तुम्ही कुटुंब या नात्याने आध्यात्मिक ध्येयाप्रत काम करीत आहात का?
१ यहोवाचे समर्पित लोक या नात्याने त्याची सेवा विश्वासूपणे करीत राहण्याचे आमचे ध्येय आहे. आम्ही मोठ्या उत्सुकतेने चिरकालिक जीवनाचे दान मिळविण्याकडे पाहून आहोत. अर्थातच, आम्ही केवळ आमचाच विश्वासूपणा व तारणाच्या बाबतीत आस्थेवाईक नाहीत. या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी इतरांना मदत करण्याची आमची इच्छा आहे; आणि खासपणे आपल्या स्वतःच्या कुटुंबियांची मदत करण्याची आमची इच्छा आहे.—योहान १:४०, ४१; १ तीमथ्य ५:८.
२ एखादा डोंगर जसा पायऱ्यापायऱ्यांनी चढता येतो, तसेच आम्ही आमच्या ख्रिस्ती मार्गाक्रमणात टप्प्याटप्याने प्रगति करू शकतो. यासाठीच आम्ही आम्हासाठी आध्यात्मिक ध्येये ठेवत असतो. हे केवळ वैयक्तीकांसाठी मर्यादित नाही. सभा, क्षेत्रकार्य आणि कौटुंबिक अभ्यास याजसंबंधाने कुटुंबाला देखील काही ध्येये राबवता येतील. काही सुधारणा करण्याची गरज दिसते का? कुटुंबातील कोणा एका सदस्याला पूर्ण वेळेच्या कार्याचे ध्येय गाठण्याची मदत करता येईल का? जी ध्येये ठरविली आहेत ती साध्य करण्यासाठी कौटुंबिक चर्चा साहाय्यक ठरू शकते. ही ध्येये एकदा मिळविली की, मग दुसरी ईश्वरशासित ध्येये ठेवता येतील. अशाप्रकारे टप्प्याटप्याने आध्यात्मिक प्रगति करता येते.
सभा
३ काही कुटुंबानी सभेला वेळेवर येण्याचे ध्येये ठेवण्याची गरज आहे. मोठ्या कुटुंबासाठी, नोकरीची अडचणीची वेळ, तसेच वाहनांची समस्या असणाऱ्यांना हे एक मोठे आव्हान असू शकेल. यासाठी, सहकार्य तसेच चांगल्या संघटनेची गरज आहे.
४ सभांमध्ये आपले अभिप्राय मांडणे या आणखी एका व्यावहारिक ध्येयाचा कुटुंबाला विचार करता येईल. कुटुंबातील काही सदस्यांना त्रोटक विवेचने वाचून दाखवणे बरे वाटेल. पण स्वतःच्या शब्दात त्रोटक पण स्पष्ट असे अभिप्राय देण्यामुळे आध्यात्मिक प्रगति सूचित होते व ते फलदायी ठरते. विवेचने तयार करण्यात कौटुंबिक सदस्य एकमेकांना मदत करू शकतात. शिवाय ईश्वरशासित शाळेत प्रगति करण्यासाठीही ते एकमेकांना मदत देऊ शकतात. यामध्ये कुटुंबातील तरुण आपल्या नेमणूकीची तयारी करीत असता त्यांची विवेचने ऐकणे, रुपरेषेचा कसा वापर करावा हे त्यांना दाखविणे, त्यांचे उच्चार सुधरविणे इत्यादि गोष्टी येतात. एक चांगला शिक्षक किंवा जाहीरपणे उत्तम वाचन करणारा होणे हे ध्येय मिळविण्यास झटणे चांगले आहे.—१ तीम. ४:१३.
क्षेत्र कार्य
५ काही कुटुंबाना क्षेत्र कार्यात नियमितता आणण्याची गरज आहे. तुमचे सबंध कुटुंब दर महिन्याला क्षेत्रसेवेत सहभागी होते का? मग, सध्याच्या संभाषणाच्या विषयाबद्दल किंवा नव्या मासिकाच्या सादरतेबद्दल आपल्या कौटुंबिक सदस्यांना मदत करण्याविषयी काय? याचप्रमाणे, एक घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास सुरु करण्याचे किंवा आहे तो अभ्यास अधिक नियमित रुपाने चालविण्याचे ध्येय देखील आहे.
कौटुंबिक अभ्यास
६ कौटुंबिक अभ्यासाच्या आराखड्याला विश्वासूपणे जडून राहणे हे कदाचित काही कुटुंबांना आव्हानात्मक ठरत असेल. कधी कधी तर अभ्यासाचा पुर्नआखडा देखील बनवावा लागत असेल. तथापि, हे अपवादात्मक असावे. आणखी एक चांगले ध्येय म्हणजे पवित्र शास्त्र वाचनाची साप्तहिक नेमणूक नियमितपणे साध्य करणे व कदाचित ते वाचन कौटुंबिक अभ्यासात देखील करणे हे आहे. काही लोकांच्या बाबतीत, जे वाचन साप्तहिकरित्या नेमून देण्यात आले आहे ते करण्यासाठी केवळ २० ते २५ मिनिटे लागतात. हे वाचन एखाद्याच्या शास्त्रवचनीय ज्ञानात भर घालते व दर आठवडी शास्त्रवाचनाचे जे ठळक मुद्दे मांडले जातात ते मनोरंजक करते.
७ आणखी पुष्कळ ध्येये कुटुंबाला व वैयक्तीकांना ठेवता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ, कुटुंबाने लवकरच साहाय्यक पायनियरिंग करण्याच्या प्रयत्नाबद्दल काय? यापेक्षा अधिक म्हणजे, उत्तम संघटना व सहकार्य यांच्या माध्यमाने कुटुंबातील निदान एकाला तरी नियमित पायनियरिंग करण्याची मदत देता येईल का? तसेच उपाध्य सेवक किंवा वडील बनण्याचे देखील ध्येय आहे. तरुण बांधवांना बेथेल सेवेचे ध्येय राखता येईल. ही ध्येये साध्य करता येतील, पण यासाठी परिश्रम व पराकाष्ठा जरुरीची आहेत. आम्ही व्यक्तीगतपणे तसेच कौटुंबिकरित्या आपली ध्येये मिळविण्याप्रत काम करीत असता, यहोवास देत असलेल्या आमच्या सेवेची गुणवत्ता सुधारली जाईल व हे सर्व त्याचा सन्मान व गौरव होण्यास कारणीभूत ठरेल.—स्तोत्र. ९६:७, ८.