जवळ आलेल्या चांगल्या परिस्थितीची सुवार्ता कळवा
१ जवळ आलेल्या नव्या जगाच्या संदेशाची जाहीर घोषणा करण्यामध्ये सहभागी होणे हा केवढा आनंदाचा हक्क आहे बरे! हा संदेश आम्हाला लोकांकडे पोहंचविता येतो याविषयी आम्ही केवढे धन्य आहोत! जवळ आलेल्या चांगल्या परिस्थितीची सुवार्ता सांगण्यात सहभाग घेण्यामुळे आमचा विश्वास व उत्साह ही बळकट केली जातात. “यहोवाचे गुणगाण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा,” या सूचनेचे श्रवण केल्यामुळे आमची अंतःकरणे आनंदी होतात.—स्तोत्र. ९६:२-४.
२ राज्याचा हा संदेश दर दिवशी कोणाला तरी सांगण्याचे तुम्ही ध्येय ठेवले आहे का? जे साहाय्यक किंवा नियमित रुपाने पायनियरिंग करतात अशांना दर दिवशी सुवार्ता घोषित करण्यात सहभाग मिळतो. तुम्हाला ते जमेल का? नाही तर, निदान अनौपचारिकपणे म्हणा, तुम्हाला दर दिवशी थोडा तरी सहभाग घेता येऊ शकेल का? आम्ही सर्वांनीच हे केले तर यहोवाची केवढ्या भव्यतेने स्तुती घडू शकेल! तुम्ही दर दिवशी राज्याच्या आशेची घोषणा करीत राहिल्यास तुम्हाला यहोवाकडील समृद्ध आशीर्वादांचा नक्कीच अनुभव येणार.
३ उपाध्यपणाविषयी आमची जी मनोवृत्ती आहे ती आम्ही इतरांना सुवार्तेची सादरता करण्यामध्ये कितपत सहभागी होऊ शकतो त्यावर प्रभुत्व राखते. लोकांनी आपल्याला हवा तसा प्रतिसाद दाखविला नाही तरी आम्ही राज्याचा संदेश सादर करण्यात निराश होऊ नये वा मंद बनू नये. उलट, जवळ आलेल्या चांगल्या परिस्थितीच्या संदेशाविषयी आम्ही बाळगलेला सरळ मनोदय आणि सूक्ष्म रसिकता आम्हाला सुवार्तेविषयी इतरांना दररोज सहभागिता करण्याचे उत्तेजन देईल.—लूक ६:४५.
४ यहोवाचे ‘गौरव व सामर्थ्य वाखाणण्यात’ सबंध कुटुंब ऐक्याने मिळून कार्य करते तेव्हा अनेक समृद्ध आशीर्वादांचा अनुभव मिळू शकतो. (स्तोत्र. ९६:७) कुटुंब या नात्याने उपाध्यपणात कार्य करण्यासाठी वेळ नियोजित करून ठेवल्यास त्याद्वारे कुटुंबाचे स्वतःचे तसेच आध्यात्मिक बंध अधिक दृढ होतात. कुटुंबातील सर्वांना शनिवार व रविवार हे मंडळीतील इतर कुटुंबासोबत मिळून राज्याची आशा इतरांना देण्यासाठी चांगल्या सुसंध्या देतात.
अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक वापरा
५ आम्ही एप्रिलमध्ये अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सादर करणार आहोत. आज लोक दैनंदिन जीवनाच्या चिंतेत आहेत; त्यांना आनंदी भविष्याची उत्कंठा लागली आहे. आजच्या मानवाला असणाऱ्या सर्वसाधारण समस्या नसणारे जीवन दीर्घकाळपणे लाभू शकते याविषयी शिक्षण घेण्यात प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आनंदच वाटणार. या आशेविषयीचे अचूक ज्ञान व ती आशा लवकरच साकार होणार हा विश्वास यामुळे आम्हाला हा राज्य-संदेश सादर करण्याची उत्कट चालना लाभली पाहिजे.
६ आपली सादरता अपीलकारक ठरण्यासाठी तुम्ही काय म्हणाल याविषयी अगाऊपणे प्रार्थनापूर्वक विचार करा. आपली ओळख करून दिल्यावर तुम्हाला असे काही म्हणता येईलः “भविष्यासंबंधाने विचार करता तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कशाप्रकारचे भवितव्य मिळविण्याची इच्छा आहे? [प्रतिसादास वाव द्या.] आम्हा सर्वांना जीवन जगण्याचा आनंद वाटतो आणि जितके अधिक दिवस जगता येईल तितक्या अधिकपणे आमची जिवंत राहण्याची इच्छा आहे. तरीपण बऱ्याच समस्या उद्भवत असल्याचे व आमच्या जीवनास धोका निर्माण करीत असल्याचे दिसत आहे. या कारणास्तव, जीवनातील चिंतांशी सामना कसा करावा व एक तेजोमय भवितव्य कसे मिळू शकेल याविषयी पवित्र शास्त्रातील संदेश जाणून घेण्याची इच्छा तुम्हामध्ये उत्पन्न होईल.” या वेळेला सध्याच्या संभाषणाच्या विषयातील शास्त्रवचन ठळकपणे मांडू शकता. तसेच अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ ९, ११-१३, १६१ व १६२ मधील बोलके मुद्दे, पुढे जे तेजोमय भवितव्य आहे ते स्पष्ट करण्यासाठी सांगता येतील.
७ होय, यहोवाने आम्हाला घोषित करण्यासाठी केवढा आनंदी व विश्वासाची उभारणी करणारा संदेश दिला आहे! याखेरीज, ज्यांना यहोवाच्या भव्य अभिवचनांविषयी रसिकता वाटते अशा इतरांसोबत मिळून कार्य करण्याचा मोठा हक्क देखील आम्हाला आहे. जे काम आज आम्ही करीत आहोत त्याची भवितव्यात पुनरावृत्ती होणार नसल्याने व शिवाय ते लवकरच संपुष्टात येत असल्यामुळे आम्ही आपणापाशी असणारा वेळ व इतर साधनांचा जवळ आलेल्या चांगल्या परिस्थितीची सुवार्ता दररोज कळविण्यासाठी वापर करु नये का?