आपल्या सेवकपणात धीर दाखवा व पारंगत असा
१ ऐकून घेणाऱ्या सर्व लोकांना सुवार्तेचा प्रसार करण्यामध्ये धीर बाळगला पाहिजे व पारंगत असावयास हवे या जबाबदारीची सूक्ष्म संवेदना पौलाने यहोवासमोर बाळगली. इफिसमधून आलेल्या सर्व देखरेख्यांना त्याने मोठ्या आत्मविश्वासाने असे म्हटलेः “मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढीसुद्धा करीत नाही, ह्यासाठी की, मी आपली धाव आणि देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची जी सेवा मला प्रभु येशूपासून प्राप्त झाली आहे ती शेवटास न्यावी.” (प्रे. कृत्ये २०:२४) आम्हीही असेच करीत रहावयास हवे ही निकड आम्हावर आहे असे आपल्याला वाटते का?— १ करिंथ. ९:१६.
वारंवार केल्या जाणाऱ्या क्षेत्रात
२ आमचे क्षेत्र वारंवार उरकले जाते तेथे आम्हाला धीर राखण्याची मोठी गरज आहे. आमचे क्षेत्र मर्यादित असले तरी आम्ही पुनःपुन्हा भेट घेतली पाहिजे. प्रत्येक घरात राहणाऱ्या सर्वांची भेट घेण्याचा यत्न करा, आणि तेथे आढळणाऱ्या प्रांजळ लोकांना पवित्र शास्त्राधारीत देवाच्या राज्याची आवड वाढविण्याची प्रगतिशील मदत द्या.
३ जेथे आमचे क्षेत्र वारंवार उरकले जाते तेथे धीर बाळगण्याचा फायदा हा की, आम्ही घरमालकाशी व्यक्तीगतपणे चांगले परिचित होऊ शकतो. शिवाय घरमालकाला देखील आपले दार उघडण्यात संकोच वाटणार नाही. रिझनिंग पुस्तक आपल्याला वारंवार उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात आमची प्रस्तावना वेगवेगळ्या तऱ्हेने सादर करण्याचे उत्तम प्रस्ताव पुरविते.—पहा रिझनिंग, पृष्ठे ९-१५.
४ कधी कधी लोक थोडी फार आस्था दाखवीत असले तरी आमची प्रकाशने स्वीकारणार नाहीत असे प्रसंग येतील. याबद्दल आम्हाला कसे वाटावे? आम्ही पारंगत असण्याचा यत्न ठेवल्यास ती आस्था पुढे वाढविण्याची प्रेरणा आम्हाला लाभेल. अंतःकरणात ज्याचे बीजारोपण झालेले आहे त्याची वाढ करण्यात परिश्रम घेतल्यास याचा परिणाम तेथे ओघाओघाने एखादा पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्यात होऊ शकतो. एका बांधवाने घरमालकाची सतत पाच आठवडे भेट घेतली, पण घरमालकाने प्रकाशने स्वीकारली नाहीत. सहाव्या आठवडी मात्र त्याने प्रकाशने घेतली व पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला.
माहितीपत्रके सादर करणे
५ ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान आपण “एक नवे जग—कोणाद्वारे” हा संभाषणाचा विषय घेणार आहोत. हा विषय पुढील कोणत्याही माहितीपत्रकासोबत अगदी प्रशस्तपणे जुळणारा आहे. ती माहितीपत्रके अशीः भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! “पाहा, मी सर्व नवे करतो,” तुम्ही त्रैक्य मानावे का?, द डिव्हाईन नेम दॅट वील एन्डुअर फॉरएव्हर, आणि नंदनवन आणविणारे सरकार. आम्ही या माहितीपत्रकांशी परिचित होण्यात थोडा वेळ दिल्यास आपल्या संभाषणाच्या विषयास अनुलक्षून असणारे पुष्कळ बोलके मुद्दे सापडतील.
६ उदाहरणार्थ, आम्ही आमची ओळख देऊन असे म्हणू शकतोः “जागतिक शांती आणण्याविषयी मानवाच्या अभिवचनांविषयी तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादास वाव द्या.] यासंबंधाने मानवाची ताकद केवढी आहे त्याबद्दल पवित्र शास्त्राचे विवेचन बघा. [वाचा यिर्मया १०:२३.] गेल्या शतकांमध्ये, मानवाने स्वतःवर राज्य करण्यास किती असमर्थ आहोत ते प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. पण आता, देवाने दिलेले अभिवचन लक्षात घ्या. [वाचा २ पेत्र ३:१३.] तेव्हा देवाने नव्या जगाचे दिलेले खात्रीलायक अभिवचन जरुर पूर्ण होणार.” आपण “पाहा!” माहितीपत्रक वापरत असलो तर पान ३० वरील ५८ व्या परिच्छेदात जे म्हटले आहे त्याकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करू. सरकार माहितीपत्रक देत असलो तर ३ऱ्या पानावर पहिल्याच परिच्छेदात जे सांगण्यात आले ते ठळकपणे मांडू. भूतलावरील जीवन माहितीपत्रकाचे मुखपृष्ठच मोठे विलोभनीय असून ते आमच्या संभाषणाच्या विषयासोबत चांगले जुळते. याचप्रमाणे डिव्हाईन नेम माहितीपत्रकातील ३१ व्या पानावरील ३ रा परिच्छेद वापरता येईल.
७ अशाप्रकारे आमचे क्षेत्र धीराने व पारंगत रुपाने उरकल्यास ऐकणाऱ्या लोकांचे तारण घडून येऊ शकेल. (१ तीम. ४:१६) वेळ निघून जात आहे! तेव्हा, तारणाच्या संदेशाची जाहीर ग्वाही देण्यात पूर्ण सहभाग घेत असता आपण धीर राखू या तसेच पारंगत होऊन साक्ष देऊ या.