महत्त्वपूर्ण साधनांचा सुज्ञतेने वापर करणे
१ घरोघरची साक्ष देताना, पवित्र शास्त्र व इतर महत्त्वपूर्ण साधनांचा वापर करून प्रत्येक घरमालकासोबत उभारणीकारक व शास्त्रवचनीय संभाषण करण्याकडे लक्ष ठेवा. (पडताळा २ करिंथ. ६:१; २ तीमथ्य. २:१५.) या दिवसामध्ये तुमच्या क्षेत्रातील लोकांना कशाविषयी काळजी वाटत आहे? त्यांना आर्थिक परिस्थितीविषयी व चांगल्या कौटुंबिक जीवनाचा दर्जा लोपत आहे याविषयी काळजी वाटत आहे का? यातील कोणत्याही विषयावर थोड्या प्रास्ताविक विचारांचा परिणाम उत्तम अशी पवित्र शास्त्राची चर्चा करण्यात होऊ शकतो.
२ तुम्ही म्हणू शकता:
▪“या आव्हानात्मक समयात, पुष्कळ लोकांना त्यांच्या गरजा भागविणे फार कठीण जात आहे. मानवी सरकारे आमच्या आर्थिक गरजा प्रत्येकासाठी न्याय्य असेल अशाप्रकारे सोडवतील असे तुम्हाला वाटते का? [प्रत्युत्तर ऐका.] व्यक्तिगतपणे मला हा विचार फारच प्रोत्साहनदायक वाटला. . . ”
३ नंतर तुम्ही स्तोत्रसंहिता ७२:१२-१४ वाचू शकता व रिझनिंग पुस्तकातील पृष्ठे १५४-५ मधून अधिक वचन निवडून तुम्ही संभाषण करू शकता. किंवा एक शास्त्र वचन वाचल्यावर, शांतिदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेतील परिच्छेद पडताळू शकता. तरूणांसहित—अनेक प्रचारक—हस्तपत्रिकेचा उपयोग करून यशस्वीरित्या पवित्र शास्त्र अभ्यास घेत आहेत, यात ते हस्तपत्रिकेतील परिच्छेद वाचल्यावर वाचलेल्या माहितीवर घरमालकाला त्याचे विचार विचारतात.
४ काही वसाहतीत तुम्हाला हा पावित्रा वापरावासा वाटेल:
▪“पवित्र शास्त्राकडे कोणत्या दृष्टिने पहावे याची चर्चच्या पुष्कळ सदस्यांना खात्री नाही. पवित्र शास्त्र देवाचे वचन आहे असे तुम्हाला वाटते का, किंवा काही लोकांच्या विचारानुसार ते एक चांगले साहित्य आहे असे तुम्हालाहि वाटते? [प्रत्युत्तरासाठी थांबा.] पवित्र शास्त्रात बुद्धिचे अमाप सल्ले आहेत, त्याचे अनुकरण प्रत्येकाने केले असते तर, त्यामुळे आनंदी जीवन जगणे शक्य झाले असते याजशी पुष्कळ लोक सहमत आहेत.”
५ आता तुम्ही २ तीमथ्य ३:१६, १७ मधील पौलाच्या वाक्यप्रयोगाचा परिचय देऊ शकता किंवा चर्चा करू शकता व तुम्ही पवित्र शास्त्रवावर भाव का ठेवू शकता? या हस्तपत्रिकेतील मुद्यांचा वापर करून पहिल्याच भेटीत पवित्र शास्त्र अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करू शकता.
६ घरमालकाने आस्था दाखविल्यास, या महिन्यासाठी तुमच्या भाषेतील सुचविलेल्या प्रकाशनाच्या सादरतेतील संस्थेच्या १९२ पृष्ठांच्या एखाद्या जुन्या पुस्तकाचे मुल्य दाखवा, किंवा तुम्ही जर आपल्या समस्या माहितीपत्रक सादर करीत आहात तर ते दाखवू शकता. किंवा, जर तुम्हाला वाजवी वाटत असेल तर, हस्तपत्रिका, मासिक, एखाद्या माहितीपत्रकाचा वा बुद्धिमानीपूर्वक वापर करू शकता.
७ तुम्ही पहिल्याच भेटीत अभ्यास केला असेल तर, पुढल्या वेळी चर्चा कायम करीत राहण्यासाठी निश्चित योजना करा. जेव्हा पुन्हा तुम्ही भेट देणार त्यावेळी “देव दुःखाला परवानगी का देतो?” या सामान्यपणे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या उत्तराची सहभागिता करण्यास तुम्हाला आवडेल अशा रितीने पुढील भेटीसाठी पाया घालू शकता. पुनःभेटीत विषय कसा विकसित केला जाऊ शकतो हे खालील लेख सुचवील.