गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालवणे
१ परिणामकारक गृह पवित्र शास्त्र अभ्यास कसा चालवला जातो? कोणते प्रारंभिक उदाहरण आम्हापाशी आहे? अभ्यासाच्या साहित्यातील शास्त्रवचनांचा कसा विचार केला जाऊ शकतो? परिच्छेदांचे वाचन कोणी करावे? अभ्यास चालवण्याच्या मूलभूत कार्यप्रणालीसोबतच, विद्यार्थ्याला सत्य आपलेसे करुन घेण्यास मदत करण्यासाठी आणखीन कशाची गरज आहे? कोणत्या धोक्यांना टाळले पाहिजे?
२ अभ्यास कसा चालवावा: सर्वसाधारणपणे सांगावयाचे म्हणजे, गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालवताना टेहळणीबुरुज अभ्यासाच्या नमुन्याचेच अनुकरण केले जाते. प्रथम, ज्या परिच्छेदाचा विचार करण्यात येणार आहे तो वाचण्यात येतो. त्यानंतर अभ्यास चालक त्या परिच्छेदावर आधारित छापील प्रश्न विचारतात व विद्यार्थ्याला उत्तर देण्यास अनुमती देतात. विद्यार्थी उत्तर देण्यास घुटमळत असल्यास, चालकाने सूचक प्रश्न विचारावयास तयार असावे जेणेकरून विद्यार्थी विषयासंबंधी तर्क करु शकेल व योग्य समारोपास पोहचू शकेल.
३ परिच्छेदातील शास्त्रवचने विषयाला कशी लागू होतात हे विचारात घ्या. अवतरीत केलेल्या शास्त्रवचनांना कसे ओळखावे हे विद्यार्थ्यास दाखवा व ते कसे लागू करावे याबद्दल त्याच्याशी विचारविनिमय करा. जर शास्त्रवचनांचा केवळ संदर्भ दिलेला असेल पण अवतरीत केलेले नसतील, व जास्त लांब नसतील तर, ती पवित्र शास्त्रातून काढून पाहणे चांगले ठरेल. त्यांनतर विद्यार्थ्याला त्यांना वाचावयास व परिच्छेदात जे सांगितले आहे त्याला ते कसे आधार देतात अथवा स्पष्ट करतात यावर अभिप्राय मांडण्यास अनुमती द्या.
४ विद्यार्थ्याला सत्य आपलेसे करावयास मदत करा: अभ्यासाची चांगली तयारी करण्यास विद्यार्थ्यांना उत्तेजन द्या. शिकण्यासाठी वाचणे हे महत्त्वाचे आहे यावर जोर द्या. विद्यार्थी जितके जास्त अभ्यासाचे साहित्य वाचतो व त्यावर मनन करतो तितके अधिक चांगले आहे. काही अभ्यास चालक पवित्र शास्त्र अभ्यासाच्या दरम्यान सर्व परिच्छेद विद्यार्थ्यास वाचावयास देतात. इतर विद्यार्थ्यासोबत परिच्छेदाचे वाचन आलटून पालटून करतात. याबाबतीत विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक प्रगतीला ध्यानात घेऊन योग्य निवडीचा वापर करणे चांगले ठरेल.
५ केवळ ज्ञानवर्धनाच्या पद्धतीने अभ्यासाच्या साहित्याची हाताळणी केल्याने विद्यार्थ्याला कदाचित ज्ञान मिळण्यास मदत होईल, परंतु तो जे काही शिकत आहे त्यावर त्याचा विश्वास आहे का? त्याला सत्य आपलेसे करावयाचे असल्यास, त्याला वैयक्तिकपणे तो विषय काय परिणाम करतो हे त्याने पाहिलेच पाहिजे. तो जे शिकतो त्याबद्दल त्याला कसे वाटते? शिकलेल्या गोष्टींचा तो कसा वापर करु शकतो? विद्यार्थ्याच्या हृदयाप्रत पोहोचण्यासाठी अशा शोधक प्रश्नांचा उपयोग करा.
६ धोक्यांना टाळा: पवित्र शास्त्र अभ्यास चालवताना असे काही धोके आहेत ज्यांना टाळले पाहिजे. विचारात घेतल्या जाणाऱ्या साहित्याला अनुसरून नसणारे विषय सामोरे आल्यास, सर्वसाधारणपणे, अभ्यासाच्या समारोपास अथवा दुसऱ्या वेळेस त्यांची चर्चा करणे उत्तम ठरेल. तसेच, विद्यार्थ्याने पुस्तकातून उत्तरे वाचून दाखवण्याऐवजी त्याच्या स्वतःच्या शब्दात देणे महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्याला विषय समजत आहे की नाही हे ठरवण्यास तुम्हाला एक चालक या नात्याने मदत होईल.
७ निदान एक तरी पवित्र शास्त्र अभ्यास चालवण्याचे ध्येय तुम्ही का ठेवत नाही? जर तुम्ही यहोवावर अवलंबून राहात असाल व टेहळणीबुरुज अभ्यासाच्या मूलभूत कार्यप्रणालीला अनुसरत असाल तर हे काही कठीण काम नाही. इतरांना सत्य शिकवण्याचा व शिष्य बनवण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालवणे हा होय. असे केल्याने, मत्तय २८:१९, २० मधील येशूच्या आज्ञेच्या पूर्णतेत संपूर्ण सहभाग घेण्याच्या आनंदाचा तुम्हीही अनुभव घेऊ शकता.