ईश्वरशासित वृत्त
◆ ऑस्ट्रेलियाने मार्चमध्ये ५४,३०६ प्रचारकांचे शिखर गाठले, हा तिसरा सलग उच्चांक आहे.
◆ या सेवा वर्षात बोलिवियाने पहिल्या सात महिन्यात प्रचारकांचे पाच सलग उच्चांक गाठले. मार्चमध्ये ८,०३१ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठण्यात आला. मंडळप्रचारकांनी सरासरी १४.४ तासांचे सेवाकार्य केले. स्मारकविधीची उपस्थिती प्रचारक संख्येपेक्षा चौपटीने अधिक म्हणजे ३३,३७७ होती.
◆ नऊ वर्षांच्या निर्बंधानंतर आता मे १, १९९१ पासून निकारागुआचे शाखा दप्तर पुन्हा सुरु झाले. येथे आधी पाच मिशनऱ्यांची नियुक्ती केली होती, ते मिशनरी आता परत येऊन आपली मिशनरी सेवा करीत आहेत.