वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९१ पृ. ४
  • सुवार्ता सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सुवार्ता सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हस्तपत्रिकांचा वापर करून
  • आरंभाच्या भेटीत
  • पुनर्भेटीत
  • सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • पत्रिकांचा लाभदायक परिणामांसाठी वापर करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • ट्रॅक्टच्या मदतीने संभाषण सुरू करणे
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९१
km २/९१ पृ. ४

सुवार्ता सादरता

हस्तपत्रिकांचा वापर करून

१ “मी जात असताना एका स्त्रीने मला पवित्र शास्त्र विषयावरील एक हस्तपत्रिका दिली,” असे एका माणसाने संस्थेला लिहिले. “ती ‘शांतीदायक नवीन जगातील जीवन’ ही होती. वाचण्याआधी मी खिन्‍न होतो, पण त्यातील माहिती वाचून माझी मुद्रा प्रसन्‍न झाली व मला शांत वाटले.” या माणसाला अधिक जाणून घ्यायची इच्छा होती व यासाठी त्याने लिहिले, “मी तुम्हापासून ‘यू कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ्‌’ हे पुस्तक लवकरच मिळू शकेल अशी आशा धरतो.”

२ खरेच, आज जे यहोवाची स्तुती करीत आहेत त्यापैकी कित्येकांची आध्यात्मिक आस्था प्रथम एका हस्तपत्रिकेद्वारे जागृत झाली. तुम्ही तुमच्या उपाध्यपणात हस्तपत्रिकांचा वापर करता का? पुष्कळ करीत आहेत. केवळ ब्रुकलिनमध्येच शांतीदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेचे १२ कोटी २० लक्ष प्रतींपेक्षा अधिक मुद्रण झाले. याशिवाय इतर तीन हस्तपत्रिका म्हणजे, तुम्ही पवित्र शास्त्रावर का भाव ठेवावा?, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे? आणि मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा? याच्या इंग्रजीतील २५ कोटी प्रतींचे मुद्रण झाले आहे.

३ हस्तपत्रिकेच्या छोट्या संदेशात देवाच्या वचनाचे जे स्पष्टीकरण देण्यात आले आहे त्याच्या प्रभावाचे मूल्यमापन कमी समजता कामा नये. (इब्री. ४:१२; पडताळा जखर्या ४:१०; याकोब ३:४, ५.) एका साक्षीदाराने लिहिलेः “मी वॉचटावर संस्थेच्या कित्येक हस्तपत्रिकांचे वाचन केले आहे व त्यामुळेच मी सत्य शिकून घेतले आहे.” त्याने आणखी म्हटलेः “या घाईच्या जगात लोकांना वाचनात अधिक वेळ घालविण्याची इच्छा नसते. हस्तपत्रिकेत महत्त्वपूर्ण संदेश त्रोटकपणे दिलेला असतो तो लोकांना वाचण्यापुरता पुरेसा आहे.”

४ लोक सहसा विविध कारणांमुळे आपल्याकडून प्रकाशने घेण्यास का कू करीत असतात. पण त्यांना एखादी हस्तपत्रिका दिली तर ती ते आनंदाने घेतात. एक विभागीय देखरेखे म्हणतात की ते आपल्याजवळ छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत निरनिराळ्या हस्तपत्रिका ठेवतात व त्या घरमालकास दाखवून त्याला जी पसंत वाटते ती घेऊ देतात. “यापैकीची जी सर्वसाधारण हस्तपत्रिका घरमालक उचलतात,” ते म्हणतात, “ती आहे, यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?”

आरंभाच्या भेटीत

५ एखादी हस्तपत्रिका प्रथमतः दिल्यामुळे संभाषण सुरु करायला प्रभावी मदत मिळते असे काही प्रचारकांना आढळले आहे. घरमालकाला ती प्रस्तुत केल्यामुळे जो सुरवातीला दरवाजा उघडण्यास मागेपुढे पहात असतो तो ती बघून पुढे सामोरा येतो.

६ कोणी घरमालक कामात आहे वा त्रासलेला दिसत आहे तर मग, एखादी हस्तपत्रिका देणे पुरेसे ठरते. एका स्त्रीला मृतांना असलेल्या आशेविषयीची हस्तपत्रिका वाचून इतके समाधान झाले की तिने अधिक माहितीसाठी संस्थेला लिहिले. घरी कोणी नाही असे दिसते तेव्हा एखादी हस्तपत्रिका घरात टाकता येते. ती अशी टाकावी की तेथून येणाऱ्‍या जाणाऱ्‍यांना ती नंतर दिसणार नाही.

पुनर्भेटीत

७ जेथे पूर्वी आस्था दाखविली गेली आहे तेथे परत भेट देताना असे म्हणता येईलः “नमस्ते, [स्वतःचे नाव सांगा]. तुम्हाला घरी पाहून मला खरोखरी आनंद होत आहे. आपण मागे भेटलो तेव्हा तुम्ही पवित्र शास्त्रावरील विषयावर बोलण्यासाठी जो उत्साह दाखविला तो प्रशंसनीय आहे. आता मजपाशी आणखी काही माहिती आहे, जी मला वाटते की तुम्हाला मनोवेधक वाटेल. ही शांतीदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेत आहे. तुम्हाला आठवतच असेल की मागे आपण, पवित्र शास्त्र, मानवजातीमधील खरी व दीर्घकालीन शांती याविषयी जे अभिवचन देते त्याविषयी बोललो होतो. या अभिवचनांविषयी लोकांना वाटते की ती स्वर्गातील आहेत, पण पहा येथे स्तोत्रसंहिता ३७:२९ मध्ये काय म्हटले आहे की, हे आशीर्वाद पृथ्वीवर पूर्ण होणार. [शास्त्रवचन वाचा, व ते हस्तपत्रिकेत कोठे आहे ते घरमालकास दाखवा.] हे मनोवेधक वाटत नाही का? [कित्येक परिच्छेदांची चर्चा करा.] यात आणखी प्रोत्साहनदायक शास्त्रवचने दिली आहेत व ती तुम्हाला वाचावयास नक्कीच आवडतील. आज केले त्याप्रमाणेच, पुढील वेळी मी भेट दिल्यावर आपण दोघे मिळून त्याचे वाचन करू शकू.”

८ आमच्या हस्तपत्रिका या देवाकडील देणग्या खऱ्‍याच आहेत. यास्तव आपण देवाच्या स्तुतीसाठी तसेच आपल्याला चिरकालिक आशीर्वाद मिळावा यासाठी आपले उपाध्यपण प्रभावी रितीने पार पाडीत असता या मोलवान मदतीचा आपण कुशलतेने वापर करू या.—नीती. २२:२९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा