण्यामुळे त्यांना इतरांना मदत देता येते. हेच पायनियर जेव्हा अधिक प्रचारकांना सहभागी होता येते त्या सप्ताहाच्या समाप्तीच्या कार्यात पाठबळ देतात तेव्हा त्यांचा सरळ दृष्टीकोण अधिक जाणवतो.
३ मंडळीचे क्षेत्र कसोशीने व वारंवार उरकण्यामुळे पायनियर्स मंडळीची मदत करतात. यामुळे लोकांना आमच्या संदेशासोबत चांगले परिचित होण्याची मदत मिळते तसेच आमची ओळख पटल्यामुळे आम्ही त्यांची भेट घेताना त्यांना मोकळे वाटते. पायनियर अधिक वेळ क्षेत्रात घालवतात, आस्थेवाईक लोकांना प्रकाशने देतात व त्यांच्या आस्थेचा पाठलाग करतात—म्हणजे सत्याच्या बीजाची लावणी करणे व त्याला पाणी देणे—यामुळे अधिक फलदायी क्षेत्र निर्माण होण्यात साहाय्य मिळते.—१ करिंथ ३:६.
मंडळीत
४ विश्वासू पायनियरांचा आवेश व उत्साह बघून पुष्कळांना या पूर्णवेळेच्या कामात उतरण्याचे उत्तेजन मिळाले. मंडळीत कोणी नव्हते यासाठी एक भगिनी नियमित पायनियर होण्यासाठी नाऊमेद झाली. पण विभागिय देखरेख्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ती पुढे झाली व तिने आपले नाव दाखल केले. तिचा मागोवा आणखी इतरांनी घेतला आणि त्या मंडळीत आता आवेशी पायनियरांची मोठी संख्या आहे.
५ कोणी प्रचारक अनियमित किंवा अक्रियाक बनला आहे हे दिसते तेव्हा वडीलजन एखाद्या पायनियराला त्याची मदत करण्यास सांगतील. यामध्ये त्या विशिष्ठाचा पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याचेही समाविष्ट असेल. पायनियराठायी असलेला विश्वास व आवेश त्या व्यक्तीठायी सत्याविषयीचे प्रेम परत जिवंत करण्यात व त्याला त्याच्या समर्पणाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी क्रियाशील बनण्यात साहाय्य देऊ शकते.—१ थेस्स. ५:१४.
पायनियरांना उत्तेजन द्या
६ पायनियर इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही करीत असले तरी त्यांना स्वतःलाही कार्यातील आनंद टिकवून ठेवता येण्यासाठी प्रोत्साहनाची गरज लागते. (रोम. १:१२) तुम्ही पायनियर कार्याविषयी चांगल्या मनोदयाने बोलता का? तुम्ही कोणा पायनियराला त्याच्या किंवा तिच्या कार्याविषयी व स्वार्थत्यागी आत्म्याविषयी प्रशंसा कधी केली होती का? जेव्हा खूपच थोडे प्रचाराला येतात तेव्हा क्षेत्रकार्यात जोडीला कोणीतरी असावेत याची ते खास रसिकता बाळगून असतात. तुम्ही स्वतः पायनियरांना साथ देऊन क्षेत्रात त्यांच्यासोबत अधिक तास खर्च करू शकाल का?
७ आणखी कोणत्या प्रकाराने तुम्हाला पायनियरांना उत्तेजन देता येईल? प्रशंसा करण्यासोबत त्यांच्यासोबत एखादे जेवण घेऊन, त्यांच्या प्रवासखर्चात स्वखुशीने आर्थिक साहाय्य देऊन आणि इतर मार्गाने जे तुम्हाला करता येण्याजोगे आहे ते करून तुम्ही त्यांच्याविषयी तुम्हाला वाटणारी रसिकता दाखवू शकता.—पडताळा १ थेस्सलनी. ५:१२, १३.
८ मंडळीत वडील व उपाध्य सेवक जो पुढाकार घेत आहेत त्याला पायनियर्स व प्रचारक आपला आधार, प्रचारकार्याविषयी आखलेल्या सुसंघटीत व्यवस्थेला पाठिंबा देऊन दाखवू शकतील. याप्रकारे आपणापाशी जे गुण आहेत ते ‘इतरांची सेवा करण्या’मध्ये आपल्याला वापरता येतील.—१ पेत्र ४:१०, ११.