स्मारकविधी जाहिरात मोहीम १ मार्च पासून सुरू
१. स्मारकविधीची मोहीम कधी सुरू होईल आणि ही मोहीम मागील वर्षापेक्षा जास्त दिवस का चालवली जाईल?
१ आपल्यासोबत स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी आपण १ मार्च, शुक्रवार या दिवसापासून आपली वार्षिक मोहीम सुरू करणार आहोत. स्मारकविधी २६ मार्च या तारखेला आहे; म्हणजे मागील वर्षाच्या मानाने या वर्षाची मोहीम जास्त दिवस चालवली जाणार आहे. जर मंडळीकडे जास्त प्रमाणात क्षेत्र आहे तर तेथे राहणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना आमंत्रण पत्रिका मिळण्याची शक्यता आहे.
२. आमंत्रण पत्रिका घेण्यासाठी आणि क्षेत्र पूर्ण करण्यासाठी काय नियोजन करण्यात आले आहे?
२ नियोजन करा: क्षेत्र कसे पूर्ण करता येईल आणि त्याचबरोबर ज्या घरांना कुलुपे आहेत तिथेही आमंत्रण पत्रिका सोडायच्या की नाहीत याबाबतीत मंडळीचे वडील मार्गदर्शन करतील. घरोघरच्या सेवाकार्याचे क्षेत्र संपवून जर काही आमंत्रण पत्रिका उरल्या असतील तर त्यांचे वाटप सार्वजनिक साक्षकार्यात केले जाऊ शकते. सेवा पर्यवेक्षक, नियतकालिक खात्यात किंवा लिटरेचर काऊंटरवर सर्वच आमंत्रण पत्रिका एकसाथ न ठेवता प्रचारकांना पुरतील एवढ्याच पत्रिका वेळोवेळी ठेवण्याची व्यवस्था करतील. एका आठवड्यात आपल्याला लागतील तेवढ्याच आमंत्रण पत्रिका आपण एका वेळेस घ्याव्यात.
३. आमंत्रण पत्रिकांचे वाटप करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे?
३ आपण काय बोलणार? आपले बोलणे थोडक्यात असले पाहिजे जेणेकरून आपण होता होईल तितक्या जास्त लोकांना आमंत्रण पत्रिका देऊ शकू. पृष्ठ ६ वर नमुना सादरीकरण आहे; तुमच्या क्षेत्रानुसार तुम्ही त्यात फेरबदल करून त्याचा वापर करू शकता. पण घरमालक जर आवड दाखवतो किंवा त्याचे काही प्रश्न असतील तर घाई न करता आपण त्याच्याशी संभाषण सुरू ठेवू शकतो. आठवड्याच्या शेवटी जेव्हा आपण आमंत्रण पत्रिका देतो तेव्हा संधी असल्यास नियतकालिकेसुद्धा सादर करू शकतो. २ मार्च या दिवशी आपण बायबल अभ्यास सुरू करण्याऐवजी आमंत्रण पत्रिकांचे वाटप करणार आहोत.
४. आपण मोहिमेत आवेशाने सहभागी का व्हावे?
४ आपल्यासोबत स्मारकविधीसाठी बरेच जण उपस्थित होतील अशी आपली इच्छा आहे. या वेळी, येशू नेमका कोण आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. (१ करिंथ. ११:२६) त्याच्या मृत्यूमुळे आपल्याला कसा फायदा होतो हे तेव्हा सांगण्यात येईल. (रोम. ६:२३) आणि त्याचे स्मरण करणे इतके महत्त्वाचे का आहे यावरही प्रकाश टाकण्यात येईल. (योहा. १७:३) तर मग या मोहिमेत आपण आवेशाने सहभाग घेण्यास सज्ज आहोत!