वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९८ पृ. ३-६
  • सर्व भाषीयांना व धर्मीयांना साक्ष देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व भाषीयांना व धर्मीयांना साक्ष देणे
  • आमची राज्य सेवा—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना साक्ष देणे
  • गैर-ख्रिस्ती धर्मीयांना साक्ष देणे
  • वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—२००९
  • प्रचार करण्याआधी, त्यांना शोधावे लागेल
    आमची राज्य सेवा—२०१४
  • मुस्लिम व्यक्‍तीशी संभाषण कसे कराल?
    आमची राज्य सेवा—२०००
  • आमच्या सेवेत निःपक्षपातीपणा प्रदर्शित करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९८
km २/९८ पृ. ३-६

सर्व भाषीयांना व धर्मीयांना साक्ष देणे

१ पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी, इतर भाषीयांना व निरनिराळ्या धर्मीयांना आवेशपूर्ण साक्ष दिली. परिणामस्वरूपी, “१०० व्या वर्षापर्यंत भूमध्य सागराच्या किनारपट्टीवरील बहुधा प्रत्येक प्रांतात एक ख्रिस्ती समाज हयात होता.”—मध्ययुगीन इतिहास (इंग्रजी).

२ येथे भारतात, असंख्य भाषा बोलणारे लोक आहेत. समान भाषा बोलणारे लोक बहुधा एकाच राज्यात वास्तव्य करून राहतात. तथापि, बहुतांशी भारतीय शहरे व उपनगरे आता सर्वदेशीय झाली आहेत; म्हणजे वैविध्यपूर्ण भाषा बोलणारे लोक येथे राहतात. भाषांतील या वैविध्यामुळे अशा लोकांशी संभाषण करणे आणि त्यांना साक्ष देणे कधीकधी आव्हानात्मक बनते. परिणामस्वरूप, आपल्याच विभागात एखादे मिशनरी क्षेत्र असू शकते. सर्व भाषीयांना आणि धर्मीयांना ‘उपदेश करा व [“पूर्णपणे,” NW] साक्ष द्या,’ या येशूच्या आज्ञांचे आपण पालन कसे करू शकतो बरे?—प्रे. कृत्ये १०:४२.

वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना साक्ष देणे

३ अनेकांना त्यांच्याच मातृभाषेतून शिकविले जाते तेव्हा ते अधिक भराभर आणि सखोल समजबुद्धीनिशी शिकतात यात शंका नाही. “सुवार्तेकरिता” व “इतरांबरोबर तिचे भागीदार व्हावे” म्हणून विश्‍वभरातील अनेक बंधुभगिणींनी दुसरी एक भाषा आत्मसात केली आहे. (१ करिंथ. ९:२३) एका इंग्रजी भाषिक देशात कित्येक वर्षांपासून, इंग्रजी भाषा बोलणाऱ्‍या एका बहिणीमार्फत एका चिनी भाषिक स्त्रीचा नियतकालिक मार्ग चालू होता तरी बायबल अभ्यासाचे प्रस्ताव तिने नेहमीच नाकारले होते; मग चिनी भाषा शिकणाऱ्‍या दुसऱ्‍या एका बहिणीने तिला तिच्याच भाषेतले एक पुस्तक दाखवले तेव्हा तिने लागलीच ते घेतले व अभ्यासही स्वीकारला. फरक एवढाच, की दुसऱ्‍या बहिणीने त्या स्त्रीच्या मातृभाषेत दोनचार शब्द बोलण्याचे कष्ट घेतले होते.—पडताळा प्रे. कृत्ये २२:२.

४ स्थानिकरित्या बोलल्या जाणाऱ्‍या भाषेव्यतिरिक्‍त दुसरी एखादी भाषाही तुम्हाला अवगत असल्यास, ती भाषा बोलणाऱ्‍या तुमच्या क्षेत्रातील लोकांकडे तुम्ही कदाचित विशेष लक्ष देऊ शकाल. (मत्त. ९:३७, ३८.) उदाहरणार्थ, सत्यात येण्याआधी व्हिएतनामी भाषा शिकून घेतलेल्या संयुक्‍त संस्थानांतील एका बांधवाला आता व्हिएतनाम भाषिकांना सुवार्ता सांगण्यात एक आगळाच आनंद मिळतो. साक्ष देण्याकरता या आपल्या भाषा ज्ञानाचा अधिक उपयोग करण्यासाठी त्याने आणि त्याच्या कुटुंबाने अधिक गरज असलेल्या व्हिएतनामी क्षेत्रात स्थलांतर केले. स्थलांतर केल्यापासून, व्हिएतनामच्या अनेक लोकांसोबत बायबल अभ्यास करण्यात त्याला चांगलेच यश मिळत आहे.

५ एका पायनियर बहिणीला तिच्या क्षेत्रात अनेक कर्णबधिर लोक भेटत असत. त्यांना सत्य शिकवण्यासाठी आपल्याला सांकेतिक भाषा शिकवणारे कोणीतरी मिळावे म्हणून मदतीकरिता तिने यहोवाकडे प्रार्थना केली. एके दिवशी जवळच्याच एका सुपरमार्केटमध्ये ती खरेदी करत असताना एक कर्णबधिर तरुणी तिच्यापाशी आली आणि एक वस्तू शोधण्यात आपली मदत करावी असे चिठ्ठीवर लिहून तिने बहिणीला सांगितले. वस्तू शोधण्यास तिची मदत केल्यानंतर या पायनियर बहिणीने देखील, त्या क्षेत्रातील लोकांना मदत करता यावी म्हणून सांकेतिक भाषा शिकण्याची आपली इच्छा चिठ्ठीवर लिहून प्रकट केली. मग त्या कर्णबधिर स्त्रीने लिहून विचारले: “तुम्ही कर्णबधिर लोकांना का मदत करू इच्छिता?” बहिणीने लिहून उत्तर दिले: “मी एक यहोवाची साक्षीदार आहे आणि बायबल समजण्यास मी लोकांची मदत करू इच्छिते. तुम्ही मला सांकेतिक भाषा शिकवली तर तुम्हालाही बायबलविषयी शिकवण्यास मला आवडेल.” ती बहीण म्हणते: “तिने ‘ठीक आहे’ असं उत्तर दिलं तेव्हा, तुम्हाला कल्पना करवणार नाही इतका आनंद मला झाला.” सहा आठवड्यांपर्यंत बहीण दररोज संध्याकाळी त्या स्त्रीच्या घरी जात असे. तिने सांकेतिक भाषा आत्मसात केली आणि कर्णबधिर स्त्रीने देखील सत्य शिकून बाप्तिस्मा घेतला! या गोष्टीला आज ३० वर्षे उलटून गेली आहेत आणि ती पायनियर बहीण अजूनही कर्णबधिरांना साक्ष देत आहे.

६ तुमच्या विभागातील क्षेत्र उत्तमपणे उरकले जात असले आणि कमी साक्षीदार असलेल्या तुमच्या माहितीतल्या एखाद्या विभागातील भाषा तुम्ही अस्खलितपणे बोलत असल्यास; शिवाय, तुमची इच्छा असेल व त्या क्षेत्रात स्वेच्छेने स्थलांतर करण्यास तुम्ही समर्थ असल्यास याबाबतीत तुमच्या मंडळीतील वडिलांबरोबर विचारविनिमय करण्यात काही हरकत नाही. यासाठी तुम्ही योग्य आहात असे त्यांना वाटत असल्यास तुम्ही संस्थेला तसे पत्र लिहू शकता; पण त्याबरोबरच तुमच्या योग्यता व भाषा कौशल्यांविषयी वडिलांनी केलेल्या निरीक्षणांचे आणखीन एक पत्र देखील जोडलेले असावे.—ऑगस्ट १५, १९८८, टेहळणी बुरूज, (इंग्रजी) पृष्ठे २१-३ पाहा.

७ पुरवलेल्या साधनांचा उपयोग करणे: आपले साहित्य निरनिराळ्या भाषांत उपलब्ध आहे. तुमच्या क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्‍या सर्व भाषांतील पत्रिका अथवा अपेक्षा किंवा दुसरी कोणतीही माहितीपत्रके जवळ बाळगणे लाभदायक असू शकेल. स्थानिक भाषा ही एखाद्या व्यक्‍तीची मातृभाषा नाही हे स्पष्ट झाल्यावर ती व्यक्‍ती कोणती भाषा वाचणे पसंत करते याविषयी विचारणा करा. आणि मग, शक्य असल्यास त्या भाषेतले साहित्य सादर करा.

८ तुमच्या साक्षकार्यात तुम्हाला भेटलेल्या व्यक्‍तीची भाषा तुम्हाला बोलता येत नसली तरी देखील तुम्ही तिला सुवार्ता सांगू शकता. ती कशी? सर्व राष्ट्रांकरता सुवार्ता या पुस्तिकेचा वापर केल्याने. त्यात ५९ भाषांमध्ये एक संक्षिप्त छापील संदेश आहे. पुस्तिकेच्या पृष्ठ २ वर दिलेल्या सूचना स्पष्ट करतात त्याप्रमाणे, घरमालकाची भाषा कोणती हे निश्‍चित केल्यानंतर पुस्तिकेच्या उचित पृष्ठावरील छापील माहिती घरमालकाला वाचू द्या. त्याने ती वाचल्यानंतर त्याच्याच भाषेतील एखादे प्रकाशन दाखवा. तुमच्याजवळ ते नसल्यास तुमच्यापाशी असेल त्या भाषेतले प्रकाशन दाखवा. तुम्ही त्याच्या भाषेतील एक प्रत घेऊन परतण्याचा प्रयत्न कराल हे सूचित करा. त्याचा नावपत्ता विचारून तो लिहून घ्या. कदाचित, ती भाषा बोलणाऱ्‍या तुमच्या मंडळीतील एखाद्याला तुम्ही ही माहिती देऊ शकाल. पुन्हा भेट देण्यासाठी ती भाषा बोलणारा कोणीही नसल्यास तुम्ही स्वतःच हे आव्हान स्वीकारू शकता; तुमच्या भाषेतील प्रकाशनाचा उपयोग करून तुम्ही कदाचित त्याच्यासोबत अभ्यासही करू शकाल.—१ करिंथ. ९:१९-२३.

गैर-ख्रिस्ती धर्मीयांना साक्ष देणे

९ व्यक्‍तीच्या धार्मिक पार्श्‍वभूमीचे थोडेफार ज्ञान असणे देवाच्या राज्याविषयी प्रभावकारी साक्ष देण्यात सहायक ठरते. मानवजातीने केलेला देवाचा शोध (इंग्रजी) हे पुस्तक जगातील प्रमुख धर्मांचा परिचय करून देते, जेणेकरून सत्याचे ज्ञान प्राप्त करण्यास साह्‍य करण्याइतपत लोकांचे विश्‍वास आपण समजू शकू.

१० गैर-ख्रिस्ती लोकांना साक्ष देण्यासाठी यहोवाच्या संघटनेने पुरवलेल्या काही प्रकाशनांची यादी या पुरवणीच्या शेवटच्या पृष्ठावरील पेटीत दिलेली आहे. ही प्रकाशने वाचल्यानंतर, सुवार्ता घेऊन आपण लोकांपाशी कसे जाऊ शकतो याची समज आपल्याला प्राप्त होते. एक उपयुक्‍त साधन म्हणून युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकाचा विसर पडू देऊ नका. बौद्ध, हिंदू, ज्यू आणि मुस्लिम धर्मीयांना प्रतिसाद कसा द्यावा याविषयीच्या व्यावहारिक सूचना या पुस्तकातील पृष्ठे २१-४ वर दिलेल्या आहेत.

११ काय बोलतो त्याविषयी सावधगिरी: एका विशिष्ट धर्मातील लोकांचे वैयक्‍तिक विश्‍वास अनिवार्यपणे, त्याच विश्‍वासातील इतरांसारखी असतात असे अनुमान काढून लोकांना साचेबद्ध न करण्याची सावधगिरी आपण बाळगली पाहिजे. उलटपक्षी, तुम्ही बोलत असलेल्या प्रत्येक व्यक्‍तीची विचारधारा समजून घेण्याचा प्रयास करा. (प्रे. कृत्ये १०:२४-३५) एक मुस्लिम या नात्याने लहानपणापासून सॅलीमूनच्या मनावर हा विश्‍वास ठसवला गेला होता, की कुरआन हे देवाचे वचन आहे. परंतु, दयेचा सागर असलेला देव लोकांना एका धगधगत्या नरकात यातना देतो ही मुस्लिम शिकवण तो कदापि सर्वस्वी स्वीकारू शकला नाही. एके दिवशी, यहोवाच्या साक्षीदारांनी त्याला एका सभेला येण्याचे आमंत्रण दिले. त्याला लगेचच सत्याची ओळख झाल्यामुळे सध्या तो एका ख्रिस्ती मंडळीत वडील म्हणून आनंदाने सेवा करत आहे.

१२ गैर-ख्रिस्ती विश्‍वासातील लोकांना साक्ष देताना, आपल्या प्रस्तावनेमुळे त्यांच्यासोबत सुवार्तेविषयी संभाषण करण्याची संधी आपल्या हातून जाऊ नये म्हणून आपण खबरदारी बाळगली पाहिजे. (प्रे. कृत्ये २४:१६) काही धर्माचे लोक, ‘धर्मांतर’ करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांसंबधी अतिशय संवेदनशील असतात. यास्तव, देवाच्या वचनाच्या समग्र सत्याकडे त्यांना आकर्षित करता यावे म्हणून असे मुद्दे शोधण्यासंबंधी सतर्क असा ज्यांवर संभाषणासाठी एक सर्वसामान्य पाया रचता येईल. एका प्रेमळ प्रस्तावनेस व सत्याच्या सुस्पष्ट प्रस्तुतीस, मेंढरासमान लोक प्रतिसाद देतील.

१३ आपल्या शब्दांची निवड देखील लक्ष देण्याजोगी एक महत्त्वाची बाब आहे; नाहीतर सत्यापासून अनावश्‍यकरित्या लोकांची फारकत होण्यास आपण कारणीभूत होऊ. उदाहरणार्थ, तुम्ही एक ख्रिस्ती आहात अशी गेल्याबरोबर लगेच स्वतःची ओळख करून दिल्यास घरमालक आपोआपच तुमचा संबंध ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसशी लावेल आणि त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये एक भिंत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बायबलचा उल्लेख, ‘शास्त्रवचने’ किंवा ‘पवित्र शास्त्र’ असा करणे देखील लाभदायक ठरेल.—मत्त. २१:४२; २ तीम. ३:१५.

१४ बौद्ध लोकांना साक्ष देणे: (मानवजातीने केलेला देवाचा शोध यात अध्याय ६ पाहा.) बौद्ध धर्माच्या विश्‍वासाबाबत त्याच्या अनुयायांमध्ये बरीच भिन्‍नता असते. व्यक्‍तिमत्त्व असलेल्या एका सृष्टीकर्त्याच्या अस्तित्वाचे समर्थन करण्याऐवजी बौद्ध धर्म, सा.यू.पू. सहाव्या शतकातील गौतम बुद्धाला एक धार्मिक आदर्श मानतो. त्याने प्रथमच एका रोगी, वृद्ध व मृत व्यक्‍तीला पाहिले तेव्हा आयुष्याचा अर्थ समजून घ्यायला तो व्याकूळ झाला. त्याला प्रश्‍न पडला की, ‘केवळ दुःख भोगण्यासाठी, वृद्ध होण्यासाठी आणि मरण्यासाठीच मानवाचा जन्म झाला होता का?’ या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा असलेल्या प्रांजळ बौद्ध लोकांना आपण निश्‍चितच या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकतो.

१५ बौद्ध लोकांशी बोलताना, सर्व पवित्र ग्रंथांमध्ये सर्वोत्कृष्ट असलेले बायबल यात आढळणाऱ्‍या सकारात्मक संदेशाला व सुस्पष्ट सत्याला जडून राहा. इतर अनेकांप्रमाणे, बौद्ध लोकांना देखील शांती, नैतिकता आणि कौटुंबिक जीवन यांत स्वारस्य असते आणि अशा विषयांवर चर्चा करण्यास त्यांना बहुधा आवडते. यामुळे, मानवजातीच्या समस्यांवरील एक वास्तविक तरणोपाय म्हणून देवाच्या राज्याकडे लक्ष वेधण्यास तुम्ही शेवटी प्रवृत्त व्हाल. एका बहिणीने किराणा मालाच्या दुकानात भेटलेल्या एका चिनी माणसाला त्याच्याच भाषेतील एक पत्रिका दिली आणि बायबल अभ्यासाचा एक प्रस्ताव मांडला. त्याने म्हटले: “तुम्ही पवित्र बायबलविषयी बोलता का? आयुष्यभर मी याचा शोध करत होतो!” त्याच आठवडी त्याने अभ्यास करण्यास सुरवात केली आणि सर्व सभांनाही तो उपस्थित राहू लागला.

१६ दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून एक पायनियर बहीण चिनी विद्यार्थ्यांना सत्य शिकवत आहे. आठ फ्लॅट्‌स असलेल्या एका बिल्डिंगमध्ये हे विद्यार्थी राहत होते; तेथे कार्य करताना, प्रत्येक घरामध्ये अभ्यास सुरू करण्यास यहोवाने आपली मदत करावी अशी प्रार्थना तिने केली. दोनच आठवड्यांत प्रत्येक फ्लॅटमधील किमान एका विद्यार्थ्यासोबत ती अभ्यास करत होती. विद्यार्थ्यांमध्ये तिला एक सर्वसामान्य चिंता आढळली—त्या सर्वांनाच शांती आणि आनंद हवा आहे, ही प्रस्तावना तिला परिणामकारक वाटली. मग ती त्यांना विचारते, की त्यांची देखील हीच चिंता आहे का. याबाबत त्यांचे नेहमीच एकमत असते. चिनी लोकांसाठी रचलेले चिरस्थायी शांती आणि सुख—ते कसे मिळवता येईल, या माहितीपत्रकाकडे ती त्यांचे लक्ष वेधते. अवघ्या पाच अभ्यास सत्रांनंतर एका विद्यार्थ्याने तिला सांगितले, की कित्येक वर्षांपासून तो सत्याच्या शोधात होता आणि आता त्याला ते मिळाले आहे.

१७ हिंदूंना साक्ष देणे: (मानवजातीने केलेला देवाचा शोध यातील अध्याय ५ पाहा.) आपल्यापैकी बहुतेकांनाच हे माहीत आहे, की हिंदू धर्माचे कोणतेही निश्‍चित असे तत्त्व नाही. त्याचे तत्त्वज्ञान अतिशय गुंतागुंतीचे आहे. त्यांचा प्रमुख देव ब्रह्‍मा (उत्पादक ब्रह्‍मा, संरक्षक विष्णू आणि संहारक शिव) याविषयी हिंदूंची एक त्रिमूर्ती कल्पना आहे. पुनर्जन्माच्या त्यांच्या शिकवणुकीचे समर्थन करण्यासाठी आत्म्याच्या अमरत्वावर विश्‍वास असणे आवश्‍यक आहे; आणि त्यामुळे जीवनासंबंधी त्यांचा एक दैववादी दृष्टिकोन आहे. (युक्‍तिवाद पुस्तकात, पृष्ठे ३१७-२१ पाहा आणि टेहळणी बुरूज, मे १५, १९९७, पृष्ठे ३-८.) हिंदू धर्म सहिष्णूतेची, अर्थात सगळे धर्म शेवटी एकाच सत्याकडे नेतात अशी शिकवण देतो.

१८ हिंदू तत्त्वज्ञानावर लांबलचक चर्चा करण्याऐवजी एखाद्या हिंदू व्यक्‍तीला साक्ष देण्याचा एक मार्ग म्हणजे पृथ्वीवर मानवी परिपूर्णतेत अनंतकाल जगण्याच्या आपल्या बायबल-आधारित आशेचे, तसेच मानवजातीसमोर असलेल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची बायबलमधील समाधानकारक उत्तरांचे स्पष्टीकरण देणे.

१९ ज्यूं लोकांना साक्ष देणे: (मानवजातीने केलेला देवाचा शोध यात अध्याय ९ पाहा.) इतर गैर-साक्षीदार धर्मांच्या विपरीत यहुदी धर्माची मुळे दंतकथांत नव्हे तर इतिहासात रुजलेली आहेत. मानवजातीने केलेल्या सत्य देवाच्या शोधात एक आवश्‍यक दुवा, प्रेरित इब्री शास्त्रवचनांद्वारे सांधला गेला आहे. आणि तरीही, देवाच्या वचनाच्या विषमतेत आधुनिक यहुदी धर्माची एक मूळ शिकवण, मानवी आत्म्याच्या अमरत्वावरील विश्‍वास ही आहे. आपण अब्राहामाच्या देवाची उपासना करतो याची खात्री पटवून देऊन तसेच आजच्या जगात आपण सगळे जण सारख्याच अडीअचणींचा सामना करतो हे कबूल करून संभाषण सुरू करण्यासाठी एक सर्वसामान्य पाया रचला जाऊ शकतो.

२० देवावर विश्‍वास नसलेला एखादा ज्यू तुम्हाला भेटल्यास, देवाविषयी त्याची भावना नेहमीच अशी होती का, असे विचारल्याने त्याला कोणती गोष्ट सर्वात अपीलकारक वाटेल ते समजण्यास तुम्हाला मदत मिळेल. उदाहरणार्थ, देव दुःखाला अनुमती का देतो याचे समाधानकारक स्पष्टीकरण त्याने कदाचित पूर्वी कधीच ऐकले नसेल. ख्रिस्ती धर्मजगताने ज्या अनुचित पद्धतींनी येशूला सादर केले त्यांद्वारे नव्हे तर ग्रीक शास्त्रवचनांमध्ये यहुदी लेखकांनी त्याला ज्याप्रकारे सादर केले आहे त्याद्वारे एक मशीहा म्हणून येशूच्या ओळखीचे पुन्हा एकवार परीक्षण करण्याचे उत्तेजन तुम्ही प्रांजळ यहुद्यांना देऊ शकता.

२१ मुस्लिम धर्मीयांना साक्ष देणे: (मानवजातीने केलेला देवाचा शोध यातील अध्याय १२ पाहा.) मुस्लिम अर्थात इस्लाम धर्मीय, एकमेव खुदा म्हणून अल्लाहवर आणि अखेरचा व सर्वात महत्त्वपूर्ण नबी [संदेष्टा] म्हणून मुहंमदवर (सा.यू. ५७०-६३२) विश्‍वास ठेवतात. देवाला एक पुत्र होता हे त्यांना मान्य नसल्यामुळे ते येशू ख्रिस्ताला देवाचा एक निम्न नबी यापेक्षा अधिक काही मानत नाहीत. १,४०० पेक्षा कमी वर्षांपूर्वी लिहून पूर्ण झालेल्या कुरआनमध्ये, इब्री आणि ग्रीक या दोन्ही शास्त्रवचनांचा उल्लेख आहे. इस्लाम आणि कॅथलिक धर्म यांच्यात कमालीची साम्यता आहे. दोन्ही धर्म आत्म्याच्या अमरत्वाची, तात्पुरत्या यातनेची स्थिती आणि धगधगत्या नरकाची शिकवण देतात.

२२ केवळ एकच सत्य देव असून त्यानेच बायबल प्रेरित केले आहे हा आपल्या विश्‍वास संभाषण सुरू करण्यासाठी एक सुस्पष्ट असा सर्वसामान्य पाया ठरेल. कुरआनच्या काळजीपूर्वक वाचकाने तोराह, स्तोत्रसंहिता आणि शुभवर्तमानांचे उल्लेख पाहिलेले असतात आणि ते तसेच जाणले व मानले जावेत हेही त्याच्या वाचनात आलेले असते. यास्तव, अशा व्यक्‍तीसोबत यांचा अभ्यास करण्याचा प्रस्ताव तुम्ही मांडू शकता.

२३ एखाद्या मुस्लिम व्यक्‍तीसाठी कदाचित ही प्रस्तुती उपयुक्‍त ठरू शकेल: “या लहानशा पुस्तकात तुमच्या धार्मिक शिकवणुकींविषयी मी काही वाचलं आहे. [युक्‍तिवाद पुस्तकातील पृष्ठ २४ उघडा.] इथं सांगितलं आहे, की येशू एक नबी होता पण मुहंमद अखेरचा व सर्वात महत्त्वपूर्ण असा नबी होऊन गेला. मूसा देखील एक सच्चा नबी होता हे तुम्ही मान्य करता का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देवाच्या वैयक्‍तिक नावावरून मूसाला देवाविषयी काय माहीत झाले ते मी तुम्हाला दाखवू का?” मग निर्गम ६:२, ३ वाचा. पुनर्भेटीच्या वेळी, खुदाला सच्ची शरणागती दाखवण्याची वेळ (इंग्रजी) या पुस्तिकेच्या पृष्ठ १३ वरील “एक देव, एक धर्म” या उपशीर्षकाखाली दिलेल्या माहितीची चर्चा तुम्ही करू शकता.

२४ आज अनेक जण यशया ५५:६ मध्ये नमूद केलेल्या शब्दांच्या एकवाक्यतेत कार्य करत आहेत; ते वचन म्हणते: “परमेश्‍वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा.” लोकांची भाषा किंवा त्यांची धार्मिक पार्श्‍वभूमी कोणतीही असो, वर उल्लेखिलेले शब्द सर्व प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना लागू होतात. ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनविण्यास’ आपण प्रयासानिशी जातो तेव्हा यहोवा आपले परिश्रम आशीर्वादित करील याविषयी आपण विश्‍वस्त असू या.—मत्त. २८:१९.

[६ पानांवरील चित्र]

गैर-ख्रिस्ती लोकांसाठी रचलेले साहित्य

बौद्ध लोकांसाठी

“पाहा! मी सर्व नवे करतो”(माहितीपत्रक)

पित्याच्या शोधात (इंग्रजी)(पुस्तिका)

चिनी लोकांसाठी

चिरस्थायी शांती आणि सुख—ते कसे मिळवता येईल (इंग्रजी) (माहितीपत्रक)

हिंदूंसाठी

आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील (माहितीपत्रक)

कुरुक्षेत्र ते हर्मगिदोन—आणि तुमचा बचाव (पुस्तिका)

मरणावर विजय—तो तुम्हाकरता शक्य आहे का? (पुस्तिका)

मुक्‍तीकडे नेणारा ईश्‍वरी सत्याचा मार्ग (पुस्तिका)

ज्यूं लोकांसाठी

युद्ध नसलेले जग कधी अस्तित्वात येईल का? (इंग्रजी) (माहितीपत्रक)

मुस्लिम धर्मीयांसाठी

खुदाला सच्ची शरणागती दाखवण्याची वेळ (इंग्रजी) (पुस्तिका)

परादीसकडे नेणारा मार्ग कसा शोधावा (पत्रिका)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा