प्रश्न पेटी
▪ पवित्र शास्त्राच्या प्रश्नांची उत्तरे व वैयक्तिक सल्ल्यासाठी आम्ही संस्थेला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारू शकतो का?
गोष्टी लवकर करण्यासाठी पुष्कळ लोक दूरध्वनीचा वापर करतात, परंतु अनेकदा वेगापेक्षा अधिक काही समाविष्ट असते. जगामध्ये आज लोक वैयक्तिक सोयीला प्रथम ठेवणे ही साधारण गोष्ट समजतात; लोक स्वतःला अधिक श्रम देण्याचे टाळतात.
आम्हाला हे देवाच्या सल्ल्याच्या किती विपरीत दिसते! तो आम्हास आर्जवितो की, गुप्त धनाप्रमाणे ज्ञानाचा शोध करा, याचा अर्थ स्वईच्छेने आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. अनुभव हे शाबित करतो की असे केल्याने आम्हाला अधिक समाधान मिळू शकते.—नीती. २:१-४.
सभेत भाग घेण्याची तयारी करताना किंवा व्यक्तिगत समस्येचा सामना करीत असताना प्रश्न उद्भवल्यास असे प्रयत्न सहाय्यक ठरतात. संस्थेला दूरध्वनी करून विचारण्यापेक्षा, पवित्र शास्त्र व त्यावर आधारित प्रकाशनांचे खासपणे वॉचटावर पब्लिकेशन इन्डेक्स मधील शास्त्रवचनांचे व विषय सुचीचे संशोधन केल्यावर आम्हा स्वतःला त्याचा फायदा होऊ शकतो.
‘गुप्त धनावर संशोधन’ केल्यावर जर आणखी मदत पाहिजे असल्यास स्थानिक मंडळीतील वडिलांना विचारले जाऊ शकते. वडिलांजवळ पुरेसे पवित्र शास्त्रीय ज्ञान व माहिती शोधण्यासाठी अनुभव देखील आहे. आमच्या वैयक्तिक समस्येसाठी व निर्णयासाठी आम्हाला सल्ला पाहिजे तर त्यांची संतुलित मदत अगदी योग्य असेल, कारण ते आमच्या व आमच्या परिस्थितीच्या अगदी जवळ आहेत.—पडताळा प्रे. कृत्ये. ८:३०, ३१.
पण जर तुम्हाला असे वाटत असेल की संस्थेकडून अधिक माहितीची जरूरी आहे, तर एखादे पत्र पाठविणे उत्तम ठरेल. हे पाठविताना देखील वडील मदत करू शकतात. अशा पत्राचे उत्तर देण्याआधी त्यावर योग्य संशोधन व विचार करण्यासाठी वेळ लागू शकतो, व ही गोष्ट दूरध्वनीच्या संपर्काद्वारे करणे अशक्याची आहे.