सढळ हाताने परंतु विचारपूर्वक पेरणी करा
१. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असते की त्याने आपला हात राखून पेरणी केली तर तो त्याच मानाने कापणी करील; आणि त्याने सढळ हाताने पेरणी केली तर त्याच मानाने कापणी करील. (२ करिंथ. ९:६) जेथे वाढ शक्य नाही तेथे पेरणी करून बियाणे वाया न घालवण्याविषयी शेतकरी सावध असतात. तसेच आपल्या क्षेत्रातही आपण साहित्य विचारपूर्वक सादर करण्याची गरज आहे. जे साहित्य वाचू इच्छितात अशांना ते देण्याची आपली इच्छा आहे. केवळ योग्य असलेल्यांनाच आपण, यहोवाच्या अपात्र कृपेविषयी आणि राज्य आशेविषयी शिकण्याची संधी देऊ इच्छितो.
२. नियतकालिके, माहितीपत्रके आणि इतर प्रकाशने आपल्या क्षेत्रातील योग्य असलेल्यांना सत्याचे ज्ञान मिळण्यास मदत देण्याकरता वापरण्याऐवजी ती आपल्या घरातील कपाटात धूळ खात पडली आहेत असे तुम्हाला दिसते का? (पडताळा मत्तय २५:२५.) राज्य प्रचार कार्याचा खर्च कसा चालवला जातो हे कधीकधी घरमालकास पहिल्याच भेटीत सांगण्यास तुम्हाला लाज वाटली होती म्हणून तुम्ही नियतकालिके किंवा इतर साहित्य त्यांना दिली नाही, असे झाले आहे का? अनुभवी प्रचारकांना असे आढळून आले आहे, की प्रचार कार्याचा खर्च कसा चालवला जातो हे समंजस घरमालकास साध्या आणि सरळ शब्दांत सांगितले जाते तेव्हा ते लगेच प्रतिसाद देतात.
३. तुम्ही म्हणू शकता:
▪ “आम्ही साहित्य विनामूल्य कसे काय देतो, याचा कदाचित तुम्ही विचार करत असाल. हे, ऐच्छिक दानांद्वारे चालणाऱ्या जागतिक शैक्षणिक कार्याचा एक भाग आहे. या कार्यासाठी तुम्ही काही देणगी देऊ इच्छित असाल तर ती मी आनंदाने स्वीकारेन.”
४. साहित्याची किंमत किती आहे असे पुष्कळ घरमालक विचारतात.
तेव्हा तुम्ही असे उत्तर देऊ शकता:
▪ “साहित्याची काही ठराविक किंमत नाही कारण आमचं कार्य ऐच्छिक दानांवर चालतं. तुम्ही जर लहानशी देणगी देऊ इच्छित असाल तर तिचा उपयोग जगभरात चाललेल्या शैक्षणिक कार्यासाठी केला जाईल.”
किंवा तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “बायबलविषयी अधिक शिकण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना आम्ही आमचे साहित्य देतो. जगभरात चाललेल्या या कार्यासाठी तुम्ही लहानशी देणगी देऊ इच्छित असाल तर आम्ही ती आनंदाने स्वीकारू.”
५. मासिक कार्य करताना काही प्रचारक नियतकालिकाचे आतील पान उघडून असे म्हणतात:
▪ “इथं तुम्ही पाहू शकता, आमच्या कार्याला ऐच्छिक देणगीद्वारे हातभार लावला जातो. या कार्याला लहानशी देणगी देऊन तुम्ही साहाय्य करू इच्छित असाल तर मी ती देणगी संस्थेला पोचवण्याची व्यवस्था करेन.”
आणखी एक साधी सूचना:
▪ “आमची प्रकाशनं विनामूल्य सादर केली जात असली तरीसुद्धा, जगभरात चाललेल्या आमच्या कार्यासाठी आम्ही देणग्या स्वीकारतो.”
६. आपल्या कार्याचा खर्च कसा भागवला जातो हे सांगायला आपल्याला कुचराई होते म्हणून राज्याचे बीज पेरण्यापासून आपण आपला हात राखता कामा नये. परंतु त्याचबरोबर आपण विचारीपणा देखील दाखवला पाहिजे जेणेकरून आपले साहित्य ‘खडकाळ जमिनीवर’ पडून वाया जाणार नाही. (मार्क ४:५, ६, १६, १७) आपण सांगत असलेल्या सुवार्तेची कदर बाळगणाऱ्यांना, या कार्यासाठी भौतिक रूपात हातभार लावण्याची संधी मिळते तेव्हा आनंद वाटतो.—पडताळा मत्तय १०:४२.