ईश्वरशासित वृत्त
बेनिन: एप्रिलचा अहवाल दाखवतो की, २,७९३ प्रचारकांनी ४,४४२ घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविले आणि ३०,८१४ पुनर्भेटी घेतल्या. हे आकडे तीन नवे उच्चांक दाखवतात.
बलगेरिया: एका वर्षातच प्रचारकांची संख्या १०७ पासून २१८ वर मार्चमध्ये गेली. ही १०४ टक्के वाढ आहे. प्रचारकांनी क्षेत्रकार्यात १९.७ टक्के तास खर्च केले व ५८५ घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविले. त्यांचा पहिला खास संमेलनाचा दिवस मार्च मध्ये भरला आणि याला ९०० उपस्थिती होती.
झेकोस्लोव्हाकिया: मार्चमध्ये २५,१११ प्रचारकांचे नवे शिखर कळवण्यात आले. ही गेल्या वर्षाच्या सरासरीपेक्षा ९ टक्क्यांची वाढ होती.
इक्वेडोर: या वर्षीच्या स्मारक विधीची संख्या ९९,९८७ इतकी होती. एप्रिलमध्ये २१,७३४ प्रचारकांचे नवे शिखर प्राप्त झाले. अजूनही वाढ अपेक्षित आहे.
निकारागुआ: एप्रिलमध्ये राज्यकार्याच्या हरप्रकारात नवे शिखर गाठण्यात आले. स्मारक विधीची उपस्थिती एकंदर प्रचारकांच्या संख्येपेक्षा पाच पटीने अधिक होती. प्रचारक संख्या या महिन्यात ९,६२९ पर्यंत पोहंचली.