२३ मग त्याने* नूनचा मुलगा यहोशवा याची नेमणूक केली+ आणि तो त्याला म्हणाला: “हिंमत धर आणि खंबीर हो,+ कारण मी ज्या देशाबद्दल इस्राएली लोकांना वचन दिलं आहे, त्या देशात तू त्यांना घेऊन जाशील+ आणि मी तुझ्यासोबत असेन.”
५ तू जिवंत आहेस तोपर्यंत कोणीही तुला हरवू शकणार नाही.+ मी जसा मोशेसोबत होतो, तसाच तुझ्यासोबतही राहीन.+ मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकून देणार नाही.+