प्रभावकारी पुनःर्भेंटी घेण्याद्वारे आस्था वाढवा
१ प्रत्येक चांगल्या तयार केलेल्या भाषणात आस्था वाढविणारी प्रस्तावना, भाषणाचा माहितीयुक्त मध्य भाग, व चेतना वाढविणारी समाप्ती असते. प्रस्तावना श्रोत्यांचे लक्ष आकर्षित करते. परंतु भाषणाचा मध्य भाग व समाप्तीशिवाय भाषण अपूर्ण राहते. हेच तत्व आमच्या सेवेत देखील लागू होते. पहिल्याच भेटीत घरमालकाची आस्था चेतविणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु मग आम्ही ती प्राथमिक आस्था वाढविण्यासाठी प्रभावकारी पुनःर्भटी घेतल्या पाहिजेत.
२ देवाने दुःखाला परवानगी का दिली आहे? हा किती विचार प्रवर्तक प्रश्न आहे! हा विषय आज पुष्कळ लोकांच्या मनात आहे याबरोबर तुम्ही सहमत नाही का? यामुळेच, वरील लेखात, असे सुचविले की पहिल्या भेटीनंतर तो प्रश्न विचारावा जेणेकडून तुम्ही पुढील पुनःर्भटीत त्याचे उत्तर देऊ शकाल.
३ कदाचित तुम्ही असे म्हणू शकता:
▪“नमस्ते. मागच्या वेळी आपण बोललो तेव्हा, देवाने दुःखाला परवानगी देण्यासंबंधीचा विषय उपस्थित झाला होता, व तुम्हाला मी सांगितले होते की या विषयावर बोलण्यासाठी मी पुन्हा तुमच्याकडे येईन. पुष्कळांना वाटते देव खरोखर आमची काळजी करतो, तर त्याने दुःखाला काढले असते. कदाचित तुम्हालाही असेच वाटले असेल. [घरमालकाच्या उत्तरासाठी थांबा.] पवित्र शास्त्र आम्हाला याची हमी देते की देव आमची काळजी घेतो. [वाचा १ योहान ४:८.] आतापर्यंत दुःखाला परवानगी देण्याचे देवाजवळ चांगले कारण आहे. त्यातील एक कारण २ पेत्र ३:९ वचनात स्पष्ट केले आहे. [वाचा.] इतर कारणे ह्या माहितीपत्रकात दिलेली आहेत.” नतंर आपल्या समस्या—त्या सोडविण्यास आपल्याला कोण मदत करील? या माहितीपत्रकातील पृष्ठे १०-१२ काढून आस्थेच्या विषयाची चर्चा करा.
४ काही घरमालक अधिक स्पष्टतेविषयी आस्था दाखवितील, उत्तराने त्यांचे पूर्ण समाधान करण्यासाठी अनेक पुनःर्भटींची आवश्यकता असेल. जानेवारीत १९२ पृष्ठांची संस्थेची अनेक जुनी पुस्तके सादर केली जातील, तेव्हा पुस्तकातील एखादा अध्याय दाखवा जेणेकडून त्या विषयावर पुढील अधिक चर्चा करण्यासाठी पाया टाकला जाऊ शकतो.
५ चर्चा समाप्त होत असताना, दुसरा प्रश्न विचारा व घरमालकाला सांगा की पुढील भेटीत अधिक आस्था वाढविणाऱ्या माहितीची चर्चा त्यांच्यासोबत करण्यास तुम्हाला आनंद वाटेल. मृत्यूनंतर त्या व्यक्तिचे काय होते हे पुष्कळ लोकांना माहीत असणे आवडेल. मग योग्य वेळी या विषयाची चर्चा करण्यासाठी योजना का आखू नये?
६ तीन मूलभूत तत्वे लक्षात ठेवल्यास तुम्हाला मदत होऊ शकेल. लवचिक असा. पवित्र शास्त्राच्या चर्चेसाठी उचित वेळ बाजूला काढण्याची सवय घरमालकाला नसेल. संक्षिप्त असा. पहिल्याच भेटीत जास्त वेळ बसू नका किंवा अधिक मुद्यांची चर्चा करू नका. अनेकदा, कमी वेळेत तुम्ही काही मुद्यांवर चर्चा केली तर तुमच्या भेटीला चांगला प्रतिसाद मिळतो. उत्साहपूर्ण व मित्रभाव ठेवा. तुम्हाला व्यक्तिगतरित्या त्यांच्याविषयी आस्था आहे हे घरमालकाला दाखवा.
७ घरमालकासोबत पवित्र शास्त्रीय चर्चा करणे हे आमचे प्रत्यक्ष ध्येय आहे. नतंर फलदायी गृह पवित्र शास्त्राभ्यास योग्य प्रकाशनातून जसे की अनंतकाळ जगू शकता यातुन सुरू केला पाहिजे. तुम्ही प्रभावकारी पुनःर्भटी घेऊन पहिल्याच भेटीत दाखविण्यात आलेली आस्था धीराने वाढविली तर तो आनंद तुमचा असेल.