सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तक सादर करण्यासाठी पत्रिकांचा उपयोग करा
१ जून महिन्याच्या दरम्यान, आम्ही सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करणार आहोत. संक्षिप्त शास्त्रीय सादरता दिल्यानंतर थेटपणे ते पुस्तक दाखवू शकतो आणि घरमालकाला पुस्तकाच्या शेवटल्या अध्यायातील चित्र दाखवू शकतो ज्यामध्ये येशूच्या राज्यामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असेल हे दाखवले आहे. पुस्तकामध्ये आस्था वाढविण्यासाठी पत्रिकांचा विकल्प उपयोग करू शकता.
२ या जगाचा बचाव होईल का? संभाषण सुरु करण्यासाठी पत्रिका खूप मदतगार ठरतात. घरमालकाचे लक्ष वेधण्यासाठी ते साहाय्यक आहेत कारण त्यांच्यावर व्यक्तिगतपणे परिणाम होतील असे पत्रिकांचे अर्थपूर्ण विषय असतात.
उदाहरणार्थ, तुम्ही असे काही तरी म्हणू शकता:
▪“लोकांसोबत बोलत असताना, अनेक लोकांना . . . [बातम्यांमधील एखादी अलिकडचीच घटना निवडा] काळजी लागली आहे. असे दिसते की हे जग वाईटापासून अधिक दुष्ट होत आहे. काही जण असाही विचार करतात की या जगाचा बचाव होईल की नाही. याबद्दल तुम्हाला कसे वाटते? [घरमालकास प्रतिसाद देण्यासाठी वाव द्या. अनेक लोक आशावादी असतात.] मी काही तरी उत्तेजक असे वाचले आहे आणि त्याचा तुमच्याबरोबर सहभाग घेण्यास मला आवडेल. ते ह्या पत्रिकेत आहे. [या जगाचा बचाव होईल का? ही पत्रिका घरमालकास देऊन, तुमच्याही हातात एक प्रत असू द्या.] येशूने कसा भविष्यवाद केला याकडे नीट लक्ष द्या . . . ” तुमच्या प्रस्तावनेमध्ये ज्या घटनेचा उल्लेख तुम्ही केला तिच्या बरोबर एकरूपतेत असणारे पृ. ४ किंवा ५ वरील परिच्छेद वाचा. यानंतर मग सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करा. उचित असल्यास, १११ अध्यायातील येशूच्या भविष्यवाणीवरील अधिक माहिती दाखवा. निघण्यापूर्वी, येशू, व त्याच्याकरवी यहोवाबद्दलची माहिती प्राप्त करण्यासाठी व ती चिरकालिक जीवनाकडे कशी निरवू शकते याचे थोडक्यात स्पष्टीकरण द्या. (योहान १७:३) तसेच तुमच्या पुढील भेटी दरम्यान चर्चेसाठी एखाद्या विषयावर एखादा प्रश्न विचारण्यास विसरू नका.
३ शांतीदायक नवीन जगातील जीवन: शांतीदायक नवीन जगात जीवन जगण्याचा अर्थ तुमच्यासाठी काय होतो? सर्वसाधारणपणे, लोक भव्य नद्या आणि शांतीपूर्ण दऱ्या जेथे सुदंर प्राणी एकमेकांसोबत शांतीने राहत आहेत अशा दृश्याचा विचार करतात. सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे ज्यांना विचलित झाल्यासारखे वाटायला लागले आहे त्यांना तजेला देणाऱ्या एका शांतीपूर्ण नव्या जगाची आशा प्राप्त होईल.
४ तुमच्या शेजाऱ्यांसाठी, तुमच्याबरोबर काम करणाऱ्यांसाठी आणि घरोघरी तुम्ही ज्यांना भेटता त्यांच्यासाठी काही उत्साहवर्धक व सुखकारक असे सादर करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
“शांतीपूर्ण नवीन जगातील जीवन” या पत्रिकेचा उपयोग करून तुम्ही असे म्हणू शकता:
▪“ह्या पत्रिकेच्या पृष्ठावर दाखवल्याप्रमाणे लोकांनी शांतीत राहणे कधी शक्य आहे असे तुम्हाला वाटते का? [घरमालकास प्रतिसाद देण्यासाठी वाव द्या.] पृ. २ वरील पहिल्या परिच्छेदाच्या शेवटच्या वाक्याकडे जरा पहा. ते असे विचारते: ‘अशा प्रकारची परिस्थिती खरोखरी पृथ्वीवर अस्तित्त्वात येणार आहे ह्यावर विश्वास ठेवणे केवळ एक स्वप्न किंवा काल्पनिक गोष्ट आहे का?’ [पत्रिकेतील पुढील परिच्छेद वाचा.] नवे आकाश आणि नव्या पृथ्वीचा संदर्भ पवित्र शास्त्राच्या २ पेत्र ३:१३ वचनामधून आहे. तुमच्याकडे पवित्र शास्त्र असल्यास, कृपया तुम्ही ते आणू शकता जेणेकडून आपण पृथ्वीच्या भवितव्याबद्दल आणखी शिकण्यासाठी स्तोत्र १०४:५ वाचू शकतो.” किंवा तुमच्या पवित्र शास्त्रातून तुम्ही ते वाचू शकता. आणि सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाच्या १३३ अध्यायाकडे चर्चा करण्यासाठी निर्देशन करा.
५ ज्या बीजाचे रोपण केले आहे त्याला “पाणी” घालण्यासाठी पुढे पुनर्भेटींची आवश्यकता आहे. (१ करिंथ. ३:६, ७) पहिल्या भेटीतच किंवा तुमच्या पुनर्भेटीत, सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातून पवित्र शास्त्र अभ्यास कसा चालू करता येऊ शकतो त्याच्या सूचना पुढील लेखात दिल्या आहेत.