तरुण “आनंद“ कसा करू शकतात हे त्यांना सांगणे
आपण विपत्तीकारक परिस्थितींना सूचित करणाऱ्या बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत अशा समयात जगत आहोत. पुष्कळजण तसेच तरुण लोकही, निवांत आणि शांतीमय जीवन व्यतीत करण्यासाठी मनःस्तापी समस्या सोडवण्याचा प्रायत्न करत आहेत. ‘आपल्या मनातून खेद कसा दूर करावा आणि देह उपद्रवापासून कसा राखावा’ या बायबलच्या सल्ल्याचा ते फायदा घेऊ शकतात. (उप. ११:९, १०) मार्च महिन्यादरम्यान, यंग पीपल आस्क हे पुस्तक सादर करून त्यांना “आनंदी” होण्यास साहाय्य करण्याची आपल्याला एक संधी आहे. ते पुस्तक सादर करतेवेळी आपण हे लक्षात ठेवावे की, आज सर्वसामान्यपणे तरुण आणि मानवजात ज्या समस्यांचा सामना करीत आहेत त्याच्याबद्दल बायबलमध्ये भाकीत केले होते आणि बायबल त्यावर उपाय देखील सादर करते. तेव्हा, आपण काय म्हणू शकतो?
२ अशी सुरवात करणे कदाचित परिणामकारी ठरू शकते:
▪ “या २० व्या शतकात, कौटुंबिक ताटातूट, घटस्फोट, एकाकीपणा, लैंगिकरित्या संक्रमित होणारे आजार, मादक पदार्थ आणि मद्यपानाशी संबंधित असलेल्या समस्या व अशाच प्राकारच्या इतर समस्यांनी तरुण लोक पछाडले आहेत. या समस्यांना काही तोडगा आहे असे तुम्हाला वाटते का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] बायबलमध्ये या सर्व समस्यांबद्दल सांगितले आहे हे कळाल्यावर पुष्कळांना आश्चर्य वाटते. उदाहरणार्थ, मित्र बनवणे आणि त्यांच्याशी मैत्री कायम ठेवणे या बाबतीत येशूने त्याच्या सुपरिचित प्रावचनांतील एका प्रावचनात सुवर्ण नियमाबद्दल सांगितल्याचे तुम्ही कदाचित ऐकले असावे. [यंग पीपल आस्क पुस्तक उघडून पृष्ठ १६३ वरील परिच्छेद १ मधील सुवर्ण नियम वाचा.] कुटुंब आणि इतरांसोबत शांती आणि ऐक्य कायम टिकवून ठेवण्यास मदत करणारे आणखी एक तत्त्व रोमकर १२:१७, १८ मध्ये दिले आहे. [त्याच पृष्ठावरील परिच्छेद ३ मधून ते वाचा.] तुमचे दैनंदिन जीवन आणखी सुरळीत आणि आनंदी बनवण्यासाठी या आणि इतर तत्त्वांना कसे लागू करावे हे तुम्हाला शिकण्यास आवडेल का?” पृष्ठे ८ आणि ९ वरील अनुक्रमणिकेतील काही विषय दाखवून पुस्तक सादर करा.
३ हा प्राश्न कदाचित रसभरीत चर्चा प्रावृत्त करू शकतो:
▪ “तरुण लोकांना त्यांच्या समस्यांचा यशस्वीपणे सामना करण्यास मदत करण्यासाठी काही केले जाऊ शकते असे तुम्हाला वाटते का? [प्रातिसादासाठी वाव द्या.] अनेकांना ठाऊक आहे की, आज पुष्कळसे विद्यालयीन शिक्षण उपलब्ध आहे. परंतु नैतिक शिक्षण—जीवनाच्या शिक्षणाबद्दल काय? तरुण आणि वृद्ध लोकांना उत्तम, आनंदी जीवन जगण्यास मदत करणारा विश्वासनीय सल्ल्याचा स्रोत आहे का?” यशया ४८:१७, १८ वाचा आणि यंग पीपल आस्क पुस्तकाच्या पृष्ठ ६ वरील दुसऱ्या परिच्छेदाच्या शेवटल्या भागावर विवेचन करा. या पुस्तकात दिलेल्या बायबल आधारित सल्ल्याचा लाभ घरमालक व्यक्तिगतरीत्या कसा घेऊ शकतो हे त्याला समजावून सांगा.
४ तुम्हाला कदाचित असे म्हणणे समाधानकारक वाटेल की:
▪ “पुष्कळ तरुण लोक त्यांच्या भविष्याबद्दल खिन्ना झाले आहेत शिवाय पालक त्यांच्या मुलांच्या कल्याणाबद्दल तितकेच चिंतीत आहेत. क्वेशन्स् यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक, तरुणांना आता समाधानी व अर्थभरीत जीवन जगण्यास मदत करते तसेच भवितव्यासाठी आशा प्रादान करते.” काही अध्यायांची शीर्षके तसेच अध्याय ३८ दाखवा आणि मग पृष्ठ ३०६ उलटून भवितव्यासाठी यहोवाच्या उद्देशाबद्दल सांगा. घरमालकाला या पुस्तकाची एक प्रात प्राप्त करण्याचे आमंत्रण द्या व त्यातील व्यावहारिक माहिती कुटुंबामध्ये कशी वाचली व चर्चिली जाऊ शकते ते दाखवा. असे केल्याने सर्वांचा फायदा होईल तसेच आज तरुण लोक ज्या समस्यांचा सामना करत आहेत त्यांवर उपाय शोधण्यास त्यांना मदत होईल हेही त्यांच्या लक्षात आणून द्या.
५ देवाच्या वचनातील सल्ला सर्व मानवजातीसाठी व्यावहारिक आहे. सर्वांनी बायबलचे शब्द ऐकलेच पाहिजेत. आनंदाच्या या स्रोताबद्दल तरुण आणि इतरांना सांगण्यास आपण आपल्यापरीने होता होईल तितका प्रायत्न करू या.