जानेवारीत सहाय्यक पायनियर बना
१ सर्वांनी स्वत:स विचारले पाहिजे: ‘जानेवारी महिन्यात कोणत्या मर्यादेपर्यंत मी ज्योतीवाहक बनू शकतो? मी सहाय्यक पायनियर होऊ शकेन का?’—मत्तय ५:१४, १६.
२ काही बाप्तिस्मा पावलेल्या युवकांना शाळेनंतर जास्त वेळ असेल. त्या महिन्याच्या विस्तृत क्षेत्रकार्यात काही पालक व इतर प्रौढ प्रचारकही यांच्यासोबत भाग घेऊ शकतील. जे लोक पूर्णवेळेची नोकरी करत असतील त्यांना सुध्दा ह्या जीवन वाचवण्याच्या सेवेत काही वेळ समर्पित करता येईल.
३ सहाय्यक पायनियर म्हणून काम करण्यामागील मूळ कारण म्हणजे अधिक काम करण्याची आमची स्वखुषी. (लूक १३:२४) जर आम्ही आपली कौटुंबिक व मंडळीची जबाबदारी व्यवस्थिपणे संघटीत केली, तर सहाय्यक पायनियरिंगचा आनंद मिळवण्यासाठी आम्हाला जरुर वेळ मिळेल.
४ जानेवारीत तुम्ही तुमच्या सेवेत अधिक वाढ करु शकाल का? असे केल्याने तुमचा क्षेत्रकार्यात आत्मविश्वास वाढण्यास सहाय्यक ठरेल व उभारणीकारक अनुभवांचा आनंद तुम्ही घेऊ शकाल.—प्रे. कृत्ये २०:३५.