अधिवेशनात प्रकाशित झालेल्या नव्या प्रकाशनांसोबत परिचित व्हा
१ आमच्या आध्यात्मिक अन्नाच्या समृद्ध साठ्यात एक पुस्तक व एक माहितीपत्रक या नव्या प्रकाशनांची भर पडली आहे. “शुद्ध वाणी” प्रांतिय अधिवेशनात प्रकाशित झालेली ही नवी प्रकाशने, आम्हाला शुद्ध वाणी अधिक प्रशस्तपणे बोलण्याची मदत देण्याव्यतिरिक्त आमच्या क्षेत्रकार्यामध्येही खूपच सामर्थ्यकारी प्रभाव पाडू शकतील.—सफन्या ३:९.
२ नव्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना अधिवेशनाच्या वक्त्याने म्हटलेः “आमच्या क्षेत्रकार्यात, मग ते घरोघरचे, पुनर्भेटीचे किंवा पवित्र शास्त्राभ्यासाचे असो, आम्हाला नेहमी ही विचारणा होत असते की, आम्ही का रक्त घेत नाहीत. या प्रश्नाचे उत्तर देता यावे यासाठी आम्हाला हे नवे प्रकाशन प्रकाशित करायला आनंद होत आहे. हे मासिक आकाराचे माहितीपत्रक असून त्याचे शीर्षक, हाव कॅन ब्लड सेव युवर लाईफ? असे आहे.” या माहितीपत्रकातील माहितीचे काळजीपूर्वक वाचन करून तुम्ही तिच्यासोबत परिचित झाला आहात का? आपला विश्वास मजबूत करावा तसेच इतरांनाही रक्ताविषयीचा ख्रिस्ती दृष्टीकोण समजावून सांगता यावा यासाठी त्याचे वाचन करणे महत्त्वाचे आहे.—प्रे. कृत्ये १५:२८, २९.
३ या माहितीपत्रकात दस्ताऐवजांच्या संदर्भासहित नमूद असणारी माहिती कोणाही डॉक्टरांना तुमची भूमिका व इच्छा स्पष्ट करण्यामध्ये तुम्हाला तयार करू शकेल. तथापि, हे माहितीपत्रक केवळ डॉक्टर्स आणि वकील यांच्यासाठी लिहिण्यात आलेले नाही; ते सर्व लोकांसाठी आहे. तेव्हा तुम्हाला हे दिसेल की, याच्या दुहेरी उद्देशामुळे हे माहितीपत्रक आज आमच्या काळी वापरण्यासाठी केवढे महत्त्वपूर्ण साधन ठरत आहे. तुम्ही आपणासोबत याच्या एक किंवा दोन प्रती क्षेत्रकार्यामध्ये घ्याव्यात असे सुचविले जाते. यातील महत्त्वपूर्ण माहितीचा स्वतःसाठी तसेच इतरांनीही रक्ताविषयी योग्य तो आदर दाखवावा याकरता पूर्ण वापर करा.
नवे पुस्तक
४ आमचे नवे प्रकाशन मॅनकाइण्डस् सर्च फॉर गॉड आम्हाला उपाध्यपणात किती साहाय्यक आहे त्याचा जरा विचार करा. याचा अभ्यास केल्यामुळे आम्हाला इतर धर्म व त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमि यांजबद्दल स्पष्ट समज मिळू शकेल. हे आपल्याला ख्रिस्ती धर्मजगतातील लोकांना त्याचप्रमाणे इतर धर्माच्या लोकांना देखील प्रचार करण्यासाठी अधिक तयार करू शकेल. या २० व्या शतकात लोकांच्या सामूहिक हालचाली बऱ्याच प्रमाणात होत असल्यामुळे घरोघराच्या प्रचारात कित्येक भाषा व धर्म जोपासणारे लोक भेटू शकतील. अशा लोकांचे विश्वास व प्रथा यांजशी परिचित नसलो तर आम्हापुढे मोठे आव्हान उभे राहते. तथापि, या नव्या पुस्तकाच्या मदतीने आम्हाला आपल्या क्षेत्रात जेव्हा विविध धार्मिक पार्श्वभूमि असणारे लोक भेटतात तेव्हा गडबडून गेल्याचे वाटणार नाही.
५ या नव्या पुस्तकातील माहिती ही जे संबंधित विषयाशी परिचित आहेत अशा लोकांनी संशोधिली व पुर्नउजळणी केलेली आहे. यास्तव, या पुस्तकातील विधाने आपल्याला लोकांसोबत बोलताना बिनधोकपणे वापरता येतील. अशी ही माहिती या काळी प्रसिद्ध करण्यात आली आहे हे, यहोवा खरेच सर्व राष्ट्रांच्या लोकांविषयी जी थोर प्रीती राखून आहे त्याचे वक्तव्य आहे. या कारणास्तव आपण या पुस्तकातील माहितीसोबत चांगले परिचित होऊ व मग, वेगवेगळ्या राष्ट्र व धार्मिक पार्श्वभूमिच्या प्रामाणिक लोकांसोबत प्रभावीपणे बोलताना याचा एकाग्र प्रयत्न करू या. होय, या प्रकाशनाचा प्रभावी वापर केल्यामुळे आम्हाला, आमच्या क्षेत्रात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता कळविण्याची जबाबदारी पूर्ण करीत आहोत याचे समाधान लाभू शकेल.—मत्तय २८:१९, २०; तीत २:११.