त्यांना “पुन्हा आणखी” ऐकण्यास मदत करा
१ “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.” (प्रे. कृत्ये १७:३२) तो अरीयपगात पौलाने दिलेल्या प्रसिद्ध भाषणाबद्दल तो काहींचा प्रतिसाद होता. अशाचप्रकारे आजही, सुरवातीच्या भेटीत आपण सांगितलेल्या राज्य संदेशाबद्दल आणखी ऐकण्यास काहीजण इच्छुक आहेत.
२ आपण आस्था वाढवण्यास पुन्हा जातो तेव्हा अधिक शिकवण्याचे कार्य करतो. चांगली तयारी केल्याने आपल्याला सकारात्मक परिणाम मिळवण्यास मदत मिळेल. स्कूल गाईडबुक पृष्ठ ५१ यावर अशी शिफारस करते: “प्रथम मनातच त्या साहित्याला आधार देणारी सुसंगत वाक्ये ठरवा. एखादी गोष्ट तशी का आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करा. त्या कल्पना तुम्ही तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये मांडू शकता का ते पाहा. शास्त्रवचनीय पुराव्यांची चांगली समज प्राप्त करा. शास्त्रवचनांना परिणामकारकपणे लागू करण्यास तयार असा.”
३ “द बायबल—गॉड्स वर्ड ऑर मॅन्स्?,” हे पुस्तक दिले असल्यास तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
▪“आपण यापूर्वी बोललो होतो तेव्हा, बायबलवर आपण भरवसा का ठेवू शकतो याच्या कारणांबद्दल चर्चा केली होती. मी तुम्हाला दिलेल्या पुस्तकात, ‘बायबल का वाचावे?’ हा प्रश्न उठतो. [पृष्ठ ५ वरील प्रस्तावना वाचा आणि समारोपाच्या प्रश्नाबद्दल प्रतिसादासाठी वाव द्या.] बायबल आपल्याला हे सांगते, की लवकरच देव स्वतः मानवजातीच्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवील. त्या आनंदी समयाच्या आशीर्वादांना अनुभवण्यासाठी आपण ज्या मार्गाने जावयास हवे तेथे ते आपल्याला मार्गदर्शित करते. [स्तोत्र ११९:१०५ वाचा.] हे पुस्तक बायबलचे व्यक्तिगत तसेच कौटुंबिक अभ्यासाचे साधन म्हणून त्याची रचना करण्यात आली आहे. त्याचा वापर कसा करावा हे दाखवण्यास मला आवडेल.”
४ “तुम्ही पवित्र शास्त्रावर भाव का ठेवू शकता,” ही पत्रिका जेथे दिली आहे त्या भेटींमध्ये तुम्ही असे म्हणू शकता:
▪“भविष्यात काय होईल याबद्दल आपण सर्वच आस्था बाळगून आहोत. सध्याच्या जागतिक परिस्थितींना लक्षात घेता, काय होईल असे तुम्हाला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मनुष्य केवळ काय होईल याची कल्पना करू शकतो परंतु देवाला काय घडेल अगदी तेच ठाऊक आहे. [यशया ४६:१० वाचा.] लवकरच आपण नंदनवनमय नव्या जगाच्या आशीर्वादांचा आनंद लुटू असे बायबल भाकीत करते हे शिकून घेण्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. [पृष्ठ ४ वरील तिसरा परिच्छेद वाचा.] या सुंदर अभिवचनाबद्दल मी तुम्हाला आणखी सांगतो.”
५ तुम्ही एखादे पुस्तक किंवा “आपल्या समस्या” यासारखे एखादे माहितीपत्रक दिल्यावर पुनर्भेट करीत असाल, तर कदाचित ही सूचना तुमच्यासाठी परिणामकारक ठरेल:
▪“अलिकडेच मी तुम्हाला बायबल वर आधारित असलेले प्रकाशन दिले होते आणि त्याचा उत्तम उपयोग करावयास तुम्हाला मदत करण्यासाठी पुन्हा येईन असे वचन दिले होते. इतरांसोबत मित्रत्वाचे संबंध राखणे हा आमच्या पुष्कळ समस्यांवरील उपाय आहे. ते कसे केले जाऊ शकते याबद्दल बायबल उत्तम सल्ला पुरवते आणि आपल्याला ज्याची गरज आहे ते शोधण्यास न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन सोपे करून देते. [पृष्ठ १५९५ काढा आणि “लव (लव्स्) या शीर्षकाखाली पाहा.” १ करिंथकर १३:४; कलस्सैकर ३:१४; तसेच १ पेत्र ४:८ अशा शास्त्रवचनांकडे लक्ष आकर्षित करा. या तत्त्वांना लागू केल्याने उत्तम परिणाम कसे मिळतील हे संक्षिप्तपणे समजावून सांगा.] बायबल आपल्या समस्यांसाठी व्यावहारिक उपाय कसे सादर करते याचे ते एक उदाहरण आहे. पुढील वेळी, बायबल आपल्याला आनंद आणि मनाची शांती मिळवण्यात मदत करू शकते अशा आणखी एका मार्गाबद्दल तुम्हाला सांगण्यास मला आवडेल.”
६ देव वचनाबद्दलच्या अचूक ज्ञानाशिवाय आपल्याजवळ इतरांना सांगण्याजोगा आणखी कोणताच मोठा ठेवा नाही. असे ज्ञान यहोवाच्या भयाबद्दल शिकवण देऊ शकते आणि सार्वकालिक आशीर्वाद आणणाऱ्या त्याच्या मार्गात चालण्यास लोकांना उत्तेजन देते.—नीती. २:२०, २१.