प्रश्न पेटी
▪ साहाय्यक पायनियरिंग सेवेकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहावे?
साहाय्यक पायनियरिंग एक विशेषाधिकार व गंभीर जबाबदारी आहे अशा दृष्टीने त्याकडे पाहावे. संपूर्ण जगभरात हजारो प्रचारकांना प्रत्येक महिन्याला साहाय्यक पायनियर म्हणून नियुक्त केले जाते आणि काही तर निरंतरपणे करत आहेत. आम्ही ह्या आवेशी प्रचारकांची प्रशंसा करतो ज्यांना प्रत्येक महिन्याला क्षेत्रकार्यात ६० तास खर्च करण्यासाठी परिस्थिती अनुमती देते जेणेकडून ते साहाय्यक पायनियर म्हणून काम करतात. जे प्रचारक साहाय्यक पायनियरिंग सेवा करतात अशांना वडीलांनी तसेच इतरांनी त्यांची ही नियुक्ती गंभीरतेने घ्यावी व कोणतीही निष्काळजी मनोवृत्तीची प्रवृत्ती टाळली पाहिजे असे उत्तेजन द्यावे.
नियमित पायनियरांच्या बाबतीत, साहाय्यक पायनियर म्हणून एक किंवा अधिक महिन्यांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी पहिल्यांदा खर्चाचा अंदाज करावा. (लूक १४:२८) यामध्ये, इतर ख्रिश्चन जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष न करता क्षेत्रकार्यात जरुरीच्या तासांना ते पूर्ण करु शकतील की नाही याचा आधीच विचार करावा. साहाय्यक पायनियरिंग करण्याचा एखाद्या व्यक्तीचा निर्णय त्याच्या व्यक्तीगत परिस्थितीनुसार प्रार्थनापूर्वक घेतला पाहिजे. दुसरे करत आहे म्हणून आपणही करु अशा उसळलेल्या भावनांनी प्रवृत्त होऊन करु नये. जरुरीच्या गोष्टींचा विचारशील निर्णय घेऊन एक लिखित आराखडा तयार केला पाहिजे. अर्जावर जे काही लिहिले आहे ते लक्षपूर्वक वाचले पाहिजे व त्याच्या मनातच विचार केला पाहिजे की तो त्यामध्ये दिलेल्या सर्व गरजांना प्रामाणिकपणे होय असे म्हणेल.
यामध्ये अधिक प्रयत्न गोवलेले आहेत यात काही शंका नाही. वर्षातील काही महिने सुवार्तेचा प्रचार करण्यात ‘गढून जाण्यासाठी’ संधी देतात. (प्रे. कृत्ये १८:५) यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यातील स्मारक विधीचा काळ, तसेच फिरते पर्यवेक्षक मंडळीला भेटी देतात त्या महिन्यांचा समावेश आहे. अनेक प्रचारक स्वत:ला आनंदाने कडक शिस्त लावतात जेणेकडून ते ह्या विशेष कार्यात अधिक भाग घेऊ शकतील व असे केल्याने समृद्ध आशीर्वाद मिळतील ह्याची गुणग्राहकता बाळगतात. (२ करिंथ ९:६) पुष्कळ प्रचारक सुटीच्या महिन्यात व वर्षांतील ज्या महिन्यात पाच पूर्ण सप्ताहअंत आहेत अशा वेळी पायनियरिंग करण्यासाठी ते खास प्रयत्न करतात. सही करण्याद्वारे ‘तुमचे बोलणे होय तर होय’ या पवित्र शास्त्राच्या तत्त्वाचे अनुकरण करतात व साहाय्यक पायनियरिंग करीत असताना प्रत्येक महिन्याला ६० किंवा अधिक तासांचा अहवाल देण्यासाठी ते प्रयत्न करतात.—मत्तय ५:३७.
ज्या प्रचारकांना पायनियरिंग करता येत नसेल त्यांनी एखादी ठराविक वेळ ठरवून साहाय्यक पायनियरांबरोबर काम करण्यासाठी जावे. शक्य असेल तेव्हा पायनियरांबरोबर सेवेत अधिक वेळ राहणे मदतीचे ठरेल. पायनियरांना प्रचारकांनी अगदी सकाळी, दुपार होईपर्यंत, किंवा संध्याकाळी लवकर मदत दिल्यास ते खूप आवडेल. साहाय्यक पायनियरांना दुसऱ्यांबरोबर पुनर्भेटी व पवित्र शास्त्राभ्यासाला जाण्यास कोणी आमंत्रण दिले तर त्यांना फार आनंद होईल. साहाय्यक पायनियरांना जे अशा प्रकारचा पाठिंबा देतात ते नक्कीच मोठ्या आनंदाची कापणी करतील.—प्रे. कृत्ये २०:३५.
अनेक साहाय्यक पायनियरांच्या आवेशपूर्ण कार्याची हृदयपूर्वक गुणग्राहकता जाणली जाते. त्यांच्या सोबत कार्य करणारे समृद्ध आशीर्वादाची अपेक्षा करु शकतील. (नीती १०:४) साहाय्यक पायनियर म्हणून ह्या अधिक कार्याच्या आनंदात तुम्ही पुन्हा कधी सहभाग घेणार आहात?