२८ जुलै–३ ऑगस्ट
नीतिवचनं २४
गीत ३८ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. कठीण परिस्थितीसाठी स्वतःला तयार करा
(१० मि.)
ज्ञान आणि बुद्धी मिळवा (नीत २४:५; इन्साइट-२ ६१० ¶८)
निराश असतानाही, आध्यात्मिक गोष्टी करत राहा (नीत २४:१०; टेहळणी बुरूज०९ १२/१५ १८ ¶१२-१३)
यहोवावरच्या मजबूत विश्वासामुळे आणि प्रेमामुळे आपल्याला कठीण परिस्थितीतून सावरायला मदत होते (नीत २४:१६; टेहळणी बुरूज२०.१२ १५)
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
नीत २४:२७—या वचनातून आपण काय शिकतो? (टेहळणी बुरूज०९ १०/१५ १२)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत २४:१-२० (शिकवणे अभ्यास ११)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(२ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. साक्ष देण्याआधीच तुमचं संभाषण संपतं. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)
५. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) घरोघरचं साक्षकार्य. (शिष्य बनवा धडा ३ मुद्दा ४)
६. संभाषण सुरू करण्यासाठी
(३ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. समोरच्या व्यक्तीला बायबल अभ्यासाबद्दल सांगा आणि बायबल अभ्यासाचं संपर्क कार्ड द्या. (शिष्य बनवा धडा ४ मुद्दा ३)
७.भाषण
(३ मि.) शिष्य बनवा आणखी माहिती क मुद्दा ११—विषय: देवाने आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिलाय. (शिकवणे अभ्यास ६)
गीत ९९
८. कठीण काळात एकमेकांना मदत करा
(१५ मि.) चर्चा.
महामारीचा उद्रेक, नैसर्गिक विपत्ती, दंगली, युद्धं किंवा छळ यांसारख्या गोष्टी अचानक सुरू होऊ शकतात. जेव्हा असं होतं, तेव्हा या संकटांचा सामना करत असलेले भाऊबहीण एकमेकांना मदत करायला आणि प्रोत्साहन द्यायला पुढे येतात. ज्या भाऊबहिणींना या संकटांची झळ बसलेली नाही, त्यांनाही त्या भाऊबहिणींचं दुःख जाणवतं आणि ते त्यांना मदत करण्यासाठी शक्य ते सगळं करतात.—१कर १२:२५, २६.
१ राजे १३:६ आणि याकोब ५:१६ख वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
देवाच्या सेवकांनी इतरांसाठी केलेल्या प्रार्थनेत ताकद असते असं आपण का म्हणू शकतो?
मार्क १२:४२-४४ आणि २ करिंथकर ८:१-४ वाचा. मग भाऊबहिणींना विचारा:
आपली परिस्थिती जेमतेम असली आणि गरजू भाऊबहिणींना मदत करण्यासाठी दान द्यायला आपल्याकडे खूप कमी पैसे असले, तरी आपण दान देण्यापासून माघार का घेऊ नये?
बंदीच्या काळात भावांचं धैर्य वाढवलं हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
पूर्व युरोपमध्ये आपल्या कामावर बंदी असताना तिथल्या भाऊबहिणींना मदत करायला भावांनी कोणते त्याग केले?
बंदीच्या काळातही भावांनी एकत्र येण्याची आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्याची आज्ञा कशी पाळली?—इब्री १०:२४, २५
९. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) बायबलमधून शिकू या! पाठ ४-५